Ram Mandir : राम मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधी रुपयांचं दान, कोण आहे सर्वांत मोठा दानवीर?

Ram Mandir : तब्बल 500 वर्षानंतर राम गर्भगृहात विराजमान... राम मंदिराच्या दान पेटीत कोट्यवधी रुपयांचं दान, 'या' व्यक्तीने केलंय सर्वांत जास्त दान, जाणून होईल आश्चर्य... भारतात सर्वत्र राममय वातावरण...

Ram Mandir : राम मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधी रुपयांचं दान, कोण आहे सर्वांत मोठा दानवीर?
ram mandir
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 8:53 AM

Ayodhya Ram Mandir : अयोध्या या ठिकाणी प्रभू राम तब्बल 500 वर्षानंतर राम गर्भगृहात विराजमान झाले आहेत. 22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटात प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. एकेकडे अयोध्या याठिकाणी प्रभू राण यांची प्राणप्रतिष्ठा होत होती, तर दुसरीकडे संपूर्ण भारतात उत्साहाचं आणि राममय वातावण झालं. अयोध्येत राम मंदिराची स्थपना करण्यासाठी फक्त भारतातून नाही तर, जगभरातून दार आलं आहे. भव्य मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 1100 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती मिळत आहे. राम मंदिरच्या दानपेटीत देखील कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत.

अयोध्या याठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रभू राम मंदिर यांच्या दान पेटीत तब्बल 3200 कोटी रुपयांचं दान जमा झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक उद्योजक आणि सेलिब्रीटींना राम मंदिरसाठी दान केलं आहे. पण सर्वात जास्त कोणी केलं असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल.

अंबानी-अदानी किंवा टाटा समूहासारख्या मोठ्या उद्योगपतींनी राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी दिली असेल… असं तुम्हाला देखील वाटत असले. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील कोट्यवधी लोकांनी, सेलिब्रिटींनी, उद्योगपतींनी, ऋषीमुनींनी देणग्या दिल्या. पण रिपोर्टनुसार सूरत याठिकाणी राहणाऱ्या एका उद्योजकाने मंदिरासाठी 101 किलो सोने दान केलं आहे.

हिरे उद्योजक दिलीप कुमार यांनी राम मंदिरासाठी सर्वात जास्त दान केलं आहे. दिलीप कुमार यांनी मंदिर ट्रस्टला 101 किलो सोने दान केलं आहे. दिलीप यांनी दिलेल्या गर्भगृह, खांब इत्यादी कामांसाठी सोन्याचा वापर करण्यात आला. सांगायचं झालं तर, सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 68 हजार रुपये आहे. म्हणजे दिलीप कुमार यांनी तब्बल 68 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

राम मंदिरासाठी दुसरी सर्वात मोठी देणगी कथाकार आणि अध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी दिली आहे. मोरारी बापूयांनी मंदिर ट्रस्टला 18.6 कोटी रुपये दान केलं आहे. रामायणाचा प्रचार करणाऱ्या मोरारी बापूंनी ही रक्कम लोकवर्गणीतून जमा केल्याची माहिती मिळ आहे.

मोरारी बापू यांनी भारतातून 11.30 कोटी रुपये, यूके आणि युरोपमधून 3.21 कोटी रुपये आणि अमेरिका, कॅनडामधून 4.10 कोटी रुपये जमा केले आहेत. मंदिराच्या उभारणीसाठी लोकांनी देणगी द्यावी, असे आवाहन मोरारी बापू यांनी केलं होतं.

डाबर इंडियाने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मोठी घोषणा केली होती. 17 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील काही भाग श्री जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला दान करणार असल्याची घोषणा डाबर इंडियाने केली.

डाबर इंडिया नंतर ITC ने देखील मोठी घोषणा केली आहे. उद्घाटनाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागणारं धूप दान करण्याची घोषणा आयटीसीने केली आहे. यावेळ अनेक उद्योजकांनी राम मंदिरासाठी देणगी दिली आहे.

Non Stop LIVE Update
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.