काँग्रेस पक्षाचं नेतृत्व ‘हा’ तरूण नेता करणार?; राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi May Be Leader of Congress : लोकसभा निवडणुकीचा आज निकाल लागतोय. अशात विविध घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रीय स्तरावर विविध घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षाने एक मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

लोकसबभा निवडणुकीचा निकाल लागतो आहे. अशात विविध घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोण करणार याबाबत आता निर्णय घेतला जात आहे. राहुल गांधींना लोकसभेत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसमधील सुत्रांनी दिली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय राहुल गांधीच घेणार असल्याची माहिती आहे. लवकरच दिल्लीत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलावण्यात येणार आहे. याच बैठकीत नव्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे. सध्या अधीर रंजन चौधरी यांच्याकडे हे पद आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.
यंदाचा निकाल
आज लोकसभा निवडणूकीचा निकाल सर्व मतदारांना पाहायला मिळतो आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला होता. मात्र सध्या एनडीए 293 जागांवर आघाडीवर आहे.तर इंडिया आघाडी 234 जागांवर पुढे आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडूनही सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. शरद पवारांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमेठीत स्मृती इराणी यांचा पराभव
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये मागच्या वेळी स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा दारूण पराभव केला होता. तर यंदा मात्र केंद्रीय मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे.कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून स्मृती इराणीचा पराभव झाला आहे. अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांचा विजय झाला आहे. 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी किशोरीलाल शर्मा यांचा विजय झाला आहे.
दोन टर्म मोदी सरकार सत्तेत असल्याने सत्ता विरोधी लाट असल्याचं यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळालं. शिवाय काँग्रेस आणि मित्र पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले गेले. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा या दोन यात्रांना लोकांचा प्रतिसाद मिळाला. त्याचमुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीला यश मिळताना दिसत आहे. आता काँग्रेस पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
