America Tariff : टॅरिफचा तुघलकी निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगलट, बसला सर्वात मोठा धक्का, नव्या संकटानं अमेरिकेमध्ये घबराट
ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण अमेरिकेच्या अंगलट आल्याचं पहायला मिळत आहे, टॅरिफमुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला असून, देशात चिंतेचं वातावरण आहे.

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं जसा भारतावर टॅरिफ लावला तसाच तो चीन आणि इतर देशांवर देखील लावला आहे. या टॅरिफचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. टॅरिफचा काही प्रमाणात परिणाम हा भारतावर देखील झाला आहे, मात्र याचा मोठा फटका आता अमेरिकेला बसला असून, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं आहे.
डॉलर ही जगातील सर्वात मजबूत करन्सी म्हणून ओळखली जाते, मात्र टॅरिफनंतर सातत्यानं डॉलरमध्ये घसरण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. गेले 72 दिवस म्हणजे तब्बल दहा आठवडे डॉलरमध्ये घसरण सुरू आहे. अमेरिकेचं टॅरिफ धोरण, जपान आणि युरोपीयन चलनाची वाढलेली किंमत, अशा अनेक कारणांमुळे सध्या डॉलरमध्ये घसरण सुरू आहे. दुसरीकडे भारतीय रुपयाच्या घसरणीला सध्यातरी ब्रेक लागला असून, गेल्या दोन दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये सुधारणा दिसून येत आहे. दरम्यान पुढील काही दिवस डॉलरमधील घसरण अशीच सुरू राहणार असून, त्याचा मोठा फटका हा अमेरिकेला बसू शकतो असा अंदाज सध्या अर्थतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. जर फेडरल रिझर्व्हने रेपो रेट 35 ते 50 बेसिस पॉइंटने कमी केला तर अमेरिकन डॉलरमध्ये आणखी घसरण पहायला मिळण्याची शक्यता आहे.
डॉलरमध्ये घसरण सुरूच
मंगळवारी डॉलर आपल्या प्रतिस्पर्धी करन्सीच्या तुलनेत जुलैनंतर प्रथमच निचांकी पातळीवर होता. मार्केट वॉचच्या डाटा नुसार डॉलरचा इंडेक्स 96.93 पोहोचला आहे. फॅक्ससेटच्या आकडेवारीनुसार डॉलर आपले प्रमुख प्रतिस्पर्धी चलन असलेल्या युरो, आणि येनच्या तुलनेत 0.5 टक्क्यांनी घसरला आहे. पुढील काळामध्ये डॉलरमध्ये 0.25 टक्क्यांपर्यंत घसरण पहायला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रुपया मजबूत स्थितीमध्ये
दरम्यान रुपयामध्ये देखील घसरण सुरू होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासून या घसरणीला ब्रेक लागला असून, रुपयामध्ये सुधारणा होत आहे. गेले दोन दिवस डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाच्या मुल्यामध्ये वाढ झाली असून, रुपया प्रति डॉलर 87.50 जवळपास पोहोचला आहे. हा अमेरिकेसाठी मोठा झटाक मानला जात आहे.
