AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ChatGPT ची कमाल, 23 वर्षीय मुलगा तीन महिन्यात झाला लखपती

गुगल युजर्सला रँकनुसार वेबसाइट दाखवतो मग ती माहिती घ्यावी की नाही, हे युजरवर अवलंबून असते. परंतु ChatGPT स्वत: उत्तर देतो. मग एका २३ वर्षीय युवकाने या तंत्रज्ञानाचा वापर करुन कमाई सुरु केली. तीन महिन्यात ही कमाई तब्बल २८ लाखांवर गेली.

ChatGPT ची कमाल, 23 वर्षीय मुलगा तीन महिन्यात झाला लखपती
| Updated on: Apr 01, 2023 | 2:53 PM
Share

नवी दिल्ली : ChatGPT आल्यापासून अनेकांना नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत. परंतु नवीन आव्हान म्हणजे संधी समजून काम केल्यास त्यातून लाखोंची कमाई करता येते, असे शक्य झाले आहे. एका २३ वर्षीय युवकाने ChatGPT च्या माध्यमातून तीन महिन्यात तब्बल २८ लाखांची कमाई केली आहे. ChatGPT काय आहे? त्याचा वापर कसा करावा? हे अजून लोकांना माहीत नाही. यामुळे ही बाब हेरुनच त्या युवकाने शक्कल लढवली आणि त्यात तो यशस्वी झाला. मग या माध्यमातून तीन महिन्यात लाखोंची कामाई केली.

काय आहे ChatGPT

ChatGPT काय आहे, हे आधी पाहू या. ChatGPT हे गुगलप्रमाणे आहे. फक्त गुगल सर्च इंजिन आहे. ChatGPT चे एक Chatbot आहे, ज्याचा वापर Chat करण्यासाठी करता येईल. हे Google Assistant प्रमाणे काम करते. पण त्यापेक्षा वेगळे आहे.

ChatGPT आणि Google मध्ये काय आहे फरक

ChatGPT आणि गुगलमध्ये जास्त फरक नाही. ChatGPT एक चॅटबोट तर गुगल एक सर्च इंजन आहे. दोघांचे काम लोकांना योग्य माहिती देणे आहे. गुगल प्रश्नाचे उत्तर स्वत: देत नाही तर गुगलच्या इंडेक्समध्ये असणाऱ्या वेबसाइटमधून उत्तर देतो. म्हणजेच गुगल सरळ उत्तर न देता वेबसाइटच्या रँकनुसार उत्तर देतो.

टेक्स्ट फॉर्मेटमध्ये उत्तर

गुगल युजर्सला रँकनुसार वेबसाइट दाखवतो मग ती माहिती घ्यावी की नाही, हे युजरवर अवलंबून असते. परंतु ChatGPT स्वत: उत्तर देतो. परंतु त्याला कोणाकडून ही माहिती मिळेत त्याचे उत्तर अजून मिळाले नाही. तसेच ChatGPT एक chatbot मुळे वेबसाइट रँक नाही तर स्वत: टेक्स्ट फॉर्मेटमध्ये उत्तर देतो. यामुळे ChatGPT कडून मिळालेले उत्तर चुकीही शकतो. 2015 मध्ये सैम एल्टमेन व एलॉन मस्क यांनी chatbot ची निर्मिती केली होती. एलन मस्क 2018 मध्ये यातून बाहेर पडले.

आता त्या युवकाने कशी केली कमाई

बिझनेस इनसाइडरच्या बातमीनुसार, लांस जंक नावाच्या 23 वर्षीय व्यक्तीने एक एज्युकेशन प्लेटफॉर्म तयार केला. त्याने ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु केला. चैटजीपीटी (ChatGPT) चा वापर कसा करावा, हे यामध्ये शिकवले जाते. मग तीन महिन्यात जगभरातील 15,000 हा अभ्यासक्रम केला. त्या माध्यमातून 28 लाख रुपये फायदा लांस जंक याला झाला. या सात तासांच्या अभ्यासक्रमासाठी त्याने २० डॉलर शुल्क ठेवले आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.