‘बीफ बिर्याणी’ वरुन वादंग, विरोधानंतर बॅकफुटवर आले यूनिव्हर्सिटी प्रशासन, हे कारण सांगितले
या नोटीसीवर कोणाचाही सही नसल्याने ही नोटीस अधिकृत नाही. परंतू तरीही या प्रकरणात दोघा विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली असल्याचे विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.

Aligarh Muslim University News : उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीच्या ( एएमयू ) एका मेन्यूच्या नोटीसी वरुन वादळ उठले आहे. अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीच्या शाह सुलेमान हॉलमध्ये रविवारी दुपारच्या भोजनात बीफ बिर्याणीचा मेन्यू असणार असल्याच्या नोटीसीवरुन खळबळ उडाली आहे. या प्रकरणता आता अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटी प्रशासन बॅकफूटवर आले आहे. एएमयूचे प्रॉक्टर वसीम अहमद यांनी मेन्यूत बदलासंदर्भात एक नोटिसीत एक प्रकारे टायपिंग मिस्टेक झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की मेन्यूत कोणताही बदल झालेला नाही.जेवण आधीच्या योजनेनुसार वाढले जाईल….
सुलेमान हॉस्टेलने जारी केली होती नोटिस –
सुलेमान हॉलच्या नावाच्या हॉस्टेलद्वारे इंग्रजीत लिहीलेल्या नोटिसीवर सिनियर फूड डायनिंग हॉलचे मोहम्मद फैजुल्लाह आणि मुजास्सिम अहमद भाटी यांची नावे लिहीली आहेत. अलीगड मुस्लीम विद्यापीठात विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र अशी २० हॉस्टेल्स आहेत. या तीन वेळेला जेवण पुरविण्यात येते. येथे हॉस्टेलमध्ये प्रत्येकाच्या जेवणाचे स्वतंत्र मेन्यू असतात. सुलेमान हॉस्टेलसाठी ही नोटीस जारी झाली होती. या हॉस्टेलच्या भोजनाच्या नोटीसीत अनेकांच्या मागणीवरुन मेन्यूत बदल झाला असून चिकन बिर्याणी ऐवजी बीफ बिर्याणी असा नवा मेन्यू बदल्यात आला आहे असे या नोटीसीत म्हटल्याने खळबळ उडाली आहे.




टायपिंग मिस्टेक –
हे प्रकरण आमच्या ध्यान्यात आणले गेले. आम्ही चौकशी केली तेव्हा कळले की जेवणासंदर्भात ही नोटीस जारी केलेली होती. परंतू यात टायपिंग मिस्टेक झाली आहे. नोटिसला आम्ही तातडीने मागे घेतले आहे. कारण या नोटिसीवर कोणाचीही साक्षरी नव्हती. त्यामुळे या नोटीसीच्या सत्यतेबाबतच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाला जबाबदार दोन विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. आम्ही विद्यापीठाच्या नियमांचे सक्तीने पालन करणार आहोत. या प्रकरणाला गंभीरतेने घेतले असल्याचे एएमयूच्या जनसंपर्क विभागाच्या सदस्य प्राध्यापक विभा शर्मा यांनी म्हटले आहे.