‘झारी’तील शुक्राचार्य कोण..? झारखंडमधील अवैध उत्खननात ED करणार खुलासा

झारखंडच्या संथाल परगणा येथे 1000 कोटींहून अधिक बेकायदेशीर खाणकाम केले गेले आहे.

'झारी'तील शुक्राचार्य कोण..? झारखंडमधील अवैध उत्खननात ED करणार खुलासा
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 12:00 PM

रांचीः झारखंडमध्ये एकीकडे राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असतानाच ईडीकडूनही (ED) आता धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. राज्यातील संथालमध्ये 1000 कोटींचे अवैध खाणकाम (illegal mining) झाले असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Chief Minister Hemant Soren) यांचे आमदार प्रतिनिधी म्हणून असलेले पंकज मिश्रा आणि इतर व्यक्तींवर अवैध खाणकामाचा आरोपही ठेवण्यात आला आहे

अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेट ईडीने रांची येथील ईडीच्या विशेष न्यायालयात आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा, बच्चू यादव आणि प्रेम प्रकाश यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

त्या आरोपपत्राचा खुलासा केला आहे झारखंडच्या संथाल परगणा येथे 1000 कोटींहून अधिक बेकायदेशीर खाणकाम केले आहे.

हे खाणकाम करताना, मुख्यमंत्र्यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांनी सुमारे 42 कोटींची बेकायदेशीर मालमत्ता मिळवली. याबाबत आता ईडीकडून प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे, त्यामधूनही माहिती उघड केली गेली आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी म्हणून असलेले पंकज मिश्रांना 19 जुलै रोजी अटक केली होती.तर प्रेम प्रकाश यांना ईडीने 25 ऑगस्ट रोजी अटक केली होती. तर पंकज मिश्रा यांचे विशेष सहकारी आणि आरोपी बच्चू यादवलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

ईडीने 16 सप्टेंबर रोजी रांची येथील विशेष पीएमएलए कोर्टात आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा आणि त्यांचे दोन सहकारी बच्चू यादव, प्रेम प्रकाश यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये पंकज मिश्रा हे मुख्यमंत्र्यांजवळचे असल्याने त्यांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचेही म्हटले आहे.

आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा आपल्या राजकीय बळाचा वापर करुन ते साहिबगंज आणि आसपासच्या परिसरातील फेरी वाहतूकदार आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न करतात असाही आरोप त्यांच्यावर केला आहे.

पंकज मिश्रा साहिबगंजमधील विविध ठिकाणी स्टोन क्रशर चिप्स आणि बोल्डर्ससह बेकायदेशीर खाणकामावरही नियंत्रण ठेवत होते. त्यामुळे या गोष्टीही ईडीकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी आतापर्यंत 47 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत.

यावेळी 5.34 कोटी रुपयांची रोकड, बँकेत जमा केलेले 13.32 कोटी रुपये, तसेच 30 कोटी रुपयांचे जहाज आणि 5 स्टोन क्रशर, दोन ट्रक जप्त केले आहेत. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, प्रेम प्रकाशच्या घरावर छापा टाकल्यानंतर दोन एके-47 रायफलही जप्त केली आहे.

Non Stop LIVE Update
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.