Bengal Election: शारदा चिट फंडप्रकरणी तृणमूलच्या दोन नेत्यांची 3 कोटींची संपत्ती जप्त; ईडीचा मोठा झटका

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं रण तापत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. (ED attaches assets worth Rs 3 crore of TMC Leaders, others in Saradha case)

Bengal Election: शारदा चिट फंडप्रकरणी तृणमूलच्या दोन नेत्यांची 3 कोटींची संपत्ती जप्त; ईडीचा मोठा झटका
Kunal Ghosh
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 2:55 PM

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं रण तापत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी टीएमसीच्या दोन नेत्यांची तीन कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई केली असून त्यामुळे टीएमसीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (ED attaches assets worth Rs 3 crore of TMC Leaders, others in Saradha case)

टीएमसीचे प्रवक्त कुणाल घोष आणि टीएमसीचे खासदार शताब्दी रॉय यांच्यासह शारदा समूहाच्या प्रमुख सुदिप्त सेन यांच्या सहकारी देवजारी मुखर्जी यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या तिघांची एकूण तीन कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. एप्रिल 2013मध्ये शारदा चिट फंड घोटाळा उघड झाला होता. तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचं सांगण्यात येतं.

ईडीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी कुणाल घोष, शताब्दी रॉय आणि देवजारी मुखर्जींकडून 3 कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 2 मार्च रोजी घोष यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

कुणाल घोष शारदा मीडिया समूहाचे प्रमुख

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. टीएमसीचे माजी खासदार कुणाल घोष हे शारदा मीडिया समूहाचे सीईओ होते. मीडिया समूहाचा प्रमुख होण्यासाठी त्यांनी शारदा समूहाकडून मोठी रक्कम घेतल्याचा घोष यांच्यावर आरोप आहे. घोष यांची यापूर्वी जुलै 2019मध्ये आणि ऑक्टोबर 2013मध्ये याप्रकरणी तपास यंत्रणांनी चौकशी केली होती. त्यांची तुरुंगातही रवानगी करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर आहेत. ईडीने नुकतेच त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं.

शताब्दी रॉय ब्रँड अॅम्बेसिडर

टीएमसीच्या खासदार शताब्दी रॉय या शारदा समूहाच्या ब्रँड अॅम्बेसिडर होत्या. तर देवजारी मुखर्जी या शारदा ग्रुफ ऑफ कंपनीजच्या संचालक होत्या. या घोटाळ्यात ईडीने आतापर्यंत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती जप्त केली आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात कारवाई

ईडीने ऐन निवडणुकीच्या काळात छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाची प्रतिमा मलिन करून त्याचा फायदा उचलण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. (ED attaches assets worth Rs 3 crore of TMC Leaders, others in Saradha case)

संबंधित बातम्या:

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींचा राज्यपालांना फोन, नंदीग्राममध्ये गोंधळाची स्थिती, ममता कोर्टात जाणार

‘निवडणुकीत फटका बसेल या भीतीपोटीच मोदी आणि शाहांनी एका रात्रीत ‘तो’ निर्णय फिरवला’

West Bengal Elections 2021 : माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार अशोक डिंडावर दगडफेक, गाडी फोडली

(ED attaches assets worth Rs 3 crore of TMC Leaders, others in Saradha case)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.