ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी Consumer App लाँच

तुम्ही नुकतेच एखादी वस्तू विकत घेतली असेल आणि ती खराब असेल, तसेच दुकानदार ती वस्तू परत घेण्यास नकार देत असेल, तर घाबरण्याची गरज नाही.

ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी Consumer App लाँच

नवी दिल्ली : तुम्ही नुकतेच एखादी वस्तू विकत घेतली असेल आणि ती खराब असेल, तसेच दुकानदार ती वस्तू परत घेण्यास नकार देत असेल, तर घाबरण्याची गरज नाही. केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ग्राहकांच्या तक्रारीसाठी एक नवीन अॅप लाँच (Consumer complaints app launch) केले आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही दुकानदार तसेच इतर काही वस्तू घेतल्यास ती खराब निघाली तर तुम्ही त्या कंपनीविरोधात तक्रार करु शकता.

केंद्र सरकारने काल (1 ऑक्टोबर) ग्राहकांसाठी हा अॅपल लाँच (Consumer complaints app launch) केला. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. या अॅपमध्ये तुम्ही तक्रार दाखले केली तर पुढील 60 दिवसांच्या आत तुमच्या तक्राराची निवारण याद्वारे केले जाईल.

ग्राहकाने तक्रार केल्यानंतर पुढील 60 दिवसात तक्रारीचे निवारण पूर्ण झाले पाहिजे, अशी मर्यादा मंत्रालयाकडून ठेवण्यात आलीआहे. त्यानंतर संबधित कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, एका मर्यादीत वेळेत ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण व्हावे यासाठी हा अॅप लाँच करण्यात आला आहे. तसेच ग्राहकांनी या अॅपमध्ये तक्रारीकरण्यासोबत आम्हला काही सल्लेही देऊ शकता जेणेकरुन यामध्ये बदल करता येईल, असं पासवान म्हणाले.

या अॅपमध्ये ड्युरेबल, इलेक्ट्रॉनिक उत्पादने याशिवाय ई-कॉमर्स, बँकिंग आणि विमासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या मोबाईल अॅपच्या माध्यमातून ग्राहाकांना या क्षेत्रातील कंपन्यांची माहिती मिळेल. ग्राहक आपल्या मोबाईल फोन आणि अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर हा अॅप डाऊनलोड करु शकता. तसेच या अपमध्ये हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषा आहेत. तसेच ग्राहकाने केलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सात दिवसांचा कालवधी लागेल, असही पासवान म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *