AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर रॅली, हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील होणार

केंद्र सरकारने लागून केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आज (26 जानेवारी) शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे. (Farmers tractor march Republic day)

दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर रॅली, हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील होणार
ट्रॅक्टर रॅली
| Updated on: Jan 26, 2021 | 7:10 AM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागून केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आज (26 जानेवारी) शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे (Farmers tractor march) आयोजन केले आहे. मागील कित्येक दिवसांपासून शेतकरी या रॅलीची तयारी करत आहेत. 72 व्या प्रजासत्ताकदिनी (Republic day) दिल्लीच्या सीमेवर होणाऱ्या या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील होणार आहेत. तसेच, हजारो ट्रॅक्टरची रॅलीही यावेळी काढण्यात येणार आहे. (Delhi border Farmers tractor march on the occasion of Republic day)

पोलिसांची नियमावली काय?

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी प्रजासत्ताकदिनीच ट्रॅक्टर रॅली काढणार असल्यामुळे दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना रॅलीचा मार्ग निश्चित करुन देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना काही गाईडलाईन्सही घालून दिलेल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी रॅलीमध्ये एकूण 5000 शेतकऱ्यांना सामील होण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच, ट्रॅक्टर रॅलीमध्ये जास्तीत जास्त 5000 ट्रॅक्टरचा समावेश करता येईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. ही रॅली दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेतच काढली जावी असेही दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना सांगितले आहे. तसेच रॅलीदरम्यान संमतीविना लाऊडस्पीकरवर भाषण देण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये सुरक्षेत वाढ

ट्रॅक्टर रॅलीमध्ये सामील होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, ट्रॅक्टर्सच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपायोजना केल्या आहेत.पोलिसांनी दिल्ली शहर, तसेच दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा वाढवलेली आहे. राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड समाप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरवात होईल.

लढा आणखी तीव्र करणार

दरम्यान, आजची ट्रॅक्टर रॅली झाल्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार असल्याचे येथील शेतकऱी नेत्यांनी सांगितले आहे. 1 फेब्रवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करताना, वेगवेगळ्या स्थानांवरुन दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढला जाणार असल्याची शेतकऱ्यांनी घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या :

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी ट्रॅक्टर रॅलीत घातपाताची शक्यता नाकारता येत नाही : राजू शेट्टी

Delhi farmers protest | आंदोलक शेतकऱ्यांचे थेट ब्रिटनच्या खासदारांना पत्र, काय आहे नेमकं कारण?

“दिल्लीतील शेतकरी संघटनांचे नेते आपला हेका सोडण्याच्या तयारीत नाहीत”

(Delhi border Farmers tractor march on the occasion of Republic day)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.