चीनची सर्वात मोठी खेळी, ट्रम्प यांचं स्वप्न धुळीला, अमेरिकेला मोठा धक्का, भारताचंही टेन्शन वाढलं
जगभरात सध्या टॅरिफ वार सुरू असतानाच आता चीनच्या एका खेळीमुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न धुळीला मिळालं आहे. सोबतच भारताच्या टेन्शनमध्ये देखील वाढ झाली आहे.

अमेरिकेनं भरतावर टॅरिफ लावल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे भारताची चीनसोबत जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे, अमेरिकेनं भारतावर टॅरीफ लावला, मात्र आमच्या बाजारपेठा भारतासाठी खुल्या आहेत, त्यांच्या वस्तुंचं आम्ही आमच्या बाजारपेठांमध्ये स्वागत करू असं देखील चीनकडून काही दिवसांपूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं, तर दुसरीकडे अमेरिकेनं चीनवर देखील टॅरिफ लावला आहे, आता अमेरिकेचा चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याचा विचार सुरू आहे. जगात टॅरिफ वार सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे.
चीन हा रेअर अर्थ एलिमेंट्स अर्थात दुर्मिळ खनिजांचा जगातील सर्वात मोठा सप्लायर देश आहे. आता तो त्याचा वापर एक सामरिक शस्त्र म्हणून करत आहे. या क्षेत्रातील आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे, त्यामध्ये असं म्हटलं आहे की, चीनने म्यानमारमधील बंडखोरांशी संबंध प्रस्तापित केले असून, या बंडखोरांच्या मदतीनं चीनने मॅनमारमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खननं सुरू केलं आहे. चीन मॅनमारमधून मोठ्या प्रमाणात रेअर अर्थ एलिमेंट्स मिळवत असून, ते शुद्ध करण्याची मोठी यंत्रणा देखील या देशाकडे आहे. म्यानमारची सीमा भारताशी देखील जोडली गेली आहे.
दरम्यान चीन भारताला रेअर अर्थ एलिमेंट्स असलेल्या मॅन्गेटसचा पुरवठा करते, हा पुरवठा त्यांनी काही काळापूर्वी थांबवला होता, तसेच चीनकडून अमेरिकेला देखील दुर्मिळ खनिजांचा पुरवठा होतो, मात्र त्याबदल्यात चीनने अमेरिकेला आपल्या सर्व अटी मान्य करायला लावल्या होत्या, हाच राग अजूनही डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात आहे, त्यामुळेच त्यांनी चीनवर टॅरिफ लावला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना या क्षेत्रातील चीनची मक्तेदारी मोडून काढायची आहे, त्यासाठी ते रशिया आणि युक्रेनसोबत करार करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यामध्ये त्यांना अजूनही यश आलेलं नाही. आता तर चीनच्या हाती मोठाच खजिना लागला आहे, त्यामुळे चीन याचा वापर हातात असलेल्या एखाद्या सामरिक शस्त्राप्रमाणे करू शकतो.
दरम्यान या रिपोर्टमध्ये असं देखील म्हटलं आहे की, याच सिमेवरून भारत आणि अमेरिकेनं जर रेअर अर्थ एलिमेंट्स मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो फार यशस्वी होणार नाही कारण हा भागा जिथे ही खनिज आढळतात तो चीनच्या सीमेला लागू आहे, चीन अमेरिका आणि भारताकडून सुरू करण्यात आलेलं उत्खननं थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.
