देशातलं असं एक सुसज्ज हॉस्पिटल जिथं प्रत्येक सुविधा आहे पण ना बिलिंग काऊंटर ना वशिलेबाजी, वाचा सविस्तर…

शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने (DSGMC) राजधानी नवी दिल्लीत सुरु केलेल्या रुग्णालयाची सध्या एकच चर्चा सुरु झालीय. Delhi DSGMC kidney dialysis Hospital

देशातलं असं एक सुसज्ज हॉस्पिटल जिथं प्रत्येक सुविधा आहे पण ना बिलिंग काऊंटर ना वशिलेबाजी, वाचा सविस्तर...
DSGMC

नवी दि्ललीशीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने (DSGMC) राजधानी नवी दिल्लीत सुरु केलेल्या रुग्णालयाची सध्या एकच चर्चा सुरु झालीय. देशातलं हे अतिशय सुसज्ज रुग्णालय आहे जिथं प्रत्येक सुविधा आहे पण ना बिलिंग काऊंटर ना वशिलेबाजी….. त्यामुळे जिकडे तिकडे या रुग्णालयाची चर्चा सुरु आहे… आपण पाहूया या रुग्णालयाची वैशिष्ट्ये… (Delhi DSGMC kidney dialysis Hospital provide Free treatment)

रुग्णालयाची वैशिष्ट्ये

या रुग्णालयात एकाच ठिकाणी अनेक किडनी रुग्णांचे डायलिसिस होऊ शकतात असा दावा केला जात आहे. पहिल्या टप्प्यात डायलिसिससाठी 100 बेड बसविण्यात आले आहेत. 6 महिन्यांत येथे 500 बेड्स बनवले जाणार आहेत. आणि वर्षभरात येथे 5000 बेड्स बसवण्याचा निर्धार आहे.

भेदभावाशिवाय उपचार

नोंदणीनंतर रुग्णांना उपचार घेता येतील. गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीचा असा दावा आहे की यापेक्षा मोठा डायलिसिस ब्लॉक कोठेही नाही. जिथे चोवीस तास उपचाराची सुविधा आहे. सध्याच्या क्षमतेबद्दल बोलायचं झाल्यास येथे 500 लोकांचे डायलिसिस केले जाऊ शकतात.

प्रत्येक धर्माच्या रुग्णांवर उपचार, मोफत उपचार तसंच औषधे, मोफत खाण्याची सुविधा

दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य इंद्रजीत सिंह म्हणतात की, आम्ही ज्या उद्देशाने हॉस्पिटलची सुरुवात केली आहे तो उद्देश फक्त सेवाभाव आहे… येथे प्रत्येक धर्माच्या लोकांवर उपचार होतील. या रुग्णालयात मोफत उपचाराबरोबरच रुग्णांना त्यांच्या उपचाराशी नि: शुल्क औषधे मिळतील. त्याचबरोबर गुरुद्वारा व्यवस्थापन समितीतर्फे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीही लंगरची (खाण्याची) व्यवस्था करण्यात आली आहे.

बिलिंग काऊंटर नाही

हे असे अनन्य रुग्णालय आहे जेथे बिलिंग काउंटर नाही. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या रुग्णालयात बरीच बेड व मशीन्स आहेत. देशातील सर्वात मोठ्या आणि नि: शुल्क डायलिसिस रुग्णालयात, गुरु हरकृष्ण वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था, दिल्ली वगळता देशाच्या कुठल्याही भागातून येणा-या रुग्णांना डायलिसिस देण्यात येईल.

खासगी रुग्णालयात पाण्यासारखा पैसा इथे मात्र सगळे फ्री

आठवड्यातून तीन डायलिसिस सुविधा आहेत. आजाराने त्रस्त कोणतीही व्यक्ती आयुष्यभर डायलिसिस करुन घेऊ शकते. बाहेरील रुग्णालयात सरासरी प्रत्येक डायलिसिससाठी 4 ते 5 हजार रुपये खर्च होतात, परंतु येथे सर्व काही विनामूल्य आहे.

(Delhi DSGMC kidney dialysis Hospital provide Free treatment)

हे ही वाचा :

Eknath Shinde | पीपीई कि्टस घालून रुग्णालयांची पाहणी, एकनाथ शिंदेंना कोरोना

Published On - 9:12 am, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI