ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू नाही, सरकारच्या उत्तराने विरोधक भडकले; विषेशाधिकार भंगाचा प्रस्ताव आणणार

ऑक्सिजनच्या अभावी देशात एकाचाही मृत्यू झाला नसल्याचं धक्कादायक उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. (privilege motion against Centre)

ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू नाही, सरकारच्या उत्तराने विरोधक भडकले; विषेशाधिकार भंगाचा प्रस्ताव आणणार
oxygen shortage

नवी दिल्ली: ऑक्सिजनच्या अभावी देशात एकाचाही मृत्यू झाला नसल्याचं धक्कादायक उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. त्यामुळे विरोधक प्रचंड संतापले असून त्यांनी थेट सरकार विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. (Congress and AAP to move privilege motion against Centre over ‘no deaths due to oxygen shortage’ claim)

कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने देशाला अनाथ करून सोडलं होतं. देशात काय सुरू आहे हे सरकारला माहीतच नव्हतं. आता सरकारने उत्तर दिलं आहे. त्याच्याशी आम्ही सहमत नाही. त्यामुळेच आम्ही सरकारविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणणार आहोत, असं आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी सांगितलं.

काँग्रेसही प्रस्ताव आणणार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारच्या या उत्तरावर सवाल केले होते. आम आदमीपाठोपाठ काँग्रेसही विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आम्ही आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणू, असं केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं होतं.

केंद्र सरकार खोटारडे

तर दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्र सरकार खोटं बोलत असल्याचं सांगितलं. दिल्लीसहीत देशाच्या विविध राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. दिल्लीत ऑक्जिनचा तुटवडा निर्माण झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे आम्ही समितीची स्थापना केली होती. आमचीही समिती नायब राज्यपालांनी नामंजूर केली होती. ही समिती असती तर ऑक्सिजन अभावी मृत्यू पावलेल्यांची नेमकी संख्या समजली असती, असं जैन यांनी सांगितलं.

प्रियंका गांधींची टीका

केंद्र सरकारच्या या उत्तरानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ट्विट केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला होता. परिणामी केंद्र सरकारने ऑक्सिजनची निर्यात 700 टक्के वाढवली होती, असं सांगतानाच केंद्र सरकारने ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणाऱ्या टँकरांची व्यवस्था केली नव्हती. तसेच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभे करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नव्हती, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

 

केंद्र सरकार नेमकं काय म्हणालं?

काँग्रेसचे खासदार केसी वेणूगोपाल यांनी राज्यसभेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशात किती लोकांचा मृत्यू झाला?, असा सवाल केंद्र सरकारला केला होता. त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी उत्तर देताना, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती कोणत्याही राज्यांनी दिलेली नाही, असं स्पष्ट केलं होतं. कोरोनामुळे दगावलेल्यांची माहिती नियमितपणे राज्यांकडून केंद्राला दिली जाते. मात्र, ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेली नाही, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. (Congress and AAP to move privilege motion against Centre over ‘no deaths due to oxygen shortage’ claim)

 

संबंधित बातम्या:

ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारविरोधात खटला दाखल करावा; संजय राऊत संतापले

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 12 हजारांनी वाढ, कोरोनाबळी दसपट अधिक

कोरोना काळातील अनाथांसाठी राष्ट्रवादीची ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना; गुरुवारपासून योजनेला सुरुवात

(Congress and AAP to move privilege motion against Centre over ‘no deaths due to oxygen shortage’ claim)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI