सीबीएसईचा सहावीचा अभ्यासक्रम का होतोय व्हायरल; या कारणामुळे टीकेची झोड…

सीबीएसईने स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, इयत्ता सहावीच्या इतिहासातील पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेला विषय हा चुकीचा आहे.

सीबीएसईचा सहावीचा अभ्यासक्रम का होतोय व्हायरल; या कारणामुळे टीकेची झोड...
महादेव कांबळे

|

Sep 28, 2022 | 9:51 PM

नवी दिल्लीः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) हे कोणत्या कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, ते मात्र इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमामुळे. यावेळी सीबीएसईने सहावीच्या इतिहासाच्या (History) अभ्यासक्रमात ‘जातीयवादी’ मजकुराचा समाविष्ट केल्याबद्दल सर्वस्तरातून टीकेची झोड उठली आहे. जाती, वर्ण प्रणालीशी संबंधित प्रकरणासंबंधित असलेले एक पान सोशल मीडियावर सध्या व्हायरल (Viral) होत आहे. यामध्ये पुस्तकातील चित्रानुसार, पुस्तकातील पाठामध्ये म्हटले आहे की ब्राह्मण हे पुरोहित आणि शिक्षक होते.

क्षत्रिय योद्धे होते, तर वैश्य व्यापारी, कारागीर आणि जमीनदार होते. पृथ्वीवरील शूद्र हे मजूर म्हणून काम करत होते आणि त्यामध्ये इतर तीन वर्णांबाबतही उल्लेख केला गेला आहे.

त्यानंतर सीबीएसईने स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, इयत्ता सहावीच्या इतिहासातील पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेला विषय हा चुकीचा आहे.

तसेच सीबीएसई इतिहासाची पाठ्यपुस्तके प्रकाशित करत नाही, त्यामुळे यामध्ये सीबएसईशी संबंधित असलेल्या वृत्तामध्ये काही तथ्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सीबीएसईने या प्रकरणी संबंधित व्यक्तिंना जबाबदार धरण्यात आले आहे. त्यामुळे सीबीएसईने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की शिक्षण मंडळ म्हणून किंवा तशी भूमिका ठेऊन देशातील शाळांसाठी सीबीएसई ही पुस्तकं छापत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच आणखी काही स्पष्टीकरण देताना सीबीएसईने म्हटले आहे की, सीबीएसई ही काही प्रकाशक नाही. बोर्ड म्हणून त्यांच्याकडे परीक्षा, मार्गदर्शक तत्त्वे, आणि इतर मार्गदर्शक तत्त्वांची प्राथमिक जबाबदारी आहे.

व्हायरल झालेल्या अभ्यासक्रमाच्या छायाचित्रानुसार हे पुस्तक XSEED एज्युकेशन या खासगी प्रकाशकाकडून प्रकाशित केले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें