सर्वात मोठी बातमी, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आलीय.

सर्वात मोठी बातमी, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 7:50 PM

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून (Delhi) एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया(Manish Sisodia) यांना अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री देखील आहेत. पण त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आलीय. मनीष सिसोदिया यांच्या विरोधात मद्य घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. ते गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत होता. याप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु होती. त्यांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. गेल्या आठ तासांपासून त्यांची चौकशी सुरु होती. या चौकशीनंतर त्यांना आता अटक करण्यात आलीय.

मनीष सिसोदिया हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. ईडी, सीबीआयकडून सिसोदिया यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज सिसोदिया यांना अटक करण्यात आलंय. मध्यंतरी दिल्ली महापालिकेची निवडणूक पार पडलेली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा भरघोस मतांनी यश मिळालं होतं. त्यानंतर मनीष सिसोदिया यांची पुन्हा चौकशी करण्यात आली होती.

आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. मनीष सिसोदिया यांना उद्या कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर त्यांना किती दिवस कोठडी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.