Exclusive Interview : काबुलमधील स्थिती सुधारतेय, तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा; TV9 ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 28, 2021 | 7:19 PM

तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने TV9 भारतवर्षला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. काबुल विमानतळावर भीषण बॉम्ब स्फोट झालाय. जिथे विदेशी सुरक्षा होती तिथे बॉम्ब स्फोट झाले. काबुलमधील स्थिती आता सुधारत असल्याचा दावाही शाहीन याने केलाय. तसंच त्याने अमेरिकेवर आरोप करताना दहशतवाद्यांच्या रस्त्यावर आपली सुरक्षा नाही असं स्पष्ट केलंय.

Exclusive Interview : काबुलमधील स्थिती सुधारतेय, तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा; TV9 ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
सुहैल शाहीन, तालिबान प्रवक्ता

नवी दिल्ली : अफगाणीस्तानातील काबुल विमानतळावर झालेल्या बॉम्ब स्फोटांच्या मालिकेनंतर तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने TV9 भारतवर्षला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. काबुल विमानतळावर भीषण बॉम्ब स्फोट झालाय. जिथे विदेशी सुरक्षा होती तिथे बॉम्ब स्फोट झाले. काबुलमधील स्थिती आता सुधारत असल्याचा दावाही शाहीन याने केलाय. तसंच त्याने अमेरिकेवर आरोप करताना दहशतवाद्यांच्या रस्त्यावर आपली सुरक्षा नाही असं स्पष्ट केलंय. (Taliban Spokesperson Suhail Shaheen’s Exclusive Interview with TV9 Bharatvarsh)

अफगाणिस्तानवर असलेला विदेशी कब्जा संपताच आयएसआयएस संपेल असा दावाही सुहैल शाहीन याने केलाय. तसंच आयएसआयएसची मूळं अफगाणिस्तानात रुजू दिली जाणार नाहीत. त्यावर लवकरच ताबा मिळवला जाईल. आयएसआयएसचे लोक अफगाणी नाहीत. हे बाहेरचे लोक आहेत, असा दावाही शाहीन याने केला आहे. तसंच अफगाणिस्तानात लवकरच सत्ता बदलाची घोषणा केली जाईल असंही शाहीन याने मुलाखतीत म्हटलंय. आम्ही रणनिती शेवटच्या टप्प्यात आहे. याविषयी सर्व नेत्यांशी चर्चा केली जाईल आणि त्यांच्याकडू सल्ला घेतला जाईल. आम्ही सर्व नेत्यांची चर्चा करुन सत्ता स्थापन करु इच्छित असल्याचं शाहीन याने सांगितलं.

महिला आणि शिक्षणाबाबत तालिबानचं धोरण काय?

मुलं आणि महिलांच्या विषयावर बोलताता शाहीन याने महत्वाची माहिती दिली आहे. महिला आणि शिक्षण याबाबत तालिबानचं धोरण कायम आहे. तालिबानने जे वचन दिलं आहे ते पाळलं जात आहे. अफगाणिस्तानात महिला कार्यालयात जात आहेत. सर्व प्रांतातील शाळा उघडण्यात आल्या आहेत, असा दावा शाहीन याने केलाय. तसंच तालिबानची पॉलिसी सर्वांसाठी जमान आहे. जे आमच्याशी जोडले जाऊ इच्छितात त्यांचा स्वीकार केला जाईल. तर जे तालिबानसोबत नाहीत त्यांचंही स्वागत आहे, असंही शाहीन याने TV9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. सुहैल शाहीनची ही मुलाखत रात्री 8 वाजचा प्रसारित केली जाणार आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानात तालिबानने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तालिबानच्या हाती अफगाणिस्तान गेल्यानंतर अनेक नागरिक पलायन करत आहेत. अनेक देश अफगाणीस्तानातील आपल्या नागरिकांना एअरलिफ्ट करत आहेत. अशावेळी काबुल विमानतळावर भीषण बॉम्ब स्फोट घडवण्यात आले. यात 100 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलाय. तर 13 अमेरिकी सैनिकही मारले गेले आहेत. या बॉम्बस्फोटानंतर शुक्रवारपासून काबुल विमानतळावर पुन्हा एकदा विमानांची उड्डाणं सुरु झाली आहेत.

अमेरिकेनं काबुल हल्ल्याचा बदला घेतला

अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला करणाऱ्या आयसिस-के संघटनेच्या मोरक्यावर अमेरिकेने एअर स्ट्राईक केलंय. अमेरिकेने मानवरहित ड्रोनच्या मदतीने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये काबुल हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचा 48 तासात खात्मा केल्याचा दावा केलाय. या कारवाईत नांगरहारमधील आयसिसच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. अमेरिकेच्या एअर स्ट्राईक कारवाईनंतर आयसिसकडून प्रत्युत्तराची शक्यता आहे. हे लक्षात घेत अमेरिकेने काबुल विमानतळाच्या गेटवरील नागरिकांना जागा सोडण्यास सांगितलंय.

अमेरिकेचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी या कारवाईची माहिती देताना सांगितलं की, “अमेरिकेच्या सैन्याने काबुल हल्ल्यामागील इस्लामिक स्टेट-खुरासानच्या (आयएसके) मुख्य सूत्रधाराविरोधात कारवाई केली. यात अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतात मानवरहित हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित दहशतवाद्याचा खात्मा झालाय. यात सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती नाही.”

संबंधित बातम्या :

काबुल हल्ल्यात 110 जणांचा मृत्यू, जर्मनी, स्पेन आणि स्वीडनने बचाव मोहीम थांबवली

3 हजार रुपयात एक बॉटल पाणी, साडे 7 हजार रुपयांना एक ताट जेवण, काबुल विमानतळावर नेमकं चाललंय काय?

Taliban Spokesperson Suhail Shaheen’s Exclusive Interview with TV9 Bharatvarsh

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI