सावधान! हे झाड तुमच्याकडेही आहे का? मग तुम्ही सापांना घरात बोलवत आहात
साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहातो, असे अनेक झाडं आहेत, ज्या झाडांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप त्या झाडांकडे आकर्षीत होतात, अशाच एका झाडाची आज आपण माहिती घेणार आहोत.

साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहातो, त्यासाठी सापांबाबत असलेले अनेक गैरसमज कारणीभूत आहेत. जगातील प्रत्येक साप हा विषारीच असतो, हा त्यातील सर्वात मोठा गैरसमज आहे. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळतात मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत, ज्यामध्ये फुरसे, मण्यार, घोणस आणि नाग ज्याला आपण इंडियन कोबरा असं देखील म्हणतो, या चार सापांच्या जाती सर्वात जास्त विषारी आहेत, यांना आपण बिग फोर असं देखील म्हणतो.
दरम्यान अनेकदा साप घरात घुसण्याच्या घटना देखील घडतात, अशा परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका, आणि सापांना मारण्याचा प्रयत्न देखील करू नका, तर त्याची माहिती तुमच्या परिसरात असलेल्या सर्पमित्रांना द्या, सर्पमित्र या सापाचं रेक्स्यू करून त्याला सुरक्षीत अधिवासात सोडतील. एक गोष्ट लक्षात ठेवा साप कधीही स्वत:हून हल्ला करत नाही, कारण मुळातच त्याचा स्वभाव हा लाजाळून असतो, मात्र त्याला धोका जाणवल्यास तो हल्ला करतो.
साप घरात का घुसतात?
साप घरात घुसण्यासाठी अनेक कारण आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुमच्या घरात उंदरांचं प्रमाण जास्त असेल तर शिकारीच्या शोधामध्ये साप घरात घुसू शकतो, त्यामुळे आपल्या घरात कुठेही उंदिराचं बिळ नाही ना? याची काळजी घ्यावी, तसेच घराच्या आसपासच्या परिसरात जास्त गवत वाढू देऊ नये, त्यामुळे सापांना लपण्यासाठी जागा मिळते, जर परिसर स्वच्छ असेल तर सहसा साप तिकडे फिरकत देखील नाही.
दरम्यान अशा देखील काही वनस्पती असतात, ज्यांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप या वनस्पतींकडे आकर्षित होतात, या झांडाखांली सापांचा वावर आढळून येतो. यामध्ये चंदनाच्या झाडाचा देखील समावेश होतो. मात्र चंदनाचं झाडं हे सहसा घरात कोणी लावत नाही. मात्र असं देखील एक झाडं आहे, जे अनेक जण लावतात, मात्र या झाडाकडे साप आकर्षित होतात, ते म्हणजे केवड्याचं झाडं. केवड्यांच्या झाडाखाली अनेकदा साप आढळून येतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
