Video : हाहा:कार… हाहा:कार… हाहा:कार…. खांब कोसळले, वृक्ष उन्मळून पडले, एक्सप्रेस रद्द; महावादळ बिपरजॉयचा प्रचंड तडाखा

गुजरातमध्ये बिपरजॉयने हाहा:कार उडवून दिला आहे. द्वारका येथे बिपरजॉयचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

Video : हाहा:कार... हाहा:कार... हाहा:कार.... खांब कोसळले, वृक्ष उन्मळून पडले, एक्सप्रेस रद्द; महावादळ बिपरजॉयचा प्रचंड तडाखा
Cyclone BiparjoyImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 6:51 AM

अहमदाबाद : गुजरातमध्ये महावादळ बिपरजॉयने प्रचंड कहर केला आहे. या वादळामुळे गुजरातच्या कच्छमध्ये दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब कोसळले आहेत. रस्त्यावर प्रचंड पाणी भरले आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. द्वारकातही प्रचंड वेगाने वारे वाहत असून प्रचंड पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जागोजागी वृक्ष, विजेचे खांब आणि होर्डिंग्ज कोसळल्या आहेत. प्रशासनाने आधीच सर्व तयारी केली होती. त्यामुळे मोठं नुकसान झालं नाही. मात्र, बिपरजॉयमुळे गुजरातमध्ये हाहा:कार उडालेला आहे.

राज्याला बिपरजॉय वादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज 6 जून रोजी वर्तवण्यात आला होता. त्यानंतर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. 74 हजार लोकांना लोकांची शेल्टरमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या ज्या परिसराला वादळाचा फटका बसणार आहे. त्या परिसरात मोठी खबरदारी घेतली होती. एअरक्राफ्टपासून शिप्सपर्यंत सर्वकाही तयारी होती. तरीही या वादळाने गुजरातच्या अनेक भागात हाहा:कार उडवला आहे. या वादळामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मात्र, कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही. प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली होती, त्यामुळे मोठी मनुष्यहानी टळली.

हे सुद्धा वाचा

बत्ती गुल, 200 विजेचे खांब पडले

गुजरातच्या भुजमध्ये 200 विजेचे खांब कोसळळे आहेत. या परिसरातील 6 वीज उपकेंद्र ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बत्तीगुल झाली आहे. 15 हून अधिक वॉटर वर्क्स सेंटरमध्ये अडचणी येत आहेत. रस्त्यांवर सुमारे 200 वृक्ष उन्मळून पडले आहेत. एवढं सर्व होऊनही परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. आण्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. कमीत कमी नुकसान होईल याची आम्ही खबरदारी घेत आहोत, असं प्रशासनाने म्हटलं आहे. भुजच नव्हे तर द्वारका, कच्छ आणि जामनगरमध्येही हीच परिस्थिती आहे.

प्रचंड वारे, महाराष्ट्र, राजस्थानला फटका

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वादळाचा वेग प्रतिताशी 115 किलोमीटर ते 125 किलोमीटर आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने ताशी 140 ते 150 किलोमीटर वारे वाहतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्यापेक्षा कमी वेगाने वारे वाहत आहेत. या वादळाचा फटका गुजरातसह महाराष्ट्रातही बसला आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावरील राज्यांनाही या वादळाचा फटका बसला आहे. राजस्थानातील काही भागातही या वादळाचा परिणाम दिसला. 16 जून आणि 17 जून रोजी काही भागात वादळाचा परिणाम राहणार आहे. या दरम्यान वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

99 एक्सप्रेस रद्द

बिपरजॉय वादळामुळे गुजरातमध्ये अनेक स्थानकात रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. बिपरजॉयमुळे 99 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं आहे. या वादळात 22 जण जखमी झाले आहेत. तर विजेचे खांब कोसळल्याने 940 गावात अंधार पसरला आहे.

Non Stop LIVE Update
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.