AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता Everest च्या हिंगातही भेसळ, FSSAI ने विक्रीवर थेट घातली बंदी, एकात तर स्टार्च प्रमाण…

एकीकडे महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळीविरोधात रान पेटवले असताना तिकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानेही एमडीएच मसाल्यानंतर आता एव्हरेस्ट आणि लालजी गोधू कंपनीच्या हिंगाच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

आता Everest च्या हिंगातही भेसळ, FSSAI ने विक्रीवर थेट घातली बंदी, एकात तर स्टार्च प्रमाण...
Everest Hing and L.G.Hing
| Updated on: Aug 29, 2026 | 7:11 PM
Share

FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने दोन मसाल्यांच्या ब्रँडच्या विक्रीवर बंदी आणण्याचा आदेश दिला आहे. त्यात एव्हरेस्ट मसाला आणि लालजी गोधूच्या कम्पाऊंडेड हिंगाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. हा निर्णय दोन्ही कंपन्यांचा हिंगाचे सँपल तपासल्यानंतर त्यात दर्जाशी तडजोड आढळल्याने हे पाऊल उचलले आहे. ही बंदी केवळ या कंपन्यांच्या हिंगावर लागू असून त्यांच्या अंडा करी मसाला, चिकन करी मसाला वा गरम मसाला सारख्या अन्य उत्पादनांवर ही बंदी लागू नाही असेही भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने म्हटले आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने एव्हरेस्ट आणि लालजी गोधूच्या कम्पाऊंडेड हिंगाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या हिंगाच्या तपासणीत यात असली हिंगाचे प्रमाण मर्यादेपेक्षा ३० ते ४० टक्के कमी आढळले. तसेच लालजी गोधू कंपनीच्या हिंगात तर स्टार्चचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. एका ग्राहकाने केलेल्या तक्रारीनंतर संस्थेने बाजारात असलेल्या या कंपन्यांच्या हिंगाच्या ब्रँडची तपासणी केली तेव्हा खाद्यपदार्थांसंदर्भात नियम पायदळी तुडवल्याचे आढळले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, फडणवीसांनी केलं स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्वागत