Toolkit case: ‘टूलकिट तयार करणं गुन्हा नाही’, पोलिसांना फटकारत न्यायालयाचा दिशा रविला जामीन

Toolkit case: 'टूलकिट तयार करणं गुन्हा नाही', पोलिसांना फटकारत न्यायालयाचा दिशा रविला जामीन
दिशा रवी

शेतकरी आंदोलनाविषयीच्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या पर्यावरण कार्यकर्ती दिशा रविला आज (23 फेब्रुवारी) जामीन देण्यात आला.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 23, 2021 | 9:39 PM

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाविषयीच्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या पर्यावरण कार्यकर्ती दिशा रविला आज (23 फेब्रुवारी) जामीन देण्यात आला. जामीन देताना पटियाला हाऊस कोर्टाने पोलिसांच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले. दिल्ली पोलिसांनी दिशाला 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरुमधून अटक केली होती (Delhi court grant bail to Disha Ravi in farmer protest toolkit case).

न्यायालयाने दिशा रविला जामीन मंजूर करताना पोलिसांनी सादर केलेल्या अपुऱ्या आणि अर्धवट पुरावे पाहता दिशाला जामीन नाकारण्याचं एकही कारण सापडत नाही, असं स्पष्ट मत नोंदवलं.पोलिसांनी सादर केलेले पुरावे एका 22 वर्षीय मुलीला कोठडीत ठेवण्यासाठी पुरेसे नाहीत. यावेळी न्यायालयाने दिशाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचंही अधोरेखित केलं. पोलिसांनी दिशाची आणखी 4 दिवसांची पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

टूलकिट तयार करणं गुन्हा नाही

न्यायालयाने म्हटलं, “व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करणं किंवा निरुपद्रवी टूलकिट तयार करणं गुन्हा होऊ शकत नाही. शेतकरी आंदोलनावरील या टूलकिटचा आणि खलिस्तानी चळवळीचा कोणताही संबंध सिद्ध करता आलेला नाही. त्यामुळे आपला गुन्हा लपवण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅट डिलिट केले हा दावा अर्थहिन आहे. शेतकरी आंदोलनाला दिल्ली पोलिसांनीच परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आरोपी शंतनुने आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला येणं यात काहीही चूक नाही.”

दिशा रवी काय करते?

दिशा रवी ही पर्यावरणवादी आहे. जलवायू संदर्भात जनजागृती करण्याचं काम ती करते. ती बेंगळुरूची रहिवासी आहे. दिशा बेंगळुरूच्या प्रतिष्ठीत माऊंट कार्मेलची विद्यार्थीनी आहे. तिने माऊंट कार्मेल महाविद्यालयातून बीबीएची पदवी घेतली आहे. दिशाचे वडील रवी हे मैसूरमध्ये अॅथेलिटिक्स कोच आहेत. तर आई गृहिणी आहे. तसेच फ्राइडेज फॉर फ्यूचर इंडिया नावाच्या संस्थेची ती संस्थापक आहे. सध्या ती गुड वेगन मिल्क नावाच्या संस्थेत काम करते. प्लान्ट बेस्ड फूड अधिक स्वस्त आणि सुलभ बनविण्याचं काम ही संस्था करते. गाय, म्हशींसह प्राण्यांवर आधारीत कृषी पद्धत संपुष्टात आणून प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार द्यावा, अशा मताची दिशा रवी आहे.

टुलकिट वाद काय आहे?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट करून स्वीडनची पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने समर्थन केलं होतं. या ट्विटमध्ये आंदोलन कसं करावं, याची माहिती देणारे टुलकिट शेअर करण्यात आले होते. शेतकरी आंदोलन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती त्यात होती. ट्विटमध्ये कोणते हॅशटॅग असावेत, काय केले पाहिजे, कसा बचाव करावा याची सर्व माहिती या टुलकिटमध्ये होती. ग्रेटाने आधीचं टुलकिट डिलीट करून नंतर नवं टुलकिट शेअर केलं होतं.

टुलकिट काय आहे?

टुलकिट हे डिजीटल शस्त्रं आहे. याचा उपयोग आंदोलनाला सोशल मीडियाला हवा देण्यासाठी होतो. अमेरिकेतील ब्लॅक लाईव्ह मॅटर आंदोलनात त्याचा पहिल्यांदा वापर करमअयात आला. आंदोलन अधिक व्यापक व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं म्हणून या टुलकिटचा वापर केला जातो. यात आंदोलनात सहभागी होण्याच्या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी आंदोलनाविरोधात अॅक्शन घेतली तर काय करायचे? याची माहितीही त्यात देण्यात आळी आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकताना घ्यावयाची काळजी, आंदोलन करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी काय करायचे याचीही माहिती यात आहे. (Who is Disha Ravi; why Delhi Police arrested activist)

हेही वाचा :

कोण आहे दिशा रवी? पोलिसांकडून अटक का?; वाचा विशेष रिपोर्ट!

‘डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से…’, दिशा रवीच्या अटकेचा निषेध, प्रियांका गांधी सरकारवर बरसल्या

दिशा रवीसाठी ग्रेटा थनबर्ग मैदानात; ट्विट करून मानवाधिकाराच्या मुद्द्यावरून टीका

व्हिडीओ पाहा :

Delhi court grant bail to Disha Ravi in farmer protest toolkit case

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें