AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसाम पोलिसांचा दावा, धार्मिक भावनांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणींना अटक केल्याचा

आसाम : गुजरातमधील (Gujarat) वडगाम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आसाम पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पालनपूर सर्किट हाऊसमधून अटक केली होती. त्यानंतर मेवाणी (MLA Jignesh Mewani) यांना संध्याकाळी गुवाहाटीमार्गे अहमदाबादहून कोक्राझार येथे आणण्यात आले होते. यानंतर आजा त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात (court) हजर […]

आसाम पोलिसांचा दावा, धार्मिक भावनांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणींना अटक केल्याचा
आमदार जिग्नेश मेवाणीImage Credit source: tv9
| Updated on: Apr 23, 2022 | 6:07 PM
Share

आसाम : गुजरातमधील (Gujarat) वडगाम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आसाम पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पालनपूर सर्किट हाऊसमधून अटक केली होती. त्यानंतर मेवाणी (MLA Jignesh Mewani) यांना संध्याकाळी गुवाहाटीमार्गे अहमदाबादहून कोक्राझार येथे आणण्यात आले होते. यानंतर आजा त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात (court) हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने मेवाणी यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनतर आता आसाम पोलिसांनी आपले म्हणणे जाहिर केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, एका विशिष्ट समाजाच्या भावनांना दुखावल्याप्रकरणी आमदार जिग्नेश मेवानी यांना अटक करण्यात आली.

विशिष्ट समाजाच्या भावनांना दुखावल्याचा आरोप

यानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मेवाणी यांच्यावर आयपीएस २९५ अ नुसार प्राथमिक अपराथ केला असून त्यांच्यावर एका विशिष्ट समाजाच्या भावनांना दुखावला असा आरोप आहे. मेवाणी यांनी एका ट्विटमध्ये, गोडसे यांना देव मानणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जातीय संघर्षाविरोधात शांतता आणि सलोख्याचे आवाहन करावे, असे म्हटले होते. तर मेवानी यांनी नथुराम गोडसेची तुलना देवाशी केली होती. तर नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केली होती.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

यानंतर आसामच्या कोकराझार पोलिसांनी सांगितले की, कोकराझारच्या पोलिसांनी काल रात्री पालनपूर येथून वडगाव मतदारसंघाचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक केली आहे. मेवामी यांच्यावर IPC कलम 120B (गुन्हेगारी कट), 153 (A) (दोन समुदायांविरुद्ध शत्रुत्व वाढवणे), 295 (A) आणि 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने बोलणे) आणि आयटी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना अटक झाल्यानंतर आसाममध्ये आंदोलन करण्यात येत आहे. ज्याचे नेतृत्व आसाम काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार जाकिर हुसैन सिकंदर करत आहेत. त्यांनी मेवानी यांच्या अटकेनंतर सांगितले की, मेवानी यांची गुजरातमधील असलेली लोकप्रियता कमी करण्यासाठीच अटक करण्यात आली आहे. तर आसामचे अपक्ष आमदार अखिल गोगोई यांनी या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री आणि बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलचे प्रमुख यांचा हात असल्याचा अरोप केला आहे.

इतर बातम्या :

Meghalaya: मेघालय सरकारच्या प्रवेश बंदी विधेयकाला राज्यपाल मलिकांचा ब्रेक; म्हणाले, यावर संमती राष्ट्रपतींची घेणार

Jammu Encounter Video : हाडं गोठवणाऱ्या जम्मूतल्या एन्काऊंटरचं सीसीटीव्ही फुटेत आलं समोर, दहशतवाद्यांकडून अंधाधूंद गोळीबार

Jaipur : जयपूरच्या सिनेस्टार सिनेमा हॉलला भीषण आग, इमारतीत लोक अडकली असल्याची भीती

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.