Maharashtra Breaking Marathi News Live | राज्य सरकार लवकरच दोन टप्प्यातील एफआरपीचा निर्णय एका टप्प्यात; सरकारचा निर्णय

| Updated on: Jun 16, 2023 | 7:07 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | राज्य सरकार लवकरच दोन टप्प्यातील एफआरपीचा निर्णय एका टप्प्यात; सरकारचा निर्णय
Marathi News Live Image Credit source: tv9 marathi

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार. शिंदे गट आणि भाजपमधील वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार. आज ऊस दर नियंत्रणाबाबत बैठक होणार. बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं आंदोलन स्थगित. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Jun 2023 10:56 PM (IST)

    राज्य सरकार लवकरच दोन टप्प्यातील एफआरपीचा निर्णय एका टप्प्यात; सरकारचा निर्णय

    पुणे :

    राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लवकरच दोन टप्प्यातील एफआरपीचा निर्णय एका टप्प्यात करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यात येणार असून त्याबाबतचा लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

  • 15 Jun 2023 10:52 PM (IST)

    पुण्यात पीएमपीएल बस चोरीला; बसमधील बॅटरी घेऊन चोरटा पसारा…

    पुणे :

    पुण्यात पीएमपीएल बस चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. पालखी सोहळ्यामुळे पीएमपी बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने ती बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली होती. त्यावेळी बसमध्ये चावी असल्याचे पाहून चोरट्याने चक्क बस पळवून घेऊन गेला होता. त्यानंतर ती बस मार्केट यार्ड परिसरात सोडून चोरटा पसार झाल्याचे उघडकीस आले. यावेळी चोरट्याने बसमदील 5 हजारांची बॅटरी चोरून घेऊन गेल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 15 Jun 2023 10:23 PM (IST)

    धार्मिक पोस्ट करणाऱ्या दोघां विरोधांत इंदापूरात गुन्हा दाखल; सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न

    इंदापूर :

    धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट प्रसारित केल्याबद्दल दोघांविरोधात इंदापूर पोलिसांनी कारवाई केली आहे.  सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करण्यात आल्या होत्या. इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द येथील दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या पोस्ट व्हायरल केल्या होत्या. त्याप्रकरणी आता इंदापूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मा-धर्मामध्ये द्वेषभावना निर्माण होईल अशी पोस्ट प्रसारित करीत सार्वजनिक शांततेचा भंग करणारी पोस्ट केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

  • 15 Jun 2023 10:22 PM (IST)

    धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट प्रसारित केल्याबद्दल दोघांविरोधात गुन्हा

    पुणे : इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द येथील दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट प्रसारित केल्याबद्दल इंदापूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मा-धर्मामध्ये द्वेषभावना निर्माण होईल, अशी पोस्ट प्रसारीत करीत सार्वजनिक शांततेचा भंग करणारी पोस्ट प्रसारीत केली. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद केले आहे.

  • 15 Jun 2023 10:19 PM (IST)

    काँग्रेस ओबीसींच्या मतांवरच भाजपला भारी पडणार ; काँग्रेसचा प्लॅन ठरला...

    नवी दिल्ली : देशातील आगामी काळातील  होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच ओबीसीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय लढाई आता अधिक रंजक बनली आहे. भाजपच्या हल्ल्यानंतर काँग्रेसनेही आता भाजपला ओबीसीविरोधी ठरवले आहे.  काँग्रेस सातत्याने जात जनगणनेची मागणी करत असून आरक्षण ती मर्यादा  50 टक्क्यांवरून वाढवण्याची मागणी करून भाजपला गोत्यात आणण्याचे प्रयत्न उभा केले आहेत. 2024 ची लोकसभा निवडणुकीसाठी आता काँग्रेसने आता शड्डू ठोकला आहे.

  • 15 Jun 2023 10:03 PM (IST)

    बिपरजॉय चक्रीवादळचा तडाखा, 95 किमी प्रतीतासाच्या वेगाने वारे

    कच्छ : बिपरजॉय चक्रीवादळ आज संध्याकाळी सहा वाजता गुजरातच्य किनारपट्टीवर धडकलं. त्यानंतर अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. या दरम्यान जखाऊ पोर्ट पासून पुढे नलिया येथे सर्वाधिक 95 किमी प्रतीतासाच्या वेगाने वारे वाहिले. दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मांडवी, मुद्रा, नलिया, लखपत येथील वीड कापण्यात आली आहे.

  • 15 Jun 2023 09:43 PM (IST)

    'हे निगरगट्ट, यांच्या दातखिळ्या बसल्या', एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजन यांच्यावर निशाणा

    जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी कापसाच्या भावावरुन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. "हे सरकारमधले मंत्री निगरगट्टं आहेत. ते आता कोणत्या बिळात लपले आहेत हे कळत नाही. दहा वर्षांपूर्वी आमचे गिरीश महाजन यांनी कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी आमरण उपोषण केलं होतं. मात्र आता कापसाला साडेसहा हजार रुपये फक्त भाव आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तर हे कुठे आहेत?", असा सवाल खडसेंनी केलाय.

    "हे सरकार धीमं आहे. कापसाच्या भाववाडीबाबत सरकारमधील मंत्री आपलं वजन सरकार दरबारी खर्च करायला तयार नाहीत. मंत्री निगरगट्टं आहेत. धीमं आहेत. यांच्या दातखिळ्या बसल्या आहेत. विरोधात असणारे हेच मंत्री आंदोलन करायला उतरले होते. मात्र आता कोणत्या बिळात लपले आहेत कळत नाही", अशी टीका खडसेंनी केली.

  • 15 Jun 2023 09:17 PM (IST)

    वणीच्या सप्तशृंगी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचे प्रकरण, बैठकीत नेमका निर्णय काय?

    नाशिक : नाशिकमध्ये नवनियुक्त अध्यक्षांसोबत मंदिर विश्वस्त यांच्यात बैठक पार पडली. नाशिकच्या द्वारका परिसरातील मंदिर संस्थानच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीत वस्त्र संहिताबाबत काय निर्णय होतो, याकडे अनेकांचं लक्ष होतं. पण आजच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काही दिवसांनंतर पुन्हा दुसरी बैठक होणार आहे. याबाबत पुढच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विश्वस्तांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलाय.

  • 15 Jun 2023 08:57 PM (IST)

    Cyclone Biporjoy | वडोदऱ्यात मुसळधार पाऊस, बिपरजॉयचा चक्रीवादळाचा प्रभाव

    गांधीनगर | गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे वडोदरात प्रभाव पाहायला मिळाला. वडोदऱ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

    वडोदऱ्यात मुसळधार पाऊस

  • 15 Jun 2023 08:54 PM (IST)

    Shiv Sena Bjp | शिंदे फडणवीस यांनी युतीमधील वाद मिटवला

    मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतील युतीमधील वाद मिटवला आहे. श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांना युतीधर्माचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. शिंदे-फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर श्रीकांत शिंदे याच्यांशी चर्चा झाली. तसेच पालघरमधील 'शासन आपल्या दारी'या कार्यक्रमावेळी रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. त्यामुळे एकमेकांवर होणारी शेरेबाजी थांबावी आणि वाद थांबवल्याचं शिंदे-फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

  • 15 Jun 2023 08:28 PM (IST)

    शाळेला वर्गखोल्या नसल्यामुळे अधिकाऱ्याच्याच दालनात बसून विद्यार्थ्यांचा अभ्यास

    संभाजीनगर | राज्यात आजपासून (15 जून) शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालीय. शाळेच्या पहिल्याच दिवशी गट शिक्षणाधिकाऱ्याच्याच दालनात शाळा भरवण्यात आली आहे. शाळेला वर्गखोल्या नसल्यामुळे अधिकाऱ्याच्या दालनात शाळा भरवण्यात आली. या दालनातच बसून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करुन घेण्यात आला. संभाजीनगरमधील करंजगावातील हा प्रकार आहे.

  • 15 Jun 2023 08:18 PM (IST)

    Pune Akashwani | आकाशवाणी पुणे केंद्र प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मागे

    पुणे | पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आकाशवाणी पुणे केंद्र प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सीएमओ या ट्विटर हॅन्डलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

    प्रसारभारतीकडून पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग 19 जूनपासून बंद करण्याचे आदेश काढण्यात आले होते. या निर्णयावरुन पुणेकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार हा निर्णय मागे घेण्यात आला.

  • 15 Jun 2023 07:58 PM (IST)

    शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ 

    राज्यात सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बनकरवाडी येथे एक वेगळे चित्र बघायला मिळाले. इंदापूर तालुक्यातील बनकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांवरती शाळेच्या पहिल्याच दिवशी पक्की इमारत नसल्याने वर्गात न बसता शाळेबाहेरील झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आल्याचा प्रकार उघडकीस झालाय. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये विद्यार्थ्यांवर ही वेळ आल्याने नाराजी व्यक्त केली जातंय.

  • 15 Jun 2023 07:48 PM (IST)

    रोहित पवार यांची सरकारवर सडकून टीका

    रोहित पवार यांनी नुकताच मोठे विधान केले आहे. रोहित पवार म्हणाले की, दोन पक्ष कोण जास्त ताकदवान हे सांगण्यामध्ये जास्त गुंतलेले आहेत. मीडिया असेल किंवा शाब्दिक असेल या माध्यमातून ते कोण श्रेष्ठ यामध्ये ते गुंतून पडले आहेत आणि तसेच सर्वसामान्य माणसांचे प्रश्न गुंतून पडले आहेत. जाहिरातीवर प्रश्न विचारला पाहिजे. मात्र या अगोदरच खूप प्रश्न प्रलंबित आहेत त्यांची उत्तर मिळालेली नाहीत. जाहिरातीच्या मदतीने खर्च लोकांना सांगावा लागत की श्रेष्ठ कोण, यामध्येच सरकारची हार दिसत आहे.

  • 15 Jun 2023 07:36 PM (IST)

    संजय राऊत धमकी प्रकरणांमध्ये पाच जणांना अटक 

    संजय राऊत धमकी प्रकरणांमध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे.  गोवंडी परिसरातून दहा तारखेला रिजवान जुल्फिकार अन्सारी आणि शाहिद अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर याच परिसरातून आकाश पटेल याला अटक करण्यात आली. या तिघांकडून मिळालेल्या माहितीवरून 13 तारखेला मुन्ना शेख याला ठाण्यातून अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर 14 तारखेला मयूर शिंदे हा पाचवा आरोपी गजाआड झाला.आज मुन्ना शेख आणि मयूर शिंदे या दोघांना मुलुंड न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • 15 Jun 2023 07:27 PM (IST)

    सूर्यफुलाच्या खरेदीवरून जेलमध्ये गेलेल्या शेतकरी नेत्याची सुटका

    हरियाणामध्ये एमएसपीवर सूर्यफुलाच्या खरेदीच्या मुद्द्यावर अटक करण्यात आलेले भारतीय किसान युनियनचे प्रमुख गुरमानसिंग चधुनी हे आपल्या 9 शेतकरी सहकाऱ्यांसह तुरुंगातून बाहेर आले आहेत. गुरमान सिंह चधुनी यांनी मागे काही दिवसांपूर्वी एमएसपीबाबत शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं.

  • 15 Jun 2023 07:23 PM (IST)

    भाजपच्या ज्ञानेश्वर भामरे यांचा होणार राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

    धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे होणाऱ्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला नुकताच सुरूवात झाली आहे.  या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. भाजपचे धुळे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये जाहीर प्रवेश आज होणार आहे. धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीमधील अंतरंगात वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर समोर आला आहे.  शहराध्यक्ष यांनी ज्ञानेश्वर भामरे यांचा विरोधात बॅनर लावले आहेत.

  • 15 Jun 2023 07:17 PM (IST)

    नाशिकमधील धक्कादायक प्रकार पुढे

    नाशिकमधील एक धक्कादायक प्रकार पुढे येतोय.  5 हजाराची लाच घेताना कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकलाय. आढाव असे लाच घेणाऱ्या दुकान निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या हॉटेलमध्ये बालकामगार काम करत असल्याचे आढळून आल्यावर कारवाई टाळण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीमध्ये दहा हजार रुपये ठरले होते.  त्यापैकी पाच हजार रुपये घेताना आज त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

  • 15 Jun 2023 07:09 PM (IST)

    हजारो शेतकरी धान विक्रीपासून राहणार वंचित

    भंडारा शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. कारण हजारो शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार आहेत. केंद्रावर ऑनलाइन नोंदणीची आज शेवटचा तारीख होती. मात्र, मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे.

  • 15 Jun 2023 06:57 PM (IST)

    धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याचा सिद्धरामय्या सरकारचा निर्णय

    सिद्धरामय्या मंत्रिमंडळाने मागील भाजप सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. RSS संस्थापक हेडगेवार आणि इतर काही विषय शालेय पाठ्यपुस्तके काढून टाकण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.

  • 15 Jun 2023 06:46 PM (IST)

    DAC ने प्रीडेटर ड्रोनच्या अधिग्रहणास दिली मान्यता

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने यूएस निर्मित प्रीडेटर ड्रोनच्या अधिग्रहणास मान्यता दिली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील महत्त्वपूर्ण करार झाला आहे.DAC ने जनरल अॅटॉमिक्सकडून सशस्त्र शिकारी मानवरहित हवाई वाहन (UAV) खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.

  • 15 Jun 2023 06:42 PM (IST)

    पूर्वीचं शासन आपल्या घरी होतं, पण हे सरकार आपल्या दारी- मुख्यमंत्री शिंदे

    पावणे दोनशे गिरणी कामगारांना घराच्या चाव्या दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसेच 4000 लोकांची घरं 3 महिन्यात पूर्ण करणार असल्याच शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. पूर्वीचं शासन आपल्या घरी होतं. पण हे सरकार आपल्या दारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

  • 15 Jun 2023 06:33 PM (IST)

    शिल्पा शेट्टीच्या घरात घुसलेल्या दोन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात चोरीची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. जुहू येथील घरात ही चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात अभिनेत्रीच्या जुहू येथील निवासस्थानातून काही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

  • 15 Jun 2023 06:25 PM (IST)

    धुळ्यातील राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर

    धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. अजित पवार यांच्या सभेपूर्वीच स्थानिक राष्ट्रवादीतील वाद समोर आला आहे. प्रभारी अध्यक्ष एकनाथ भावसार यांनी कार्यक्रमस्थळी मोठा बॅनर लावत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपातून आलेल्या ज्ञानेश्वर भामरेंच्या प्रवेशावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • 15 Jun 2023 06:15 PM (IST)

    बिपरजॉयबाबत गृहमंत्री अमित शाह यांची बैठक

    केंद्रीय गृहमंत्री अमित बिपरजॉय वादळाच्या संदर्भात गृह मंत्रालयात बैठक घेत आहेत. बैठकीत अमित शहा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्याकडून प्रत्येक क्षणाची माहिती घेत आहेत. एनडीआरएफचे डीजी आणि इतर बचाव पथकांचे अधिकारीही या बैठकीत सहभागी आहेत.

  • 15 Jun 2023 06:12 PM (IST)

    संजय राऊत धमकी प्रकरणी एकूण 5 जणांना अटक

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. तीन जणांना गोवंडीतून, तर दोघांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. रिझवान अन्सारी, शाहीद अन्सारी आणि आकाश पटेल यांना अटक करण्यात आली आहे. तर मुन्ना शेख आणि मयुर शिंदे यांना आधीच अटक करण्यात आली आहे. संजय राऊत धमकीप्रकरणी कांजुरमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

  • 15 Jun 2023 06:04 PM (IST)

    पोरबंदर, जामनगर, राजकोट आणि द्वारका येथे चक्रीवादळाचा धोका वाढला - IMD

    बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका झपाट्याने वाढत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पोरबंदर, जामनगर, राजकोट आणि देवभूमी द्वारका इत्यादी कच्छच्या आखाताला लागून असलेल्या सर्व जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव दिसेल. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत प्रभाव दिसून येईल.

  • 15 Jun 2023 05:51 PM (IST)

    अण्णा हजारे यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हजारे यांच्याकडून अजून समाज सेवा घडत राहो, अशी आशा व्यक्त केली. तर हजारे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

  • 15 Jun 2023 05:39 PM (IST)

    कच्छच्या किनाऱ्यावर बिपरजॉयचा कहर

    कच्छच्या किनाऱ्यावर बिपरजॉयचा कहर दिसून आला. कच्छ जिल्ह्यातील पोरबंदर, जामनगर, राजकोट आणि द्वारकामध्ये चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपासून ते मध्यरात्रीपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • 15 Jun 2023 05:26 PM (IST)

    राज्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट-धनंजय मुंडे

    ऐन पेरणीच्या तोंडावर राज्यात सोयाबीन आणि कपाशी यांच्या बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. कबड्डी हा कपाशीचा वाण 850 रुपयांचा आहे. पण आज तो शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांना खरेदी करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. वेळीच या प्रकारांना आळा घालण्याची मागणी त्यांनी केली.

  • 15 Jun 2023 05:15 PM (IST)

    संजय राऊत यांच्यावर नितेश राणे यांची टीका

    संजय राऊत यांच्याविषयी नितेश राणे यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे. दोघांमध्ये रोज वाकयुद्ध सुरु आहे. दरम्यान ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत सकाळपासून गायब असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

  • 15 Jun 2023 05:07 PM (IST)

    पालघरमधील 3 हजार तरुणांना नोकऱ्या देणार- राज्य सरकार

    शासन आपल्या दारी या राज्य सरकारच्या महत्वकांक्षी उपक्रमात पालघरमधील 3 हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिका लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

  • 15 Jun 2023 05:03 PM (IST)

    खाद्यतेल अजून होणार स्वस्त, केंद्र सरकारने टाकले महत्वाचे पाऊल

    गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात खाद्यतेलाच्या किंमतीत 6 टक्क्यांची घसरण झाली होती. आता खाद्यतेलाच्या किंमतीत पुन्हा घसरण होऊ शकते. केंद्र सरकारने रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावरील आयात शुल्क 17.5 टक्क्यांहून 12.5 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी याविषयीची अधिसूचना काढली. देशातंर्गत बाजारात तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल टाकलं आहे.

  • 15 Jun 2023 04:48 PM (IST)

    लोकलमध्ये महीला पोलीस ठेवा - विरोधी पक्ष नेते अजित पवार

    लोकलच्या डब्यात महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडल्याने आता मुंबईच्या लोकलमध्ये महीला पोलीस ठेवण्याची मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. सरकार कडक वागत नाही तोवर कायदा आणि सुव्यवस्था राहणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे. काल सीएसएमटी ते पनवेल लोकलमध्ये एका तरुणीचा धावत्या लोकलमध्ये विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली आहे.

    शिवतारे यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले की डोकं चालवायचं नाही. काहीही बोलतात. साहेबांनी आधी स्पष्ट केले आहे की प्रत्येकाच्या बोलण्याला उत्तर द्यायला आपण बांधील नाही, जनतेने त्यांना नाकारले आहे. संस्कारच त्यांच्यावर असे झालेत ? पण काय बोलणार असा टोला त्यांनी लगावला. कापूस उत्पादकांच्या प्रश्न आपण अधिवेशनात मांडणार आहोत, कुठेही शेतकर्याला मदत मिळालेली नाही. कांद्याची अनुदान नाही मिळाले. भ्रष्ट मित्रांबद्दल कोणी अवाक्षर काढायला तयार नाही. सर्वत्र भ्रष्टाचार आहे. सरकारमधील प्रमुख का लक्ष द्यायला तयार नाहीत. सरकार अल्पमतात येइल अशी भिती असावी म्हणून कारवाई करीत नाहीत असेही ते म्हणाले.

  • 15 Jun 2023 04:20 PM (IST)

    बिपरजॉयचा मान्सूनवर परिणाम नाही - IMD

    केरळमध्ये सुरुवातीच्या विलंबानंतर, नैऋत्य मान्सून रविवारपासून दक्षिण द्वीपकल्प आणि देशाच्या पूर्व भागात पुढे सरकणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, “बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनच्या पुढील प्रगतीवर आणि हंगामी पर्जन्यमानाच्या प्रगतीवर कोणताही परिणाम होणार नाही. चक्रीवादळ बिपरजॉय ओमानच्या दिशेने वायव्येकडे सरकले असते, तर त्याचा मान्सूनच्या प्रवाहावर परिणाम झाला असता

  • 15 Jun 2023 03:55 PM (IST)

    धाराशिव - सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरु

    महावितरणच्या दारात सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण आंदोलन सुरु झाले आहे. हलगी झांज वाजवत महावितरणच्या दारात सुरू केले आंदोलन.

    डोकेवाडी गावात महावितरणाकडे डीपीची मागणी करूनही डीपी देत नसल्याने आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचे बॅनर, फोटो लावून आंदोलन करत असल्याने हे आंदोलन चर्चेत आले आहे.

  • 15 Jun 2023 03:40 PM (IST)

    आगीची घटना अतिशय दुर्दैवा - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

    मुखर्जी नगर येथे लागलेल्या आगीबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दु:ख व्यक्त केले. आगीची ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    ही आग लागल्यानंतर क्लासमधील काही विद्यार्थी उड्या मारून पळून जात असताना त्यांना किरकोळ दुखापत झाली असून, इतर सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. घाबरण्याचे कारण नाही, अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली आहे. जिल्हा प्रशासनही घटनास्थळी हजर आहे, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

  • 15 Jun 2023 03:29 PM (IST)

    ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील ढोकाळी परिसरात दोन गटात झाला राडा

    ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील ढोकाळी परिसरात दोन गटात राडा झाला. जुना वाद असलेल्या व्यक्तीचा पत्ता सांगत नाही म्हणून कोयता , चाकू व हत्यार घेऊन परिसरात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने गोंधळ घातला.

    दुकानदारांना मारहाण होताना पाहताच परिसरातील तरुणांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना मारहाण केल्याने ते पळून गेले. याप्रकरणी ठाणे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 15 Jun 2023 03:24 PM (IST)

    संजय राऊत धमकीप्रकरणी दोन आरोपींना अटक

    संजय राऊत यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कांजूरमार्ग पोलिसांनी दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले.

  • 15 Jun 2023 03:14 PM (IST)

    दिल्लीत कोचिंग सेंटरला लागली भीषण आग

    नवी दिल्लीतील मुखर्जी नगर भागातील एका कोचिंग क्लासला मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आग लागल्याचे कळताच क्लासमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी उंचावरून उडी मारून जीव वाचवला.

  • 15 Jun 2023 03:05 PM (IST)

    नाशिक जवळ कंपनीतील पेंटिंग शॉपला लागली आग

    पाथर्डी फाटा परिसरातील अशोक लीलँड कंपनीतील पेंटिंग शॉपला आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

    अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला असून जवानांनी तत्परतेने आग विझवली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही.

  • 15 Jun 2023 03:01 PM (IST)

    सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही- मुख्यमंत्री शिंदे

  • 15 Jun 2023 02:55 PM (IST)

    विरार ते पालघर मोठा प्रकल्प आणण्याचा सरकारचा प्रयत्न- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सरकारने केलेल्या अनेक कामांची आणि योजनांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते पालघर येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात संबोधीत करत आहेत. यावेळी विरार ते पालघर असा मोठा प्रकल्प आणण्याचा सरकारचा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. नागपूर मुंबई प्रकल्प हा फक्त रस्ता नाही तर गेम चेंजर प्रकल्प असल्याचे उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दिले.

  • 15 Jun 2023 02:47 PM (IST)

    कुणालाही वैयक्तीक लाभ होईल असा एकही निर्णय आम्ही घेतला नाही- मुख्यमंत्री शिंदे

    हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत असून कुणालाही वैयक्तीक लाभ होईल असा एकही निर्णय आम्ही घेतला नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पालघरमध्ये सुरू असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत आहेत. 2 लाख 12 हजार सहाशे 83 लाभार्थ्यांना लाभ झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आमच्या सरकारमध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

  • 15 Jun 2023 02:38 PM (IST)

    शेतीला आधुनीकतेची जोड देण्यासाठी सरकार काम करतंय- मुख्यमंत्री शिंदे

    पालघर येथे आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत. सरकार सर्वसामान्यासाठी काम करत असून शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतीत फवारणी करण्यासाठी ड्रोन देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. गेल्या वर्षभरापासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय घेतले असे मुख्यमंत्री म्हणाले.

  • 15 Jun 2023 02:29 PM (IST)

    आजच्या रोजगार मेळाव्यात किमान दोन-तीन हजार तरूणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    पालघरमध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत रोजगार मेळावादेखील आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये अनेक स्टॉल लागलेले असून किमान दोन-तीन हजार तरूणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • 15 Jun 2023 02:21 PM (IST)

    ओबीसींनाही सरकार मोठ्या प्रमाणात घर देणार - देवेंद्र फडणवीस

    मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जनतेसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय सेवा मोफत मिळाव्यात यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याशिवाय महिलांना एसटी मध्ये 50 टक्के सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. ओबीसींनाही मोठ्या प्रमाणात घर देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीय सांनी दिली.

  • 15 Jun 2023 02:09 PM (IST)

    शिंदे आणि माझा प्रवास 25 वर्षांचा - देवेंद्र फडणवीस

    गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या जाहिरातीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. कुठल्याही जाहिरातीमुळे वाद होईल इतकं तकलादू सरकार आमचं नाही आहे, असे उत्तर त्यांनी विरोधकांनी दिले आहे. याशिवाय शिंदे आणि माझा प्रवास हा 25 वर्षांचा असून आम्ही होघेही गेल्या 25 वर्षांपासून एकत्र काम करतोय असेही ते म्हणाले.

  • 15 Jun 2023 01:59 PM (IST)

    आधीचे सरकार होते घरी

    महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पालघर जिल्ह्यात शासन आपल्या दरी योजने अंतर्गत सरकार तुमच्यापर्यंत आले आहे. वर्षभरापूर्वी आपले सरकार आले अन् तुम्हाला दोन सरकारमधील फरक दिसत आहे. कारण मागील सरकार होते, सरकार आपल्या घरी...आताचे सरकार आहे आपल्या दारी...असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी केला.

  • 15 Jun 2023 01:56 PM (IST)

    मिका सिंह विरोधात दाखल गुन्हा रद्द

    गायक मिका सिंह आणि राखी सावंत किसिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या प्रकरणी मिका सिंह विरोधात दाखल गुन्हा न्यायालयाने रद्द केला आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात वर्ष 2006 मध्ये राखी सावंतने मिका विरोधात गुन्हा दाखल केला होता. तो रद्द केल्यामुळे मिका सिंह याला दिलासा मिळाला आहे.

  • 15 Jun 2023 01:49 PM (IST)

    कोल्हापुरात शेतकरी आक्रमक

    कोल्हापुरातील उपसा बंदीवरून जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्रसंगी उद्योगाचे पाणी महिनाभर थांबवा, मात्र शेतीचे पाणी थांबू देणार नाही. नदीच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्याचाच आहे. उपसाबंदी तात्काळ मागे घ्या, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग आणि सरकारला इशारा दिला आहे.

  • 15 Jun 2023 01:39 PM (IST)

    विदर्भात चंद्रशेखर राव यांचे शक्तीप्रदर्शन

    भाजपचा गड असलेल्या विदर्भात आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचं शक्तीप्रदर्शन आहे. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे, राजू तोडसाम, माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम, बीआरएसच्या गळाला लागलेय…”शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही बीआरएसमध्ये जातोय. आगामी विधानसभा निवडणुका लढणार” असा निर्धार या माजी आमदारांनी केलाय. आगामी महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर BRS ची विदर्भात जुळवाजुळव सुरु आहे. “अब की बार किसान सरकार” असं म्हणत शहरात सर्वत्र केसीआर राव यांचे होर्डिंग्ज लागलेय.

  • 15 Jun 2023 01:34 PM (IST)

    सांगलीत पोलीस अधीक्षकांनी घेतली बैठक

    सांगलीत कायदा - सुव्यवस्थेसंदर्भात बैठक पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, सोशल मीडियाचे महत्व वाढत चालले आहे. त्यावर शेअर होणाऱ्या पोस्ट पोलीस तपासत आहेत. काही व्यक्तींवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. जातीय सलोखा राखणे हे आपलेच काम असल्याने प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. भविष्यात शहर शांत राहण्यासाठी सर्व त्या उपाययोजना पोलिसांकडून करण्यात येणार आहेत. नागरिकांनी देखील सजग राहणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर समाजविघातक पोस्ट आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावी, यामुळे भविष्यातील दुर्घटना टळू शकेल, असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले.

  • 15 Jun 2023 01:28 PM (IST)

    फडणवीस यांनी दिला एक गाडीत जाण्यास नकार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त एकत्र आले आहेत. दोन्ही नेते एकाच हेलिकॉप्टरमधून आले, परंतु एकाच गाडीत जाण्यास देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिली. यामुळे फडणवीस नाराज आहेत का? यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. कार्यक्रमास शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक उपस्थित आहेत.

  • 15 Jun 2023 01:21 PM (IST)

    लासलगावात शेतकऱ्यांचे आंदोलन

    तेलंगण राज्यातील हैदराबाद येथे महाराष्ट्राच्या कांद्याला 1800 ते 2000 रुपये बाजार भाव मिळत असताना दुसरीकडे आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे कांद्याच्या लिलावात दोनशे ते चारशे रुपयेपर्यंत कांद्याला प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी एक तासाहून अधिक वेळ कांद्याचे लिलाव बंद पाडत संताप व्यक्त केला.

  • 15 Jun 2023 01:15 PM (IST)

    बृजभूषण यांना क्लिन चीट

    अल्पवयीन अत्याचार प्रकरणात बृजभूषण शरणसिंह यांना दिल्ली पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. ७ महिला पहिलवानांनी दिल्ली पोलिसांकडे बृजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.

    या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. एका अल्पवयीन मुलीने बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात अत्याचाराचा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तर सहा अठरा वर्ष पूर्ण झालेल्या महिला पहिलवानांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पोलिसांनी बृजभूषण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे.

  • 15 Jun 2023 01:09 PM (IST)

    संत सोपान काका पालखी रवाना

    संत सोपान काका यांच्या मंदिरातून त्यांची मानाची पालखी आज पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. परंपरेनुसार ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड येथे मुक्कामी असल्यानंतर सोपान काकांची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत असते. आजही तीच परंपरा कायम ठेवत माऊलींची पालखी पालखी तळावर मुक्कामी असताना दुपारच्या सुमारास सोपान काकांच्या पालखीच प्रस्थान करण्यात आलं.

  • 15 Jun 2023 12:59 PM (IST)

    राधाकृष्ण विखे पाटलांचा आमदार निलेश लंके यांना इशारा; म्हणाले...

    महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना इशारा दिला आहे. पारनेरच्या आमदारांना अजून खूप काही शिकायचे आहे. पारनेरच्या आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत, त्यांना पुन्हा निवडून यायचं दिसत नाही. पारनेरच्या आमदारांनी अशी बेताल वक्तव्य करणं थांबवायला हवं, असं म्हणत राधाकृष्ण विखे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर घणाघात केलाय.  निलेश लंके यांनी आळंदी येथील वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज बाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले होते. त्याला आता विखे पाटलांनी उत्तर दिलं आहे.

  • 15 Jun 2023 12:55 PM (IST)

    सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेस कोडबाबत आज निर्णय? महत्वाची बैठक

    सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेस कोड बाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.  मंदिर देवस्थानची आज महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे.  अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठकीत ड्रेस कोडबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ड्रेस कोडला ग्रामसभेची यापूर्वीच मान्यता आहे. त्यामुळे या आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष सागलं आहे.

  • 15 Jun 2023 12:45 PM (IST)

    जाहीरातीवरून भाजप-शिवसेनेत ठिणगी? रवींद्र चव्हाण म्हणाले...

    शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार सर्वसामान्यच्या हिताचं सरकार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत.  त्यासाठी शासन आपल्या दारी हे कार्यक्रम सुरू केला आहे. जाहिरातीविषयी कोणताही गैरसमज नाही. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम चांगले करत आहे. आज स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसोबत आहेत, असं म्हणत रवींद्र चव्हाण यानी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 15 Jun 2023 12:35 PM (IST)

    अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना गुणरत्न सदावर्ते पत्र लिहिणार, काय कारण?

    अॅड. गुणरत्न सदावर्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहेत.  व्हाट्सएप जिहाद यावर कारवाई, चौकशी करावी, अशी मागणी ते करणार आहेत. असदुद्दीन ओवेसी यांचे अनेक व्हाट्सएप ग्रुप आहेत. ओवैसी निगेटिव्ह स्टेटमेंट करून देशात दुफळी माजवत आहेत, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.

  • 15 Jun 2023 12:22 PM (IST)

    संत सोपानकाका पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला सुरूवात

    संत सोपानकाका पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला सासवडमध्ये सुरुवात झाली आहे. सोपानकाकांची पालखी पंढरीच्या दिशेने निघाली आहे. तर संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी सासवडमध्ये मुक्कामी होती. त्यामुळे सासवड नगरीतल्या पालखी मैदानावर वैष्णवांचा मेळा जमला. माऊली महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

  • 15 Jun 2023 12:12 PM (IST)

    बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी चूक; घातपाताचा प्रयत्न?

    बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. नीतीश कुमार मॉर्निंग वॉक करत असताना अचानक दोन दुचाकीस्वार जवळ आले. त्यांनी धडक दिली मात्र इतक्यात नीतीश कुमार फुटपाथवर चढल्याने बाईकची धडक चुकली अन् थोडक्यात अनर्थ टळला.

  • 15 Jun 2023 12:02 PM (IST)

    मुख्यमंत्री पालघरच्या दिशेने रवाना

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी ठाण्यातून पालघरच्या दिशेने रवाना झाले. शिवसेनेच्या जाहिरातीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतचे सर्वच कार्यक्रम रद्द केले होते. आज जाहिरातीच्या वादानंतर पालघरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र उपस्थित राहणार आहेत.

  • 15 Jun 2023 12:00 PM (IST)

    ऊस तोडीच्या पैशासाठी डांबून ठेवलेल्या सहा मुलांची सुटका

    ऊस तोडीच्या उचलीचे पैसे शिल्लक राहिल्याचा दावा करत, एका मुकादमाने बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या सहा मुलांना सोलापूर जिल्ह्यातील कुंभेज येथे डांबून ठेवले होते. करमाळा पोलिसांच्या मदतीने या सहा मुलांची सुटका करण्यात आली. बीडमध्ये आणल्यानंतर सहा मुलांना जिल्हा बाल कल्याण समिती सदस्यांनी कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहे.

  • 15 Jun 2023 11:59 AM (IST)

    भाजप खासदार अनिल बोंडेंचा आज सूर बदलला

    काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडेंचा आज सूर बदलला आहे. कालच्या वादानंतर आज अनिल बोंडें यांनी सामंजस्यची भूमिका घेतली. बच्चू कडू काल काय बोलले हे मी ऐकलं नाही. पण याची दखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे घेतील. भाजप शिवसेनेमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याला सुरुवात झाली आहे.

  • 15 Jun 2023 11:58 AM (IST)

    पवारांनी कितीही भाकरी फिरवू द्या काही फरक पडत नाही - विजय शिवतारे

    शरद पवारांनी लयकित राहावं. तुम्ही एवढे तगडे असता तर राज्यातले जनतेने एकदा तरी सत्ता तुम्हाला दिली असती. पवार साहेबांना कधीचं एकहाती सत्ता मिळणार नाही. पवारांनी लोकांना मूर्ख बनवलं. लोकांची फसवणुक हे करत आहेत. यानं आम्हीं फुकट मत दिली आहेत. आधी वडिलांनी गंडवल आता तुम्ही गंडवत आहात. शरद पवारांना मी एकदिवस उघड पाडणार. शरद पवार कसले सहकार महर्षी, सगळ्या कारखान्यात हे घुसले. शरद पवार म्हणजे इस्ट इंडिया कंपनी आहे. यांनी फक्त लोकांची घरे फोडली.

  • 15 Jun 2023 11:56 AM (IST)

    पुत्र प्रेमासाठी कमी कुवत असणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्याकडे सेनेची धुरा - विजय शिवतारे

    मी दोन महिन्यआधी बोललो होतो की, पुत्र प्रेमासाठी कमी कुवत असणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्याकडे सेनेची धुरा दिली. राज साहेब बाहेर गेले. उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील नविन राज ठाकरे एपिसोड हा अजित पवार असतील. सुप्रिया सुळे यांचं कसलं आणि काय आव्हान. ज्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता नाही त्या पक्षाचं कसला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष.

  • 15 Jun 2023 11:47 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरात गटशिक्षणाधिकाऱ्याच्याच दालनात भरवली शाळा

    शाळेला वर्ग खोल्या नसल्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्याच्या दालनात शाळा भरवली. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी गटशिक्षणाधिकाऱ्याच्या दालनात शाळा भरली. वैजापूर तालुक्यातील करंजगाव या गावातील झेडपीच्या विद्यार्थ्यांची अनोखी शाळा भरली. गटशिक्षणाधिकाऱ्याच्या दालनात बसून विद्यार्थ्यांची बाराखडी आणि उजळणी सुरू आहे.

  • 15 Jun 2023 11:45 AM (IST)

    नाशिकमध्ये शिशूविहार बालकमंदिर शाळा वाद चिघळला

    नवीन इमारतीत विद्यार्थ्यांना हलवल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही. संतप्त पालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नवीन इमारतींचा निधी घेऊन जुन्याच इमारती मध्ये विद्यार्थ्यांना बसवल्याने पालक संतप्त झाले आहेत. शाळा प्रशासनाकडून कोणीही चर्चेसाठी न आल्याने आंदोलनावर पालक ठाम आहेत.

  • 15 Jun 2023 11:35 AM (IST)

    जाहिराती कुठून आल्या हा संशोधनाचा विषय - अंबादास दानवे

    खरं तर पहिल्यापासून सगळ्या गोष्टी सुरु आहेत. आता मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी आणि गद्दार यांचे वार टोले सुरु आहेत. या जाहिराती कुठून आल्या हा संशोधनाचा विषय आहे. त्यांनीच सर्वे दाखवला बर झालं. त्या जाहिरातीना कोणता जनाधार नाही. आम्हीही सर्वे काढू शकतो की 99 टक्के जागा मिळतील. महाराष्ट्रात नुसतं सत्तेसाठी सर्व सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या कंत्राट वाटपावरून तर सुरु नाही ना असं दबक्या आवाजात चर्चा सुरु आहेत. मुंबई पालिकेमधील 20 हजार कोटींची कामावरून हे वितुष्ट आलं नाही ना अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचा गृहमंत्री राज्यात आहे त्यांचे बॅनर चोरीला जातात. शिवसेना सोडुन सत्तेत आलेत आता बॅनर चोरीला गेले उद्या कोण कुठं जाईल याची कल्पना यांना नाही. दिल्लीत नरेंद्र आणि इकडे देवेंद्र याची मोहीम केव्हापासूनच सुरू आहे. अटलजी यांचे विचार केव्हाच सुरु आहेत.

  • 15 Jun 2023 11:32 AM (IST)

    मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आज मी इकडे आलोय - केशवप्रसाद मौर्य

    केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी आणि 2024 मध्ये पुन्हा मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आज मी इकडे आलोय. भारत आज पाचवी अर्थव्यवस्था आहे, आज हा गौरव मोदींच्या नेतृत्वाखाली मिळाला आहे. जम्मू काश्मीरमधील 370 हटवण्याचं काम केलं, शिवाय काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याचं काम मोदींनी केलं. आज पूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलोय. महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक खासदार निवडून येणार. 350 पेक्षा जास्त खासदार निवडून पुन्हा मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार, असे केशवप्रसाद मौर्य म्हणाले.

  • 15 Jun 2023 11:29 AM (IST)

    आर्थिक फायद्यासाठी माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे शिंदे गटात गेल्या - संजय राऊत

    आज कांजूरमार्ग येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. कारण ही किड होती ती गेली. आरोप कोणावर होतात, जे लोक मोठे असतात, त्यांच्यावर होतात. तिचे कोणाशीच पटत नव्हते मी समजून घ्यायचे. ती गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा नगरसेवक येथे मोठ्ठ्या फरकाने निवडून येईल अशी मला खात्री आहे. ते हॉस्पिटल स्नेहल आंबेकर महापौर असताना वात्सल्य ट्रस्टला देण्याचे ठरले होते. मी आमदार झाल्यावर ते रद्द केले. संजय राऊत यांच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांनी दाखवून द्यावे. ती कशाला गेली हे मला माहीत आहे, आर्थिक बाब आहे, माझ्याकडे पुरावे आहेत, त्याशिवाय ती जाणार नाही. काल धिंड काढली, आधी वर्षावर घेऊन गेले मग ठाण्यात घेऊन आले.

    श्रीकांत शिंदे येऊ दे एकनाथ शिंदे येऊ दे, या कांजूर भांडुपमध्ये कोणी येऊ दे, हा निष्ठावंत शिवसैनिकांचा word आहे, इथे आमचाच माणूस निवडून येईल. माझ्या मतदार संघात मी कामे केली आहेत, सगळे रस्ते CC केले आहेत. आरोप करायला कोणी तरी हवे म्हणून माझ्यावर आरोप केले आहेत. शिवसेनेत संजय राऊत मोठे नेते आहेत, ते जी भांडाफोड करत आहेत, त्यामुळे धमकी येत आहेत. आता आम्हाला हे कॉमन झाले आहे, आम्ही धमकीला घाबरत नाही.

  • 15 Jun 2023 11:25 AM (IST)

    मालेगावातील महाविद्यालयात घडलेल्या घटनेचे पडसाद

    मालेगावातील महाविद्यालयात घडलेल्या घटनेचे पडसाद नाशिक जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये उमटायला सुरवात झाली आहे. सटाणा शहरात समस्त हिंदू संघटनांनी काढला निषेध म्हणून जनआक्रोश मोर्चा काढला. मोर्चात सटाणा शहर आणि तालुक्यातील हिंदूचा निषेध मोर्चा सुरु आहे. निषेध मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरावात केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कार्यालय असा घोषणाबाजी करत पायी मोर्चा काढण्यात आला.

  • 15 Jun 2023 11:17 AM (IST)

    बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर प्रभाव कायम

    बिपरजॉय चक्रीवादळ कोकणातून पुढे सरकले असले तरीही या वादळाचा प्रभाव समुद्रावर अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळतंय. कोकणातील बहुतांश किनारपट्टीवरील भागाला लाटांचा मोठा तडाखा बसला आहे. गुहागरमध्ये बाग परिसरात कासव संवर्धन करण्यासाठी वापरात असलेल्या जागेवर तर समुद्राच्या लाटांनी अतिक्रमण करत आजूबाजूचा भाग देखील व्यापला आहे. कासवाची अंडी संवर्धित करण्याचे ठिकाण देखील झालंय उध्वस्त झाली आहेत. याठिकाणी असलेली सुरुची अनेक झाडे लाटांच्या दणक्याने जमीनदोस्त झाली असून पाण्यात वाहून गेली आहेत. मान्सून सक्रिय होत असताना किनारपट्टीवरील वाऱ्याचा वाढता वेग आणि अजस्त्र लाटा धडकी भरवणाऱ्या आहेत.

  • 15 Jun 2023 11:12 AM (IST)

    शिवसेना UBT पक्षाचे नेते खासदार संजय राऊत धमकी प्रकरणात नवी घडामोड

    मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे का ? केली असेल तर त्याने धमकी कोणाच्या सांगण्यावरून दिली ? संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांना सवाल विचारला आहे. जनतेला माहिती मिळायला हवी. संदीप देशपांडे यांनी मुंबई पोलिसांना आवाहन केले आहे.

  • 15 Jun 2023 11:10 AM (IST)

    आमदार बच्चू कडूंनी घेतली बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींची भेट

    आमदार बच्चू कडू यांनी बोरीवलीत संजय गांधी उद्यानातील आदिवासींची भेट घेतली. यानंतर बच्चू कडू यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याकडे जाऊन आदिवासींच्या मूलभूत सुविधा आणि पुनर्वसन याबाबत चर्चा केली. आदिवासी पाड्यात पाण्याची लाईन नाही, मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, राष्ट्रीय उद्यानाच्या नावाखाली ही सुविधा बंद केली आहे, आज मी अधिकाऱ्यांशी बोललो, सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही बोललो. उच्च न्यायालयाच्या निर्णयात मुलभूत सुविधा देता येत नाहीत, हे चुकीचे आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

  • 15 Jun 2023 11:01 AM (IST)

    मुख्यमंत्री निवासस्थान परिसरात बाईक स्वार घुसला

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मॉर्निंग वॉक करत असताना अचानक बाईक स्वार जवळ आला, नितीश कुमार फुटपाथवर चढल्याने बाईकची धडक चुकली असल्याची माहिती मिळाली आहे. सर्क्युलर रोडवर नितेश कुमार मॉर्निंग वॉक करत होते. मॉर्निंग वॉक करत असताना मुख्यमंत्री निवासस्थान परिसरात बाईक स्वार घुसला. बिहार पोलिसांनी बाईक चालकाला ताब्यात घेतलं आहे.

  • 15 Jun 2023 10:53 AM (IST)

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला गोव्याच्या दौऱ्यावर

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील राजभवनात ओम बिर्ला यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर ओम बिर्ला यांनी राजभवनाची पाहणी सुध्दा केली आहे.

  • 15 Jun 2023 10:51 AM (IST)

    सातपूर परिसरात दोन फळ विक्रेत्यांवर टोळक्यांचा हल्ला

    नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरात दोन फळ विक्रेत्यांवर टोळक्यांनी हल्ला केला आहे. हल्ल्यात फळविक्रेते अखिलकुमार साहू आणि संतोषकुमार साहू गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी दोन्ही भावांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

  • 15 Jun 2023 10:39 AM (IST)

    राष्ट्रीय महामार्गावर वाघांचे दर्शन

    गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील उसेगाव भागात सहा वाघांचे नागरिकांना दर्शन झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाघांचे दर्शन झाल्याने अनेक नागरिकांनी वाहने थांबवून वाघाचे दर्शन घेतले. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी देसाईगंज आणि गडचिरोली शहरात सध्या वाघाची दहशत आहे. सहा वाघ दिसल्यामुळे दहशत कायम आहे.

