Breaking : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर क्रॅश, एका वैमानिकाचा मृत्यू

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:38 PM, 25 Jan 2021
Breaking : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर क्रॅश, एका वैमानिकाचा मृत्यू

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील लखनपूर परिसरात भारतीय सैन्याचं ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. या दुर्घटनेत सैन्याचे दोन वैमानिक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. पण त्यातील एका वैमानिकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  अपघातानंतर दोन्ही वैमानिकांना सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याचं ध्रुव ALH हे हिलेकॉप्टर टेक ऑफ करताना त्याचा एका तारेला धक्का लागला. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. कठुआचे एसएसपी शैलेद्र मिश्रा यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्घटना घडली आहे.(Indian Army helicopter crashes in Jammu and Kashmir’s Kathua district)

कठुआचे सिनीयर पोलिस अधीक्षक शैलेंद्र कुमार मिश्रा यांनी दुर्घटनेची पुष्टी करताना सांगितलं होतं की, लखनपूरच्या जवळ भारतीय सैन्याचं ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. या दुर्घटनेत 2 वैमानिक जखमी झाले आहेत. त्यांना पठाणकोटच्या मिल्ट्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.’ ध्रुव हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच MIG 21 Bison aircraft राजस्थानच्या सूरतगढमध्ये लॅन्ड करताना अपघातग्रस्त झालं होतं. सुदैवानं या अपघातातून वैमानिक वाचला. दरम्यान, अपघात झाला त्यावेळी कुठलंही आर्थिक नुकसान झालं नाही. हे विमान नियमित अभ्यासासाठी उड्डाण घेत असताना दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यावेळी भारतीय वायूसेनेकडून ट्विटरवर या अपघाताची माहिती देण्यात आली होती. ‘पश्चिम क्षेत्रात प्रशिक्षणावेळी एका मिग -21 बायसन विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. वैमानिकाला जवळपास 8.15 मिनिटांनी सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. कुठलीही जीवितहानी झालेली नाही’, असं ट्वीट भारतीय वायुसेनेनं केलं होतं.

इतर बातम्या : 

Padma Award : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा संपूर्ण यादी

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र

Indian Army helicopter crashes in Jammu and Kashmir’s Kathua district