Corona News : पुढच्या काही महिन्यात वाढू शकतो कोरोनाचा कहर, खतरनाम रूप बदलताना दिसत आहेत Delta चे सब व्हेरिंअट

हैदराबाद स्थित सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) आणि चंदीगड स्थित IMTech चे म्हणणे आहे की, आता कोरोना हवेतही पसरत आहे. इतकंच नाही तर या अभ्यासात असंही समोर आलं आहे की, हवेतून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो.

Corona News : पुढच्या काही महिन्यात वाढू शकतो कोरोनाचा कहर, खतरनाम रूप बदलताना दिसत आहेत Delta चे सब व्हेरिंअट
पुण्यात दोन दिवसात कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 6:07 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे (Corona) नियम शिथिल केल्यानंतर राजकीय सभांसह अनेक कार्यक्रम जोरात करण्यात आले आहेत. पण त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीसह इतर मोठ्या शहरात कोरोनाचे रूग्न वाढताना दिसत आहेत. तर दिल्लीसह अनेक शहरात पुन्हा मास्कची शक्ती केली आहे. त्यानंतर देशात सगळीकडे अलर्टची स्थिती झाली असतानाच आता पुन्हा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एक भयावह बातमी समोर आली आहे. या उन्हाळ्यात (पुढील काही महिने) कोरोना पुन्हा कहर करू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तर डेल्टा (Delta) चे सब व्हेरिंअट धोकादायक वळण घेत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर चिंता वाढवली आहे. तर कोरोनाची घातक दुसरी लाट येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. कोरोनावरील ताजे अभ्यास इस्रायलमध्ये करण्यात आला आहे. हा अभ्यास द टोटल एन्व्हायर्नमेंट सायन्स मासिकात प्रकाशित झाला आहे. डेल्टा प्रकार किती धोकादायक आहे, हे अभ्यासात नमूद केलेल्या एका गोष्टीवरून समजू शकते. त्यात असे म्हटले आहे की, डेल्टाने त्याच्या आधी आलेले सर्व प्रकार संपुष्टात आणले होते. परंतु डेल्टाच्या नंतर आलेले ओमिक्रॉन (Omicron) हे घातक प्रकार पूर्णपणे काढून टाकू शकले नाही आणि ते पुन्हा उदयास येऊ शकते.

इस्रायलमधील बेन-गुरियन विद्यापीठ

इस्रायलमधील बेन-गुरियन विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. युनिव्हर्सिटीने अशी रणनीती बनवली होती ज्यामध्ये सांडपाण्याच्या (घाणेरड्या पाण्याच्या) मदतीने कोरोनाच्या प्रकारांमधील फरक शोधला जाऊ शकतो. एवढेच नाही तर पीसीआर किंवा रॅपिड टेस्ट देखील निगेटिव्ह आल्यास कोरोनाव्हायरस कुठे सक्रिय आहे हे सांगण्यासाठी ही रणनीती वापरली जाते.

नाल्यांचे नमुने

या संशोधनात संशोधकांनी डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 पर्यंतचा डेटा वापरला आहे. त्यासाठी शहरातील नाल्यांचे नमुने घेण्यात आले. ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकारांमध्ये चिंतेचे कारण काय आहे ते येथे आहे.

हे सुद्धा वाचा

या उन्हाळ्यात डेल्टाची लाट

संशोधनावर बोलताना युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर एरियल कुशमारो म्हणतात, ‘अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. परंतु आमचे चाचणी मॉडेल असे सूचित करते की, या उन्हाळ्यात डेल्टाची लाट किंवा इतर कोणत्याही प्रकारची कोरोना असू शकते. प्रोफेसर म्हणाले की, जेव्हा जेव्हा नवीन प्रकार येतो तेव्हा ते मागील प्रकारावर वर्चस्व गाजवते आणि काही वेळाने ते काढून टाकते. पण डेल्टाच्या बाबतीत तसे झालेले नाही.

हवेतून कोरोना पसरतो

इस्रायलच्या अहवालादरम्यान भारतात करण्यात आलेल्या एका अभ्यासामुळेही भीती वाढली आहे. हैदराबाद स्थित सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) आणि चंदीगड स्थित IMTech चे म्हणणे आहे की, आता कोरोना हवेतही पसरत आहे. इतकंच नाही तर या अभ्यासात असंही समोर आलं आहे की, हवेतून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.