Corona Update | भारतात गेल्या 24 तासांमध्ये 12,213 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, कोरोनाच्या केसेसमध्ये 40 टक्क्यांनी वाढ!

महाराष्ट्र 4,024 कोरोना केस, त्यानंतर केरळमध्ये 3,488, दिल्लीत 1,375, कर्नाटकमध्ये 648 आणि हरियाणामध्ये 596 रूग्ण हे कोरोना पाॅझिटिव्ह आहेत. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे एकटा महाराष्ट्रात 32.95 टक्के कोरोना रूग्ण आहेत. भारतात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या 5,24,803 झाली आहे. आतापर्यंत देशात एकूण 4,26,74,712 रुग्ण कोरोनाचे बरे झाले आहेत.

Corona Update | भारतात गेल्या 24 तासांमध्ये 12,213 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, कोरोनाच्या केसेसमध्ये 40 टक्क्यांनी वाढ!
सावधान! राज्यात आज नवे कोरोना रुग्ण वाढले
Image Credit source: aljazeera.com
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 16, 2022 | 12:36 PM

मुंबई : भारतामध्ये (India) कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या 24 तासांमध्ये 12,213 नवीन कोरोना रूग्णांची (Patient) नोंद झालीये. तर 11 जणांचा मृत्यू झालायं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत एकूण 7,624 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आले, सकारात्मक रेट 98.66 टक्के आहे. आता भारतामध्ये एकूण सक्रिय रूग्णांची संख्या 58,215 आहे. देशातील एकूण मृतांची संख्या आता 5,24,803 झाली आहे. भारतामध्ये मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे (Corona) पहिला मृत्यू झाला होता, त्यानंतर सातत्याने कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.

पाच राज्यांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ

महाराष्ट्रात 4,024 कोरोना केस, त्यानंतर केरळमध्ये 3,488, दिल्लीत 1,375, कर्नाटकमध्ये 648 आणि हरियाणामध्ये 596 रूग्ण हे कोरोना पाॅझिटिव्ह आहेत. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे एकटा महाराष्ट्रात 32.95 टक्के कोरोना रूग्ण आहेत. भारतात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या 5,24,803 झाली आहे. आतापर्यंत देशात एकूण 4,26,74,712 रुग्ण कोरोनाचे बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात एकूण 5,19,419 नमुने तपासण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून दररोज 8 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होते आहे. फक्त मंगळवारी हा आकडा कमी होता. 10 जूनला 8,328 आणि 11 जून रोजी 8,582 कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

सावधान मुंबईमध्ये धोका वाढतोय

मुंबईत बुधवारी 2,293 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आलीये. ही जानेवारीपासूनची सर्वाधिक रूग्णसंख्या आहे. कोरोनाच्या रूग्णांची मुंबईतील संख्या आता 10,85,882 वर पोहोचली, तर मृतांची संख्या 19,576 वर गेली आहे. तब्बल पाच महिन्यांनंतर मुंबईतील रूग्णसंख्येने 2,000 च्या टप्पा ओलांडला आहे. 23 जानेवारी रोजी मुंबईत 2,550 कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली होती. मुंबईचा पॉझिटिव्ह दर 13. 37 टक्के आहे. मुंबईमध्ये वाढणारी कोरोनाची आकडेवारी धक्कादायक आहे. जर अशीच आकडेवारी वाढत राहिले तर मास्कची सक्ती करण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे आवश्यक आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें