मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला टोकाचा निर्णय, थेट मोठी घोषणा, जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आता अवघ्या काही तांसामध्ये ट्रम्प यांनी आणखी एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

चीन आणि अमेरिकेमध्ये नव्या व्यापार युद्धाला सुरुवात झाली आहे, चीनने अचानक अमेरिकेला होणारा रेअर अर्थ मिनिरल्सचा पुरवठा थांबवला आहे. त्यासोबतच अमेरिकेकडून सोयाबीन आयात न करण्याचा देखील निर्णय घेतला आहे, चीनच्या या निर्णयाचा अमेरिकेला प्रचंड फटका बसला आहे, चीन हा अमेरिकेमध्ये उत्पादीत सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे, मात्र अचानक चीनने सोयाबीनची खरेदी थांबवल्यानं अमेरिकन बाजारपेठेमध्ये भूकंप आला आहे, अमेरिकेमधील सोयाबीन उत्पादक शेतकरी दहशतीखाली आहेत. तर दुसरीकडे रेअर अर्थ मिनिरल्ससाठी अमेरिका पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे, त्याचा सर्वात मोठा फटका हा अमेरिकेला बसणार आहे. चीनच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली, मात्र टॅरिफनंतर त्यांनी आता चीनला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
ट्रम्प प्रशासनाकडून रशियासमोर मोठा प्रस्तावर ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की, चीनी एअरलाइन्सच्या अमेरिकेत येणाऱ्या -जाणाऱ्या सर्व विमांनासाठी रशियानं आपलं हवाईक्षेत्र बंद करावं. अमेरिकेनं असा दावा देखील केला आहे की, चीनचे सर्व विमानं हे रशियाच्या हवाई क्षेत्रातून अमेरिकेत येतात, त्यामुळे त्यांच्या इंधन आणि वेळेची बचत होते, त्यामुळे चीनची प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिकन एअरलाइन्सच्या कंपन्यांचं मोठं नुकसान होत आहे. ट्रम्प यांचा या नव्या प्रस्तावामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांचा या पावलामुळे जागतिक अर्थव्यवस्था तसेच चीन आणि अमेरिकेच्या व्यापार संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण होऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावला आणि त्यानंतर लगेचच हा मोठा निर्णय घेतला आहे.रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, हे युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे रशिया आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे रशियानं अमेरिकेच्या एअरलाईन्स कंपन्यांना आपल्या हवाई क्षेत्रातून विमान उड्डानास प्रतिबंध केला आहे, मात्र त्यांनी अशी बंदी चीनवर घातलेली नाही, त्यामुळे आमचं प्रचंड नुकसान होत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.
