EVM चे कवित्व संपेना; वादाला आता राजकीय फोडणी, काहीपण होऊ शकते हॅक, Elon Musk विधानावर ठाम

EVM Hacking Elon Musk : Tesla चे सीईओ एलॉन मस्क यांच्या एका विधानाने भारतात मोठा राजकीय वाद-विवाद होत आहे. अमेरिकेत ईव्हीएम संपविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएमला लक्ष्य केले आहे.

EVM चे कवित्व संपेना; वादाला आता राजकीय फोडणी, काहीपण होऊ शकते हॅक, Elon Musk विधानावर ठाम
ईव्हीएमवरुन महाभारत
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 4:53 PM

EVM मशीन हॅक होऊ शकते, असे विधान टेस्लाचा सीईओ एलॉन मस्क याने केले होते. त्यावरुन भारतात काहूर उठले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडच्या प्राथमिक फेरीत एका ठिकाणच्या मतदानात ईव्हीएममुळे गडबड झाल्याचे समोर आले. अणेरिकेतील हा अनुभव मस्क याने सोशल मीडिया एक्सवर शेअर केला आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंक मशीन बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर भारतात याच मुद्यावरुन राजकारण पेटले आहे.

काय म्हणाला होता मस्क

एलॉन मस्क याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी यांच्या युनियर ही पोस्ट शेअर केली आहे. सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याने ईव्हीएम विषयी भावना व्यक्त केल्या आहेत. “इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नष्ट करायला हव्यात. या मशीन मानव आणि AI च्या मदतीने हॅक होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी आहे, पण त्याने मोठी गडबड उडते.”, असे मत त्याने पोस्टमध्ये व्यक्त केले होते.

हे सुद्धा वाचा

आता वाकयुद्ध

ईव्हीएमचा हा मुद्दा ताजा असतानाच राहुल गांधी यांनी याविषयीचे ट्वीट केले. विरोधकांनी या मुद्याला हवा दिली. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क याच्या ट्वीटला उत्तर दिले. त्यावरून वाकयुद्ध सुरु झाले. मस्क याच्या विधानात काहीच अर्थ नाही. काहीच तथ्य नाही. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. त्यांनी भारताकडून काही तर शिकावं असा टोला चंद्रशेखर यांनी लगावला.

भारतीय EVM च्या गुणांची जंत्रीच त्यांनी वाचून दाखवली. भारतीय ईव्हीएमचे कस्टम डिझाईन, सुरक्षितता, कोणत्या नेटवर्कविना त्याचा वापर, ब्लूटूथ, वायफाय, इंटरनेट याच्याशी त्याचा कोणताही संबंध येत नसल्याचा दावा केला. या ईव्हीएमचा दुसरा प्रोगाम तयार करता येत नाही, असे पण चंद्रशेखर म्हणाले. चंद्रशेखर यांच्या ट्वीटवर एलॉन मस्क यांनी पलटवार केला. कोणते पण इलेक्ट्रॉनिक उपकरण हॅक करता येऊ शकते, या दाव्यावर मस्क ठाम असल्याचे दिसून आले.

भारतात EVM एक ब्लॅक बॉक्स – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी EVM वर पुन्हा प्रश्न उपस्थित केला. लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनविषयीची पहिली प्रतिक्रिया दिली. भारतात ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स असल्याचे ते म्हणाले. ईव्हीएमच्या तपासणीची गरज नाही. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेविषयी चिंता व्यक्त होत आहे. जेव्हा लोकशाही प्रक्रियेत संस्थांचे उत्तरदायीत्व कमी होते, तेव्हा लोकशाहीचे ढोंग करण्यात येते. अशावेळी फसवणुकीची भीती अधिक असते.

Non Stop LIVE Update
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.