पोट आहे की गोदाम, ४० वर्षांच्या पुरुषाच्या पोटातून डॉक्टरांनी काढले २९ चमचे,१९ टुथब्रश आणि २ पेन
त्याला एक महिन्यापासून पोटात वेदना होत होती. त्यामुळे त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्या पोटाची सोनोग्राफी केली तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले...

एका ४० वर्षीय इसमाच्या पोटात दुखू लागल्याने त्याला युपीच्या हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याच्या पोटाचा एक्स-रे काढला तर डॉक्टरांनाच धक्का बसला.या इसमाच्या पोटात धातूचे चमचे, पेन, आणि टुथब्रशचा ढीगच आढळला. त्यानंतर या इसमावर शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे पोटातून इतकी सामग्री असूनही या इसमाला वेदनेशिवाय इतर कोणताही त्रास झाला नव्हता हे विशेष….
पोटात वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील नशामुक्ती क्षेत्रात एका ४० वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले. हा व्यक्ती बुलंदशहर येथील रहिवासी असून व्यसनामुळे महिनाभरापूर्वी त्याला एका नशामुक्ती केंद्रात दाखल केले होते.त्यानंतर त्यांच्या पोटात दुखायला सुरु झाले. त्याच्या पोटातील दुखणे जेव्हा तीव्र स्वरुपात परिवर्तित झाले त्यानंतर अखेर त्याला हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या रुग्णाच्या पोटाची अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करण्यात आली. तेव्हा त्याच्या पोटात धातूचे चमचे आढळल्यानंतर त्याच्यावर तातडीने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. डॉ.शाम कुमार यांनी त्या रुग्णावर १७ सप्टेंबर रोजी ऑपरेशन केले. त्याच्या पोटातून इतकी सामग्री बाहेर पडल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाला धक्का बसला. या रुग्णावर यशस्वी शस्रक्रिया झाल्यानंतर त्याला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.या रुग्णाची प्रकृती आता स्थिर असून त्याच्या पोटातील सर्व वस्तू काळजी पूर्वक काढण्यात डॉक्टरांना यश मिळालेले आहे.
निषेध करण्यासाठी केले कृत्य
या इसम विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. आपल्याला या नशामुक्ती केंद्रात डॉक्टरांना दाखवण्यासाठी नातेवाईकांनी भरती केले.परंतू आपल्या एकट्याला सोडून नातेवाईक निघून केल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी त्याने चमचे आणि इतर वस्तू गिळायला सुरुवात केल्याचे डॉक्टरांना सांगितले. मला नीट वागणूक दिली नाही. मला जेवायला नीट मिळाले नाही. त्यामुळे मी असहाय झालो आणि संतापाच्या भरात स्वत:ला त्रास देण्यासाठी वस्तू गिळायला लागल्याचे त्याने या मागचे कारण सांगताना म्हटले आहे.
