Corona Vaccination : 11 एप्रिलपासून तुमच्या कार्यालयातच कोरोना लस मिळणार, केंद्राकडून राज्यांना तयारीचे निर्देश

ज्या कार्यालयात 100 कर्मचारी असतील अशा ठिकाणीच कोरोना लसीकरण केंद्र बनवलं जाईल. 11 एप्रिलपासून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अशा प्रकारची लसीकरण केंद्र सुरु केली जाऊ शकतात.

Corona Vaccination : 11 एप्रिलपासून तुमच्या कार्यालयातच कोरोना लस मिळणार, केंद्राकडून राज्यांना तयारीचे निर्देश
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 9:31 PM

मुंबई : सर्व सरकारी आणि खासगी कंपनी/कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून आता तुमच्या कार्यालयातच तुम्हाला कोरोना लस दिली जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ज्या कार्यालयात 100 कर्मचारी असतील अशा ठिकाणीच कोरोना लसीकरण केंद्र बनवलं जाईल. 11 एप्रिलपासून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अशा प्रकारची लसीकरण केंद्र सुरु केली जाऊ शकतात. तसे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. (Corona vaccine will now be given in private or government offices)

केंद्र सरकारकडून जारी केलेल्या आदेशानुसार कुठल्याही खासगी किंवा सरकारी कार्यालयात लस घेण्यासाठी 100 पात्र किंवा इच्छुक कर्मचारी असतील अशा कार्यालयातच कोरोना लसीकरण केंद्र बनवलं जाईल. राज्यांना या मोहिमेत सहयोग देण्यासाठी केंद्राकडून दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. देशात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. यापूर्वी 60 वर्षांवरील नागरिकांनाच कोरोनाची लस दिली जात होती. अशा स्थितीत कार्यालयातही वयोगटाच्या मर्यादेनुसार 100 पात्र/इच्छुक असतील तर तिथेच लसीकरण केंद्र सुरु केलं जाणार आहे.

कार्यालयांची निवड कशी होणार?

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स आणि महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील अर्बन टास्क फोर्स कर्मचाऱ्यांची संख्या आणि पात्रतेच्या आधारावर सरकारी आणि खासगी कार्यालयांची निवड करतील. कार्यालय प्रशासन आपल्या स्टाफमधीलच वरिष्ठ कर्मचाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करतील. हे नोडल अधिकारी जिल्हा आरोग्य विभाग आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रांशी समन्वय साधतील.

नोडल अधिकारी कार्यालयात होणाऱ्या लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधांची पुर्तता करतील. त्यात नाव नोंदणी, फिजिकल आणि अन्य गोष्टींची पडताळणी नोडल अधिकाऱ्यांकडून केली जाईल.

लसीच्या तुटवड्यावरुन महाराष्ट्रात राजकारण रंगलं

राज्यात 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा झाला नाही तर तीन दिवसांत लसरीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केलीय. त्यावर राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते लसीकरणा संदर्भात करत असलेला आरोप चुकीचा आहे. राज्यातील लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक पुरवठा करण्यात येत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलाय.

या गोष्टी माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्राशी चर्चा करणं गरजेचं आहे. अशी चर्चा केली जात नाही. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे बंद झालं पाहिजे. विरोधकांना म्हणायचं राजकारण करु नका आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करायचं हे योग्य नाही, असंही फडणवीसांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

‘कोरोना लसींबाबत केंद्राशी बोला, माध्यमांशी बोलून हात झटकणं बंद करा’, फडणवीसांचा खोचक सल्ला

राज्यात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा, कुठे काळाबाजार, तर कुठे मेडिकलबाहेर रांगा

Corona vaccine will now be given in private or government offices

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.