AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cough Syrup Death : कफ सिरपमुळे मृत्यूचं तांडव, देशात खळबळ, नव्या संकटाने टेन्शन वाढलं!

सध्या देशात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कफ सिरपमुळे तब्बल 11 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे आता सगळीकडे हाहाकार माजला आहे.

Cough Syrup Death : कफ सिरपमुळे मृत्यूचं तांडव, देशात खळबळ, नव्या संकटाने टेन्शन वाढलं!
cough syrup
| Updated on: Oct 03, 2025 | 2:49 PM
Share

Cough Syrup Death : औषधं ही माणसाला आजारातून बरे होण्यास मदत करतात. काही औषधं तर एवढी खास असतात की त्यांचे सेवन केल्यास आराज लगेच बरा होतो. लहान मुलांना खोकला, ताप आला की कफ सिरप हे औषध नेहमीच दिले जाते. मात्र याच कफ सिरफसंदर्भात खळबळ उडवून देणारा एक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कफ सिरप दिल्यामुळे तब्बल 11 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये हा प्रकार समोर आला असून या घटनेने संपूर्ण देशात आता कफ सिरपसंदर्भात भीत निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये एकूण अकरा लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात एकूण 9 मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर राजस्थानमधील भरतपूर आणि सीकर येथे प्रत्येक एका मुल या कफ सिरपचे सेवन केल्याने दगावले आहे. बनावट कफ सिरपमुळे आमच्या मुलांचा मृत्यू झाला आहे, असा गंभीर आरोप मृत मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना घडल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीतून कफ सिरप तयार करणाऱ्या कंपन्यांनी बनावट कफ सिरप तयार केल्याचे समोर आहे. हे कफ सिरप तयार करताना एक तर गुणवत्तेची चाचणी केलेली नाही. तसेच कच्चा माल कोणता होता, याचीही कोणती नोंद ठेवण्यात आलेली नाही, हे समोर आलेले आहे. विशेष म्हणजे कफ सिरपच्या लेबलिंगमध्येही गडबड असल्याचे समोर आले आहे.

वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा सिरपसाठी वापर

वाहनांच्या निर्मितीत वापरले जाणारे रसायन या कफ सिरपमध्ये वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रातर्फे कफ सिरप जमा करण्यात आले आहेत. लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर राजस्थान सरकारने मुख्यमंत्री मोफत औषध वाटप योजनेअंतर्गत कफ सिरपचे वाटप थांबवले आहे. तर मध्यप्रदेशमधील छिंदवाडा येथे दोन ब्रँडच्या कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. ज्या कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे, त्या एकूण 23 कफ सिरपच्या सॅम्पलचा अभ्यास करण्यात आला. यातील तीन कफ सिरपमध्ये डायइथीलन गायकॉल (डीईजी) तसेच एथिलीन ग्लायकॉल (आजी) हे घटक असल्याचे समोर आले आहे. हे घटक वाहनांमध्ये कुलंट तसेच ब्रेक फ्ल्यूड म्हणून वापरले जाते.

दरम्यान, आता कफ सिरमध्ये वाहनांच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन वापरले जात असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.