AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, कशी असते धर्मगुरुंच्या समाधीची प्रक्रिया?

भू समाधी ही संन्यासींनाच दिली जाते. शिवाय गुरुंच्या समाधीजवळच किंवा त्यांच्या मठात समाधी दिली जाते. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनाही त्यांच्या आश्रमात भूमी समाधी देण्यात येणार आहे. पद्मासन किंवा सिद्धासनाच्या मुद्रेत बसून त्यांना समाधी दिली जाणार आहे.

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, कशी असते धर्मगुरुंच्या समाधीची प्रक्रिया?
हिंदू धर्मगुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन
| Updated on: Sep 12, 2022 | 3:08 PM
Share

मुंबई : हिंदूचे सर्वात मोठे (Religious leader) धर्मगुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी मध्यप्रदेशातील नरसिंगपूर येथील आक्षमात वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. अखेर 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घटनेच्या 24 तासानंतर म्हणजेच सोमवारी दुपारी नरसिंहपूर येथील गोटेगाव येथील ज्योतेश्वर येथील परमहंसी (Ganga Ashram) गंगा आश्रमात त्यांना ‘भूमी समाधी’ देण्यात येणार आहे. या विधीसाठी दोन तास लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. धर्मगुरुंच्या निधनानंतर भूमी समाधीला वेगळे महत्व असून नेमकी ही प्रक्रिया असते कशी हेच आपण जाणून घेणार आहोत.

म्हणून भू समाधी..!

हिंदू धर्मामध्ये सहसा मृत्यूनंतर जाळले जाते. मात्र, संत संताचे अंत्यसंस्कार हे वेगळे असतात. त्यांना जाळले जात नाहीतर भूमीसमाधी दिली जाते. यामागेही एक कारण आहे. संत हे संन्यासी होण्यापूर्वीच स्वत:ला दान देऊन टाकतात. त्यामुळे त्यांचा आत्मा हा इतर सर्वसामान्यांप्रमाणे भटकंती करीत नाही. त्यामुळे त्यांना जाळून टाकण्याची गरज नाही. म्हणून भू समाधी म्हणजेच जमिनीच पुरले जाते.

भू समाधीची प्रक्रीया कशी?

सन्यांसींचा भावना ही परोपरकाराची असते. त्यांच्या शरीराचा उपयोग देखील परोपकारासाठीच केला जातो. भू समाधी ही सात टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाते. – मृदेहाला अगोदर गंगेतील पवित्र पाण्याने अंघोळ घातली जाते – शरीर पायथ्याला बसवलेले असते – त्यानंतर सर्व अंगाला भस्म लावले जाते – ही सर्व प्रक्रिया झाल्यावर समाधीस्थळी बसवले जाते. – त्याच ठिकाणी नवीन कपडे घातले जातात. तर हार, तुरे, चंदन हे अर्पन केले जाते. – त्यानंतर सर्व शरीर हे झाकले जाते – शेवटी समाधीवर शेणाचा लेप लावला जातो.

कोणत्या अवस्थेत भू समाधी?

भू समाधी ही संन्यासींनाच दिली जाते. शिवाय गुरुंच्या समाधीजवळच किंवा त्यांच्या मठात समाधी दिली जाते. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनाही त्यांच्या आश्रमात भूमी समाधी देण्यात येणार आहे. पद्मासन किंवा सिद्धासनाच्या मुद्रेत बसून त्यांना समाधी दिली जाणार आहे.

समाधीनंतर पुढे काय होते ?

समाधी घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्या ठिकाणी एक कार्यक्रम पार पाडला जातो. त्यापूर्वी दरम्यानच्या काळात मठाचे सर्व पदाधिकारी हे उत्तराधिकारी यांची निवड करतात. व या कार्यक्रमानंतर त्या मठाचा कारभार ज्यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे त्यांच्याकडे सोपवला जातो. स्वामी स्वरूपानंद यांनी उत्तराधिकाऱ्यांची घोषणा पू्र्वी तर केली नव्हती. पण त्यांच्या इच्छा पत्रात त्याचा उल्लेख असे सांगितले जाते.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.