AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! देशातील महत्त्वाच्या राज्याचं थेट नाव बदललं, नवं नाव काय? जाणून घ्या

केंद्र सरकारने एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आता सर्वच शासकीय कादपत्रांत या राज्याचे नाव बदलले जाणार आहे.

मोठी बातमी! देशातील महत्त्वाच्या राज्याचं थेट नाव बदललं, नवं नाव काय? जाणून घ्या
narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 24, 2026 | 5:26 PM
Share

केंद्रात जेव्हापासून एनडीएचे सरकार आलेले आहे, तेव्हापासून अनेक राज्यांत शहरांची नावे बदलण्यात आलेली आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेवर काही लोकांनी सडकून टीकादेखील केलेली आहे. दरम्यान, आता केंद्र सरकारने देशातील एका राज्याचेच थेट नाव बदलण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने या मागणीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे आता भविष्यात या राज्याला त्याच्या नव्या नावानेच ओळखावे लागणार आहे.

राज्य कोणते, नवे नाव काय असेल?

मिळालेल्या माहितीनुसार केरळ राज्याचे नाव बदलले जाणार आहे. केंद्र सरकारने मंगळवारी या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी केरळमधील राज्य सरकारकडून तसा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावावर विचार करून केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार आता केरळचे नाव केरळम केले जाणार आहे. येत्या एप्रिल, मे महिन्यात केरळमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता केरळचे नाव केरळम करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे.

दोन वेला पाठवला होता प्रस्ताव

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तशी माहिती दिली आहे. केरळच्या विधानसभेत 24 जून 2024 रोजी सर्वसहमतीने केरळ राज्याचे नाव बदलून ते केरळम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव नंतर केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. याच प्रस्तावावर आता निर्णय घेण्यात आला आहे. याआधीदेखील 2023 साली केरळच्या राज्य सरकारने असाच एक प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी केंद्र सरकारने या प्रस्तावाचा अभ्यास करून प्रस्तावात काही तांत्रिक बदल सुचवले होते.

विधानसभेच्या तोंडावर प्रस्तावाला मंजुरी, फायदा होणार

आता केरळचे नाव केरळम असे केले जाणार आहे. भारतीय संविधानातील 8 व्या अनुसूचिमध्ये केरळ राज्याच्या नावात केरळम असा बदल केला जाणार आहे. दरम्यान, केरळमध्ये विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना केंद्र सरकारने राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे त्या राज्यात भाजपाला तसेच मित्रपक्षांना काही फायदा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?