Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 12 हजारांनी वाढ, कोरोनाबळी दसपट अधिक

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 998 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 36 हजार 977 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 12 हजारांनी वाढ, कोरोनाबळी दसपट अधिक
corona
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 10:09 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 12 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 42 हजार 15 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच (20 जुलै) गेल्या 125 दिवसांतील निचांकी आकड्याची नोंद झाली असताना पुन्हा मोठी वाढ धडकी भरवणारी आहे. तर एका दिवसात 3 हजार 998 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. आदल्या दिवशी हा आकडा अवघ्या 374 वर आला असताना, कोरोनाबळीत जवळपास दहापटीने वाढ झाली आहे. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 998 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 36 हजार 977 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 12 लाख 16 हजार 337 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 3 लाख 90 हजार 687 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 18 हजार 480 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 7 हजार 170 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 41 कोटी 54 लाख 72 हजार 455 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 42,015

देशात 24 तासात डिस्चार्ज – 36,977

देशात 24 तासात मृत्यू – 3,998

एकूण रूग्ण – 3,12,16,337

एकूण डिस्चार्ज – 3,03,90,687

एकूण मृत्यू – 4,18,480

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,07,170

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 41,54,72,455

24 तासात लसीकरण झालेली संख्या – 34,25,446 

संबंधित बातम्या :

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम, 4 कोटी नागरिकांचे लसीकरण

12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिलासा, कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण

(New 42015 Corona Cases in India in the last 24 hours)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.