रेल्वेतून प्रवास केलेल्या 12 जण कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाचं संकट वाढलं

गेल्या आठवड्यात दुबईहून भारतात आलेल्या 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या चार कोरोनाबाधितांनी मुंबई ते दिल्लीला (COVID Positive Patient Travel from Express)  एक्सप्रेसमधून प्रवास केला.

रेल्वेतून प्रवास केलेल्या 12 जण कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाचं संकट वाढलं

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकड्यात झपाट्याने वाढ होत (COVID Positive Patient Travel from Express)  आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 297 झाली असून नुकतंच 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील चार कोरोनाबाधितांनी मुंबई ते जबलपूरला एक्सप्रेसमधून प्रवास केला. तर इतर आठ जणांनी दिल्लीतून रामगुंडम या ठिकाणी ट्रेनने प्रवास केला आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्च 2020 रोजी AP संपर्क क्रांती (COVID Positive Patient Travel from Express)  एक्सप्रेसने 8 जणांनी दिल्ली ते रामगुंडम या ठिकाणी प्रवास केला होता. या सर्वांचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

तर दुसरीकडे 16 मार्च 2020 रोजी B1 या डब्ब्यातून 11055 गोदान एक्सप्रेसने मुंबई ते जबलपूर दरम्यान प्रवास केलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. हे चौघेही गेल्या आठवड्यात दुबईहून भारतात आले आहेत. त्यांनी 16 मार्च रोजी मुंबई ते जबलपूर प्रवास केला होता. या चौघांचेही रिपोर्ट 19 मार्चला पॉझिटिव्ह आले आहेत. त्याबाबत रेल्वे मंत्रालयाने संबंधितांना ट्विट करत अलर्ट जारी केलं आहे.

या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळा. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केलं आहे, अशा काही सूचना दिल्या आहेत.

देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा हा शुक्रवारी (20 मार्च) 250 इतका (Corona Virus Confirm Cases) होता. मात्र शनिवारी या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने ही संख्या 297 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली. यात 32 विदेशी रुग्णांचा समावेश असून 17 इटालियन, 3 फिलिपीन्स, 2 ब्रिटेन तर प्रत्येकी एक कॅनडा, इंडोनेशिया आणि सिंगापूरचे रहिवाशी आहेत. तर आतापर्यंत दिल्ली, कर्नाटक, पंजाब आणि महाराष्ट्र या चार राज्यात एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.

दरम्यान देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 63 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पुण्यात 22 तर मुंबईत 21 कोरोनाबाधित रुग्ण (COVID Positive Patient Travel from Express)  आहेत.

Published On - 12:53 pm, Sat, 21 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI