लोकल प्रवास इतका धोकादायक पद्धतीने, लोको पायलटसमोर लटकून प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल

West Bengal Local Train Viral Video: कार्यालयीन वेळेत लोकलने प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच असते. खचाखच भरलेल्या लोकलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात लोको पायलटसमोर लटकलेले लोक दिसत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत अजून काही माहिती समोर आली नाही.

लोकल प्रवास इतका धोकादायक पद्धतीने, लोको पायलटसमोर लटकून प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 8:30 AM

कोलकाता, दि. 5 फेब्रुवारी 2024 | लोकलने प्रवास करणे अनेक शहरांमध्ये जिकारीचे झाले आहे. मुंबईकर प्रचंड गर्दीतून रोज प्रवास करत असतात. कार्यालयीन वेळेत लोकलने प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच असते. परंतु सध्या लोकल प्रवासाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात अंत्यत धोकादायक पद्धतीने प्रवास करताना प्रवासी दिसत आहेत. लोको पायलटसमोर प्रवाशी लटकले आहेत, इतकेच नव्हे तर इंजिनापुढे उभे राहिले आहे. इतक्या धोकादायक पद्धतीने प्रवास करण्याचा हा व्हिडिओ भारतातीलच आहे. हा व्हिडिओ भारतीय रेल्वे मंत्रालयाला टॅग केला आहे. भारतात अशा पद्धतीने प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी युजर्सकडून आली आहे. पश्चिम बंगालमधील हा व्हिडिओ आहे.

काय आहे व्हिडिओत

लोकल रेल्वेच्या पुढील भागावर म्हणजे लोको पायलट असतो त्या ठिकाणी प्रवाशी लटकले आहे. संपूर्ण लोकल प्रवाशांनी खचाखच भरली आहे. ट्रेनच्या गेटवर मोठ्या संख्येने प्रवाशी लटकलेले दिसत आहेत. अंत्यत धोकादायक पद्धतीने हा प्रवास म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्याचा प्रकार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हा कुठला असा प्रश्न पडला आहे. हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगना, सियालदह-मगराहाट लोकल ट्रेनचा आहे.

हे सुद्धा वाचा

 रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग

व्हिडिओत भारतात असे घडू शकते, यावर युजर्सला विश्वास बसत नाही. अनेकांना हा व्हिडिओ बांगलादेशामधील असल्याचे वाटत आहे. काही जणांनी भारतीय रेल्वे मंत्रालयाने त्वरीत दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. काहींनी हा व्हिडिओ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केला आहे. अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवरुन येत आहे.

अशा आल्या प्रतिक्रिया

एका युजरने लिहिले आहे की, सरकार यामुळे सर्व ट्रेन वंदे भारत ट्रेनप्रमाणे करत आहे. दुसऱ्याने लिहिले आहे की, ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारशी बोलून लोकलची संख्या वाढवली पाहिजे. काहींना वाटत आहे की हा व्हिडिओ बांगलादेशमधील ढाका येथील आहे. एकाने लिहिले आहे मुंबई लोकल बदनाम आहे. परंतु मुंबईत लोक पायलटसमोर उभे राहून प्रवास करण्याचे हिंमत प्रवासी करत नाही.

आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.