AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या नेत्याकडून मोदींच्या युद्धनीतीचे कौतूक, माजी गृहमंत्री यांनी थेट…

मोदी यांनी 2022 मध्ये व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलताना म्हटले होते, हे युद्धाचे युग नाही. मोदी यांचे ते शब्द आजही जगाला आठवत आहे. त्यामुळे अनेक देश भारताला युद्ध न करण्याचा सल्ला वैयक्तीक पातळीवर देत होते.

काँग्रेसच्या नेत्याकडून मोदींच्या युद्धनीतीचे कौतूक, माजी गृहमंत्री यांनी थेट...
नरेंद्र मोदी, चिदंबरम
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 11, 2025 | 2:28 PM
Share

भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आले होते. भारताने केलेल्या या कारवाईचे आणि त्यानंतर अवलंबलेल्या नीतीचे काँग्रेस नेता आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कौतूक केले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये प्रसिद्ध कॉलममध्ये चिदंबरम यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने केलेली कारवाई ही ‘बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित’ असल्याचे म्हटले आहे.

लेखात चिदंबरम यांनी लिहिले की, भारताने केलेली सैन्य कारवाई सुनियोजीत होती. त्याचा उद्देश दहशतवादी संघटनांची तळ उद्धवस्त करणे होता. दहशतवाद्यांचा कणा मोडून काढणे हा होता. चिदंबरम यांनी नरेंद्र मोदी यांच्या या कृतीचे वर्णन शहाणपणाचे पाऊल केले आहे. भारताने जागतिक स्थिरतेला प्राधान्य दिले आणि पूर्ण युद्धाची परिस्थिती टाळली आहे.

चिदंबरम यांनी जागतिक परिस्थिती देताना लिहिले की, मोदी यांनी 2022 मध्ये व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलताना म्हटले होते, हे युद्धाचे युग नाही. मोदी यांचे ते शब्द आजही जगाला आठवत आहे. त्यामुळे अनेक देश भारताला युद्ध न करण्याचा सल्ला वैयक्तीक पातळीवर देत होते. भारत आणि पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्र संपन्न देश आहे. युद्ध केवळ प्रादेशिक नाही तर जागतिक अस्थिरता निर्माण करणारे असू शकते. त्यासाठी चिदंबरम यांनी रशिया-युक्रेन आणि इस्त्रायल-गाझा याचे उदाहरण दिले.

चिदंबरम यांनी लिहिले की, 7 मे रोजी भारताने केलेली एअर स्ट्राईक वैध आणि लक्ष्य केंद्रीत होती. त्या कारवाईत पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हल्ले करण्यात आले. भारताने त्यावेळी नागरी वस्ती किंवा पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले नाही. पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याचे खोटे दावे केले. त्या दावांची पोल पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांकडूनच माध्यमांशी बोलताना उघड झाली होती. लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि द रेजिस्टेंस फ्रंट यासारख्या दहशतवादी संघटना संपल्या असतील, असे म्हणणे धाडसाचे ठरणार असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

Follow Us
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?