देशावर पुन्हा कोरोनाचे संकट, मास्क लावण्याची खरंच गरज आहे का? काय सांगतात डॉक्टर वाचा..
देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी कोरोना पुन्हा एक मोठा धोका ठरत आहे? घराबाहेर पडताना मास्क लावणे गरेजेचे आहे का? या विषयी डॉक्टरांकडून जाणून घेऊ...

पुन्हा एकदा संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. त्यामुळे रुग्णालयांपासून कार्यालयांपर्यंत कोविडबाबत सल्लामसलत जारी करण्यात आली आहे. देशातील दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या अचानक वाढताना दिसत आहे. यामुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा कोविडबाबत भीती निर्माण झाली आहे. काही खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सूचना दिली आहे. व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे हे सर्व केले जात आहे.
आकडेवारीवर नजर टाकूया
भारतात कोविडच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 1,000च्या पुढे गेला आहे. अनेक राज्यांमध्ये ही संख्या वाढतच चालली आहे. आरोग्य मंत्रालय आणि तज्ज्ञांनी लोकांना मास्क लावण्याची सूचना केली आहे. कोविडचे रुग्ण वाढल्यानंतर आता लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की या वेळी कोरोना पुन्हा एक मोठा धोका ठरत आहे? घराबाहेर पडताना मास्क लावणे गरेजेचे आहे का? याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेऊया… वाचा: हगवणेचं मोठं कांड! स्वत:च्या बापालाही सोडलं नाही, जीवंतपणीच मारण्याचा प्रयत्न… काय होता नेमका डाव?
या वेळी कोरोना किती धोकादायक आहे?
दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुभाष गिरी यांनी TV9शी संवाद साधताना सांगितले की, कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या मागचे खरे फ्लूचे रुग्ण आहेत. फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची कोविड तपासणी केली जात आहे. त्यांपैकी काही जण कोविड पॉझिटिव्ह सापडत आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. दुसरे कारण म्हणजे, कोरोना व्हायरसमध्ये काही बदल झाले आहेत. त्यामध्ये JN.1 आणि NB.1.8.1 असे दोन नवीन वेरिएंट समोर आले आहेत. लोक या वेरिएंटमुळे संक्रमित होत आहेत आणि त्यांमध्ये कोविडची लक्षणे दिसत आहेत.
डॉ. सुभाष सांगतात की, कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी, आता हा व्हायरस पूर्वी इतका धोकादायक नाही. त्याची लक्षणे सामान्य खोकला, सर्दी यासारखी आहेत. पण निष्काळजीपणा टाळणे आवश्यक आहे. सध्याच्या घडीला गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, लक्षणे दिसल्यास तपासणी करणे आणि घरात वृद्ध किंवा लहान मूल असल्यास त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
कोविडमुळे मृत्यू वाढत आहेत?
महामारी तज्ज्ञ डॉ. जुगल किशोर सांगतात की, रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण असतात जे गंभीर आजारांशी झुंज देत असतात. काही रुग्णांची स्थिती गंभीर असते. काही प्रकरणांमध्ये हे रुग्ण कोविड पॉझिटिव्हही असतात. अशा परिस्थितीत जर या रुग्णांचा मृत्यू आजारामुळे झाला, तर तो कोविड मृत्यू म्हणूनही गणला जातो. पण याचा अर्थ असा नाही की, त्यांचा मृत्यू फक्त कोरोनामुळेच झाला आहे. मृत्यूचे कारण जुने आजार देखील असतात. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. पण सध्या कोविडचे नवीन वेरिएंट आणि त्यांची लक्षणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर लक्षणे हलकी असतील, तर कोरोनामुळे कोणताही धोका नाही.
कसा करावा बचाव?
डॉ. सुभाष सांगतात की, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, वृद्ध आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या लोकांनी मास्क लावून बाहेर पडावे आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहावे. घरात कोणाला फ्लूची लक्षणे असतील, तर त्याच्याशी संपर्क टाळावा. कोविडची लक्षणे दिसल्यास तपासणी नक्की करावी.