  • 15 Jun 2023 10:29 AM (IST)

    मॉन्सून लांबल्याने भाज्या शंभरीपार

    मॉन्सून लांबल्याने नांदेडमध्ये हिरव्या भाज्या शंभरीपार गेल्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेलंय. टोमॅटो, मिरची , मेथी आणि पालक अश्या रोज लागणाऱ्या भाजीपाल्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात मंदावल्याने हिरव्या भाज्यांच्या किमंतीत मोठी वाढ झाली आहे.

  • 15 Jun 2023 10:18 AM (IST)

    महापौरांचा बूट पळवणारे कुत्रे अखेर सापडले

    छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौरांचा बूट पळवणारे कुत्रे अखेर सापडले आहे. महापालिकेच्या डॉग स्कॉडने त्या कुत्र्याला ताब्यात घेतले आहे. महापौरांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर कुत्रे सापडले असल्याची माहिती मिळाली आहे.

  • 15 Jun 2023 10:14 AM (IST)

    महापालिका शाळांचा विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा उपक्रम

    महापालिका शाळांचा विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा उपक्रम

    औरंगाबाद शहरातील धर्मवीर संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मातृ पितृ पूजन समारोह असा आगळावेगळा कार्यक्रम शाळेच्या पहिल्या दिवशी घेण्यात आला. आपल्या मुलांवर आई-वडिलांप्रती चांगल्या भावना निर्माण व्हाव्यात, त्यांच्यावर संस्कार व्हावेत आणि पृथ्वीवरचा देव हा आपल्या आई-वडिलांच्या रूपात विद्यार्थ्यांनी पाहावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचाही मोठा सहभाग दिसून आला.

  • 15 Jun 2023 10:09 AM (IST)

    मुगाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत

    यवतमाळ : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मुग विक्रीला आणण्यास सुरुवात केली आहे. मुगाला पाच ते साडेपाच हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे लागवड खर्चही निघत नसल्याची शेतकर्‍यांकडून ओरड होतं आहे. तुरीला दहा हजार रुपये क्विंटलमागे भाव आहे. त्या तुलनेत मुगाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांनी आता जगाव की मरावं, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. मुगाला मिळणारा कवडीमोल भाव हा शेतकर्‍यांना आर्थिक संकटात नेणारा ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

  • 15 Jun 2023 10:04 AM (IST)

    जाहिरातीच्या वादानंतर शिंदे-फडणवीस एकाच व्यासपीठावर

    जाहिरातीच्या वादानंतर शिंदे फडणवीस एकाचं मंचावर पालघरमध्ये येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पालघरमध्ये मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

  • 15 Jun 2023 10:00 AM (IST)

    सांगलीतील चांदोली धरण, चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटकांसाठी बंद

    सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस असणार्‍या आणि पर्यटकांचे माहेरघर म्हणून संबोधल्या जाणार्‍या चांदोली परीसरातील चांदोली धरण आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून म्हणजे 15 जूनपासून 15 ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे हा निर्णय दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला आहे. पर्यटकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन धरण प्रशासन तसेच चांदोली राष्ट्रीय उद्यान कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

  • 15 Jun 2023 09:55 AM (IST)

    बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 46 हजार लोकांचं स्थलांतर

    बिपरजॉय चक्रीवादळ आज 4 ते 5 दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. 46,000 लोकांचं निवारागृहांमध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे. 6 एनडीआरएफ, 3 आरपीएफ टीम, 2 एसडीआरएफ टीम आणि 8 सेनेचे कॉलम स्टँडबायवर आहेत. 20,000 हून अधिक जनावरांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. सर्व निवारागृहांमध्ये पुरेशा प्रमाणात खाण्यापिण्याची सोय उपलब्ध आहे. कच्छचे जिल्हाधिकारी अमित अरोरा यांची माहिती

  • 15 Jun 2023 09:49 AM (IST)

    ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरवरील वादावर लेखकाचं उत्तर

    आदिपुरुषमधील एका सीनवरून वाद निर्माण झाला आहे. हा सीन आहे सीताहरणचा. ‘आदिपुरुष’चा नवीन ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये रावणाने सीतेला स्पर्श न करताच तिचं हरण केलं होतं. यावरून सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात झाली. आता आदिपुरुषच्या लेखकाने यावर मौन सोडलं आहे. वाचा सविस्तर..

  • 15 Jun 2023 09:42 AM (IST)

    ज्युनिअर नाना पाटेकरनं फेसबुक लाइव्ह करत घेतलं फिनाइल; गर्लफ्रेंड पोलिसांना म्हणाली "मरु द्या त्याला.."

    टेलिव्हिजन इंडस्ट्रीत ज्युनिअर नाना पाटेकर या नावाने ओळखला जाणारा प्रसिद्ध कलाकार तीर्थानंद रावने टोकाचं पाऊल उचललं. फेसबुकवर लाइव्ह करत त्याने आपला जीव संपवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तीर्थानंदचा जीव वाचवला. पोलिसांनी जेव्हा तीर्थानंदच्या गर्लफ्रेंडला फोन करून रुग्णालयात बोलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली, “त्याला मरू द्या, मी तर तशीही त्याला सोडणार होती.” असं म्हणून तिने फोन कट केला. वाचा सविस्तर..

  • 15 Jun 2023 09:35 AM (IST)

    नाशिक | भोसला स्कूलच्या शिशु विहार शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांवर आंदोलनाची वेळ

    विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेली इमारत दिल्याने पालक आणि विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या फीमध्ये इमारत शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांना नवी इमारत न दिल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा प्रशासनाने दिलेली इमारत विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असल्याने नवी इमारत देण्याची मागणी पालकांनी केली आहे.

  • 15 Jun 2023 09:28 AM (IST)

    बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी

    किनारपट्टी तसंच वादळाचा तडाखा बसणाऱ्या भागांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) 18 तुकड्या आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 12 तुकड्यांसह रस्ते, वीज, पाणी तसंच अन्य आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवण्याची शक्यता असल्याने इथेही NDRF च्या 14 तुकड्या तैनात आहेत. यापैकी पाच तुकड्या मुंबईत असतील.

  • 15 Jun 2023 09:21 AM (IST)

    गुजरात | बिपरजॉयचं स्वरुप तीव्र असल्याने अधिक नुकसानीची शक्यता- IMD

    बिपरजॉय या चक्रीवादळाचं स्वरुप अत्यंत तीव्र आहे. ज्यामुळे नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे. कच्छमध्ये दोन ते तीन मीटर उंच भरतीच्या लाटा येऊ शकतात आणि पोरबंदर, द्वारका जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी माहिती दिली आहे.

  • 15 Jun 2023 09:14 AM (IST)

    मुंबई | बिपरजॉय चक्रीवादळामुळे गेटवे ऑफ इंडिया इथलं समुद्र खवळलं

    मुंबईत सकाळी 10.29 वाजताच्या सुमारास भरतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाचा प्रभाव 18 जूनपर्यंत राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

    पहा व्हिडीओ

  • 15 Jun 2023 09:09 AM (IST)

    गुजरात | किनाऱ्यावर असलेल्या घरांमध्ये शिरलं समुद्राचं पाणी

    गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील मंगरोळमध्ये भरतीच्या लाटा आल्यानं समुद्राचं पाणी किनाऱ्यावर असलेल्या घरांमध्ये शिरलं. आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक काळ टिकलेलं 'बिपरजॉय' चक्रीवादळ आज संध्याकाळी चारनंतर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला धडकणार आहे. या वादळाचा थेट तडाखा कच्छसह देवभूमी द्वारका, पोरबंदर आणि राजकोट या भागांना बसणार आहे.

  • 15 Jun 2023 09:00 AM (IST)

    R Ashwin DRS in TNPL : एकाच चेंडूवर 2 वेळा DRS ! अश्विनच्या कृतीने डोकं चक्रावलं, रिझल्ट काय? Video

    अश्विन मैदानात असेल तर काहीही होऊ शकतं. अश्विनने मैदानात जे केलय, ते कदाचितच कधी क्रिकेटच्या मैदानात घडलं असेल. इंग्लंडवरुन मायदेशी परतल्यानंतर अश्विन TNPL 2023 सारख्या एका छोट्या लीगमध्ये खेळतोय. वाचा सविस्तर.....

