आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार, मोदींचं ‘कोरोना पॅकेज’ जाहीर

जवळपास 80 लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल, सध्या मिळत असलेल्या सोडून अतिरिक्त मिळेल. शिवाय त्यासोबत एक किलो डाळही मोफत मिळेल (Corona Package by Modi Government)

आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार, मोदींचं 'कोरोना पॅकेज' जाहीर
Union Budget 2021
Follow us
| Updated on: Mar 26, 2020 | 2:18 PM

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची काळजी केंद्र सरकारकडून घेतली जात आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1 लाख 70 हजार कोटीचं पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. पुढील तीन महिने गरिबांना 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल. आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार अशा अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या. (Corona Package by Modi Government)

निर्मला सीतारमन यांच्या घोषणा 1. केंद्र सरकारचे 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज 2. वैद्यकीय कर्मचा-यांना 3 महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच 3. देशात कोणही उपाशी राहणार नाही 4. शहर-ग्रामीण भागातील गरीब, स्थलांतरीत मजुरांना तातडीने मदत 5. प्रधान मंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा 6. अन्न कल्याण योजनेंतर्गत, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,1 किलो दाळ मोफत 7. 80 कोटी लोकांना अन्न कल्याण योजनेचा लाभ 8. आठ कोटी 69 लाख शेतक-यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रु.लगेच देणार 9. रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर 2 हजार रु. टाकणार 10. अन्न कल्याण योजनेंतर्गत तीन महिने मोफत धान्य पुरवठा 11. रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत 182 वरुन 202 रु.पर्यंत वाढ, 5 कोटींना फायदा 12. तीन कोटी ज्येष्ठ नागरिक,विधवा, दिव्यांगांना 1 हजार रु.सानुग्रह अनुदान 13. दिव्यांगांना 1 हजार रुपयांचे अतिरीक्त सानुग्रह अनुदान 14. जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना 3 महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान 15. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस सिलिंडर 16. आठ कोटी 30 लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत 3 महिने मोफत सिलिंडर 17. 63 लाख बचत गटांना 10 ऐवजी 20 लाखांचा व्याजमुक्त कर्जपुरवठा, 7 कोटी कुटुंबांना लाभ 18. 100 पेक्षा कमी कर्मचा-यांच्या कंपन्यांतील 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्यांचा EPF सरकार 3 महिने भरणार

महत्त्वाचे मुद्दे वाचा विस्ताराने 

-कोरोना महामारीमुळे ईपीएफच्या नियमात बदल करण्यास सरकार तयार आहे. जेणेकरुन पीएफ खात्यात जमा झालेला 75% नॉन रिफंडेबल रक्कम किंवा तीन महिन्यांचा पगार (जे कमी असेल ते) काढता येतील. 

-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) चे योगदान भारत सरकार देईल. नियोक्ता आणि कर्मचारी या दोघांच्या वतीने. हे पुढील तीन महिन्यांसाठी असेल. ज्या संस्थांमध्ये 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत आणि 90 % पेक्षा कमी कर्मचाऱ्यांचा पगार 15 हजारांपेक्षा कमी आहे, त्या संस्थाना लागू

-मातृशक्ती, महिला ज्यांचं जनधन खातं आहे, त्या साडेवीस कोटी लाख महिलांच्या खात्यात तीन महिन्यांसाठी दर महिन्याला 500 रुपये

– वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त एक हजार रुपये – तीन कोटी विधवा, वृद्ध, दिव्यांगाना लाभ, डायरेक्ट खात्यात मिळणार.

– मनरेगा माध्यमातून काम करणाऱ्यांची रोजंदारी 182 वरुन 202 रुपयांपर्यंत वाढवली

-130 कोटी जनतेचं पोट भरण्यासाठी शेतकरी दिवसरात्र राबतो त्यांना त्रास होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये भरणार, देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरले जातील

-पंतप्रधान अन्न योजनेअंतर्गत, एकही गरीब अन्नाशिवाय राहू नये याची दक्षता. जवळपास 80 लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल, सध्या मिळत असलेल्या सोडून अतिरिक्त मिळेल. शिवाय त्यासोबत एक किलो डाळही मोफत मिळेल

-वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ सफाई कर्मचारी यासारख्या योद्ध्यांना 50 लाखांचा आरोग्य विमा

-कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1 लाख 70 हजार कोटीचं पॅकेज, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरजूंना लाभ

-लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये याची काळजी घेऊ, अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Corona Package by Modi Government

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.