नवी दिल्ली: गेल्या 24 तासांमध्ये देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झालेली दिसत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात देशात कोरोनाच्या 80834 नव्या कोरोना रुग्णांची (Coronavirus) नोंद झाली. तर 3303 जणांचा मृत्यू झाला. तर काल दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या 1,32,062 रुग्णांना घरी सोडण्यात आले. (Coronavirus patients in India last 24 hours)
देशातील नव्या कोरोना रुग्णांचे दैनंदिन प्रमाण आता एक लाखाच्या खाली आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ही अद्यापही चिंतेची गोष्ट आहे.
देशात 24 तासात नवे रुग्ण – 80,834
देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,32,062
देशात 24 तासात मृत्यू – 3,303
एकूण रूग्ण – 2,94,39,989
एकूण डिस्चार्ज – 2,80,43,446
एकूण मृत्यू – 3,70,384
एकूण सक्रिय रुग्ण – 10,26,159
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 25,31,95,048
India reports 80,834 new #COVID19 cases, 1,32,062 patient discharges, and 3,303 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry.
Total cases: 2,94,39,989 Total discharges: 2,80,43,446 Death toll: 3,70,384 Active cases: 10,26,159
Total vaccination: 25,31,95,048 pic.twitter.com/SFoVHtjgeK
— ANI (@ANI) June 13, 2021
राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 10697 नव्या रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारपेक्षा ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे. यामुळे आजपर्यंत राज्यात करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 58 लाख 98 हजार 550 इतकी झाली आहे. मात्र, त्याचवेळी यातले 56 लाख 31 हजार 767 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.48 टक्के इतका झाला आहे. तर 14910 रुग्णांना काल दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला.
सध्या राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडताना दिसत आहेत. लॉकडाऊन करुनही येथील परिस्थितीत विशेष फरक पडलेला नाही. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर राज्य सरकार काही मोठी पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.
संबंधित बातम्या:
Coronavirus: रत्नागिरीत आठ दिवसांचा लॉकडाऊन फेल; कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये राज्यात दुसरा क्रमांक
वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार
(Coronavirus patients in India last 24 hours)