  • 15 Jun 2023 08:55 AM (IST)

    काँग्रेस पक्षात मोठ्या बदलाचे संकेत

    काँग्रेस पक्षात मोठे बदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरेदी यांनी संकेत दिले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत मोठे बदल केले जाणार आहेत.

  • 15 Jun 2023 08:50 AM (IST)

    चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार

    चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय. आतापर्यंत 74 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जामनगर पोरबंदर देवभूमी सोमनाथ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आहे. समुद्रकिनाऱ्यावर कोस्टकार्ड आणि NDRF तैनात आहेत.

  • 15 Jun 2023 08:44 AM (IST)

    पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना ठेवलं शाळेबाहेर, पुण्यातील प्रकार

    शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थांना शाळेच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. . शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी शाळेच्या बाहेर बसून आहेत. खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील के टी ई एस इंग्लिश मिडीयम स्कूल मधील प्रकार. शालेय फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. एक तासाहून अधिक वेळ विद्यार्थी शाळेच्या बाहेर बसून होते.

  • 15 Jun 2023 08:35 AM (IST)

    अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी डॉग स्क्वाड

    अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी उधमपूरमध्ये CRPF ने डॉग स्क्वाडला वेगवेगळ्या क्षेत्रात तैनात केलय. "आम्ही यात्रेकरुंसाठी इथे तैनात आहोत. यात्रेकरुंनी घाबरण्याची गरज नाही. आम्ही पूर्णपणे सर्तक आहोत" असं CRPF 137 बटालियचने कमांडंट रमेश कुमार यांनी सांगितलं.

  • 15 Jun 2023 08:28 AM (IST)

    गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव

    गुजरातच्या द्वारकामध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येतोय. समुद्रात वेगवान वाऱ्यामुळे मोठ मोठ्या लाटा उसळत आहेत. मांडवीच्या समुद्रात उंच उंच लाटा उसळतायत.

  • 15 Jun 2023 08:20 AM (IST)

    पुणेकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी

    पुणेकरांवर पाणीकपात वाढण्याची टांगती तलवार आहे. खडकवासला धरणसाखळीत 5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. अडीच महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू आहे. पाणी कपात वाढणार का? याबाबत लवकरच निर्णय होईल.

  • 15 Jun 2023 08:14 AM (IST)

    डान्स बारच्या मॅनेजर आणि वेटरवर शस्त्राने हल्ला

    कल्याण-डोंबिवली परिसरातील डान्स बारच्या मॅनेजर आणि वेटरवर शस्त्राने हल्ला करुन लुटपाट करण्यात आली. मॅनेजरशी झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी आपल्या दोन मित्रा सोबत मारहाण करुन लुटालूट केली. कल्याण क्राईम ब्रँचने सीसीटीव्हीच्या मदतीने हल्ला करत लुटालूट करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेडया.

  • 15 Jun 2023 08:08 AM (IST)

    लष्कराची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमधून एकाला अटक

    लष्कराची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमधून एकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या रत्नाकर पवारला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे. पन्नास कोटी रुपयांचा अपहार केल्याचा रत्नाकर पवारवर जम्मू कश्मीर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. मूळचा नाशिकचा असलेल्या रत्नाकर पवारला जम्मू कश्मीर पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. लष्कराला विविध वस्तू पुरवठा करण्याच्या कामात पवार यांनी अपहार केल्याची लष्करी प्रशासनाची तक्रार आहे.

  • 15 Jun 2023 08:00 AM (IST)

    धाराशीवच्या तुळजाभवानी मंदिरात उंदरांचा धुमाकूळ, मंदिर संस्थानकडून उपाययोजना सुरू

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात उंदरांचा धुमाकूळ सुरू आहे. देवीच्या मूख्य गाभाऱ्यात देखील मोठ्या प्रमाणावर उंदराचा वावर पाहायला मिळत आहे. दरम्यान देवीच्या मूर्तीवर मंदिरात उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ जुना की कधीचा याबाबत स्पष्टता नाही.

    असे असले तरी तुळजाभवानी मंदिर संस्थानने उपाययोजना सुरु केली असून उंदीर पकडण्यासाठी गाभाऱ्यात पिंजरा लावण्यात आला आहे. या उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिलीय.

  • 15 Jun 2023 07:50 AM (IST)

    नाशिकमध्ये विद्यार्थ्यांची घोड्यावरून वाजतगाजत मिरवणूक, पहिल्याच दिवशी विद्यार्थांचं अनोखं स्वागत

    राज्यभरातील शाळांची घंटा आजपासून पुन्हा वाजली आहे. नवीन वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज शाळांमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. नाशिकच्या रचना विद्यालयात विद्यार्थ्यांची थेट घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या घोड्यांवरून फेटे घातलेले विद्यार्थी अत्यंत उत्साहात आपल्या शाळेत पोहोचले. यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे औक्षण करण्यात येऊन फुलांची उधळण करण्यात आली.

  • 15 Jun 2023 07:32 AM (IST)

    विरारच्या मोहक सिटी परिसरात भीषण अपघात झाला, चालक गंभीर जखमी

    विरारच्या मोहक सिटी परिसरात भीषण अपघात जाला आहे. मद्यप्राशन केलेल्या कार चालकाने एका अॅक्टिवा स्कुटीला उडवलं आहे. या अपघातात अॅक्टिव्हाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. चालकावर वज्रेश्वरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विरार पूर्वेच्या मोहक सिटी या परिसरात काल रात्री 8 वाजता हा अपघात झाला. कौशल सिंघ वय 27 वर्ष आणि राजन सिंघ वय 25 वर्ष असे या कारमधील दोघांची नावे आहेत. दोघेही मद्यप्राशन करून कार चालवत होते. तर प्रफुल्ल चुरी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

  • 15 Jun 2023 07:28 AM (IST)

    मुंबईतील सर्व शाळा आजपासून सुरू, बच्चे कंपनीचा वर्गात किलबिलाट

    मुंबईतील सर्व शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच शाळा कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिका आपल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करणार आहे. पहिल्या दिवशी शाळेत येताना मुलं थोडीशी संकोच करतात, त्यामुळे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासोबतच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बुक्स, शाळेचा दणका, टिफिन, छत्री आदी वस्तूही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

  • 15 Jun 2023 07:11 AM (IST)

    ऊसदर नियंत्रण मंडळ व शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर मुंबईत आज बैठक

    ऊसदर नियंत्रण मंडळ व शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर मुंबईत आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मागणीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे आज दुपारी साडे चार वाजता महत्वपूर्ण बैठक होत आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. बैठकीत ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करावी, दोन टप्प्यातील एफआरपीचा कायदा रद्द करुन एक रकमेचा कायदा पूर्ववत करावा आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

  • 15 Jun 2023 07:09 AM (IST)

    डोंबिवलीतील भाजप-शिवसेना वादात आता काँग्रेसची उडी, वाद पेटणार?

    डोंबिवलीतील भाजप-शिवसेना वादात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. नंदू जोशी प्रकरणातील भाजप महिला पदाधिकारी पीडित महिलेला न्याय देण्यासाठी काँग्रेस आंदोलन करणार आहे. तक्रार दाखल करून आरोपीवर कारवाई होत नसल्याने गेल्याआठ दिवसापासून मानपाडा पोलीस धोका बाहेर उपोषण सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि महिला पदाधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेत दिला हा इशारा.

  • 15 Jun 2023 07:04 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे लक्ष

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरमध्ये एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. शिंदे गट आणि भाजपमधील वादानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते एकत्र येणार असून ते काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published On - Jun 15,2023 7:01 AM

Follow us
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.