धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नवी दिल्ली जागतिक पुस्तक प्रदर्शन 2026 चे उद्घाटन, ‘कुडोपालीची गाथा’चे 13 भाषांमध्ये प्रकाशन
Dharmendra Pradhan : केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज कतारचे सांस्कृतिक मंत्री महामहिम अब्दुलरहमान बिन हमाद बिन जस्सिम बिन अल थानी, स्पेनचे संस्कृती मंत्री हे अर्नेस्ट उर्तासुन डोमेनेच यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नवी दिल्ली जागतिक पुस्तक प्रदर्शन 2026 चे उद्घाटन केले.

केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज कतारचे सांस्कृतिक मंत्री महामहिम अब्दुलरहमान बिन हमाद बिन जस्सिम बिन अल थानी, स्पेनचे संस्कृती मंत्री हे अर्नेस्ट उर्तासुन डोमेनेच यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नवी दिल्ली जागतिक पुस्तक प्रदर्शन 2026 चे उद्घाटन केले. जगातील सर्वात मोठा B2C पुस्तक प्रदर्शन हे विचारांच्या संगमासह भारतातील सशक्त वाचनसंस्कृतीचा भव्य उत्सव आहे.
भारतीय सैन्य इतिहास: शौर्य आणि विवेक @ 75 ही या पुस्तक प्रदर्शनाची संकल्पना आहे. तसेच कतार आणि स्पेनसारख्या देशांचा सहभाग या सांस्कृतिक व साहित्यिक आयोजनाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्रदान करतो. या प्रसंगी स्वातंत्र्यलढ्यातील अनकथित अध्यायांवर आणि संबलपूरच्या भूमीवरील संघर्षावर आधारित ‘कुडोपालीची गाथा: 1857 ची अनसुनी कथा’ या पुस्तकाच्या अनुवादांचे प्रकाशन करण्यात आले.
आज क़तर के संस्कृति मंत्री, HE Abdulrahman Bin Hamad Bin Jassim Bin Al Thani, स्पेन के संस्कृति मंत्री, HE Ernest Urtasun Domènech एवं अन्य विशिष्ट अतिथियों की उपस्थिति में ‘नई दिल्ली विश्व पुस्तक मेला 2026’ का उद्घाटन करने का सौभाग्य मिला। विश्व का सबसे बड़ा B2C पुस्तक मेला,… pic.twitter.com/x5nipM0TvY
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) January 10, 2026
हे पुस्तक बंगाली, आसामी, पंजाबी, मराठी, मल्याळम, उर्दू यांसह 9 भारतीय भाषांमध्ये तसेच एका आंतरराष्ट्रीय भाषेत (स्पॅनिश) प्रकाशित झाले आहे. यापूर्वी हे पुस्तक हिंदी, इंग्रजी आणि ओडिया भाषांत प्रकाशित झाले होते. आता हे पुस्तक एकूण 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा उपक्रम वीर सुरेंद्र साई जी आणि कुडोपालीच्या शहीदांच्या स्मृतींना सन्मान देण्यासोबतच भारताची बहुभाषिक व जागतिक संवाद परंपरा अधिक सुदृढ करतो.
New Delhi World Book Fair 2026 is a global celebration of books, literature, knowledge, culture and heritage.
Pleasure to explore the rich literary and cultural world of Spain at the #NDWBF2026. Confident that such exchanges will build lasting bridges and further strengthen… pic.twitter.com/VHLaiuXfUa
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) January 10, 2026
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वाचनसंस्कृतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याच्या दिशेने हे आयोजन एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधानांच्या विकसित भारतया संकल्पनेत केवळ पायाभूत सुविधा किंवा तंत्रज्ञान नव्हे, तर जागरूक, विचारशील आणि वाचणारी–विचार करणारी पिढी घडविण्यावर भर आहे.
पुस्तके, सभ्यता आणि संवाद यांच्या माध्यमातून देशात वाचनसंस्कृतीला नवी ऊर्जा देणाऱ्या या भव्य आयोजनासाठी @nbt_india यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
