AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा, उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (CM Uddhav Thackeray meet PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून, भेटीचा तपशील सांगितला.

राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा, उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी
| Edited By: | Updated on: Feb 21, 2020 | 8:59 PM
Share

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (CM Uddhav Thackeray meet PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून, भेटीचा तपशील सांगितला. (CM Uddhav Thackeray meet PM Narendra Modi). “राजकारण बाजूला ठेवा, देशातील महत्त्वाचं राज्य म्हणून केंद्राने सहकार्य करावं, अशी मागणी मोदींकडे केली. मोदींनी सहकार्याचं आश्वासन दिलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मी अनेक वेळा दिल्लीत आलो होतो. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी त्यांना भेटायला आलो. भेटीत खूप चांगली चर्चा झाली. महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. केंद्राचं सहकार्य राज्याला मिळावं असं मी त्यांना सांगितलं. त्यांनीही सहकार्य करु असं सांगितलं.  सीएए, एनआरपीबाबत देखील चर्चा केली. या सगळ्याबद्दल मी आगोदरच माझी भूमिका सांगितली आहे. विकासाच्या मुद्यावर चर्चा झाली. सीएएबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याची गरज नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“पंतप्रधान मोदींच्या भेटीत सीएए आणि एनपीआरबाबत चर्चा केली. हा कायदा कुणाला देशातून काढण्यासाठी झालेला नाही. शेजारच्या राष्ट्रातील हिंदू बांधवांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. जनगणना होणं आवश्यक आहे. एनआरसी केवळ आसामपर्यंत मर्यादित राहिल. एनपीआर कुणालाही देशातून बाहेर काढण्यासाठी नाही. लोकसंख्या मोजण्यासाठी दर 10 वर्षांनी होते. त्यामुळे त्यात काही आक्षेपार्ह आढळलं तर तेव्हा नक्कीच आक्षेप घेऊ”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

आंदोलन करणाऱ्यांना ज्यांनी भडकावलं आहे त्यांनी हा कायदा समजून घेण्याची गरज आहे. जीएसटीचा पैसा येत आहे, मात्र ज्या वेगात यायला हवा त्या वेगात येत नाही. शेतकरी विम्याबाबतही चर्चा केली. जीएसटीचे पैसे येत आहेत. मध्ये मी पत्र लिहिलं तेव्हा काही पैसे आले आहेत, मात्र हे पैसे येण्याचा वेग वाढायला हवा. आम्ही शेतकऱ्यांसाठी योजना आणत आहोत. त्यासाठी पैसा लागणार आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्याशी संबंधित ज्या काही आवश्यक गोष्टी आहे त्यावर चर्चा झाली. राजकीय घडामोडी एकीकडे मात्र राज्यासाठी केंद्राचा पाठिंबा हवा, असं मोदींना सांगितलं. त्यांनी सहकार्याचं आश्वासन दिलं. राज्य आणि केंद्र समन्वयातच सगळ्या गोष्टी आल्या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

या बैठकीत सीएए, एनपीआर आणि एनआरसीवर चर्चा झाली अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. “मी सीएए, एनपीआर, एनआरसीबाबत ‘सामना’त माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘सीएए’ला घाबरायची गरज नाही. एनआरसी पूर्ण देशात लागू होणार नाही. मी माझ्या राज्यातील नागरिकांना आश्वासन दिलं आहे की कुणाचाही अधिकार हिरावून घेतला जाणार नाही. जे मला माहित आहे ते मी बोलत आहे. एनआरसीमुळे फक्त मुस्लमांसाठी नाही तर सगळ्यांनाच लायनीत उभं राहावं लागेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“देशाची जनगणना दर दहा वर्षांनी होते. कायदा लागू झाल्यावर तो खतरनाक वाटला तर वाद होऊ शकतात. एनपीआरमध्ये काही आक्षेपार्य असेल तर आपण बोलू शकतो”, असंदेखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीएसटीच्या निधीबाबत पत्र पाठवले होते. त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान शेतकरी पीक विमा योजना या विषयावर चर्चा झाली.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरपंच निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी परत पाठवला, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, “महाराष्ट्रातल्या प्रश्नांना महाराष्ट्रात उत्तर दिलेलं आहे. लगेच चित्र निर्माण केलं जात आहे की, राज्यपाल आणि सरकार यात अधिवेशनाची ठिणगी पडली”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, सीएएविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता काँग्रेससोबत सीएए आणि एनपीआरबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात शांतता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय आमचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालू आहे, असं ते म्हणाले. आम्ही मन बनवलं आणि कॉमन मिनीमम प्रोग्रामनुसार सरकार पुढं जात आहे. जीएसटीच्या माध्यमातून पैसे येण्याची पध्दत खूप हळू आहे ती वाढायला पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.