‘अयोध्या खटल्यात शाहरुख खान मध्यस्थी करण्याची सरन्यायाधीशांची इच्छा’, निवृत्ती समारंभातच मोठा गौप्यस्फोट

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निवृत्ती समारंभात बोलताना बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

'अयोध्या खटल्यात शाहरुख खान मध्यस्थी करण्याची सरन्यायाधीशांची इच्छा', निवृत्ती समारंभातच मोठा गौप्यस्फोट


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निवृत्ती समारंभात बोलताना बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. सरन्यायाधीश बोबडे यांना राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मध्यस्थ म्हणून असावा असं वाटतं होतं, असं मत विकास सिंह यांनी व्यक्त केलं. त्यामुळे चर्चेला उधाण आलंय (Explosive claim by SCBA president Vikas Singh in Ayodhya dispute mediation).

विकास सिंह म्हणाले, “अयोध्या प्रकरणात सरन्यायाधीश शरद बोबडे संविधान पीठाचे सदस्य असतानाचं एक गुपित मी सांगतो आहे. जेव्हा हा खटला सुरुवातीच्या टप्प्यात होता तेव्हा शरद बोबडे यांचं असं ठाम मत होतं की हे प्रकरण मध्यस्थांच्या माध्यमातून निकाली निघावं. सर्वांना आठवत असेल की त्यांनीच खुल्या न्यायालयात हे प्रकरण मध्यस्थांमार्फत सोडवण्याची सूचना केली होती. त्यानंतरच वरिष्ठ वकील श्रीराम पंचू आणि इतर लोक मध्यस्थ म्हणून नेमले गेले.”

हिंदू मुस्लीम समुदायात सौहार्दासाठी शाहरुख खानकडून ‘हा’ पर्याय

“सरन्यायाधीश बोबडे यांना मी शाहरुख खानच्या कुटुंबाला ओळखतो हे माहिती होतं. त्यामुळे या मध्यस्थीबाबत विचार करताना त्यांनी शाहरुख खान या प्रकरणी मध्यस्थी करायला तयार होईल का असं मला विचारलं. त्यानंतर मी शाहरुख खानशी बोललो, तोही अगदी तयार होता. शाहरुख म्हणाला होता की धार्मिक सौहार्दातूनच देशात हिंदू मुस्लीम शांततापूर्ण पद्धतीने एकत्र राहू शकतात. शाहरुखने सुचवलं की मंदीराची पायाभरणी प्रतिष्ठित मुस्लीम व्यक्तीच्या हस्ते आणि मशिदीची पायाभरणी प्रतिष्ठित हिंदू व्यक्तीच्या हाताने करावी,” असंही विकास सिंह यांनी नमूद केलं.

मध्यस्थीचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही, मात्र शरद बोबडे यांचा धार्मिक सौहार्दाचा प्रयत्न प्रशंसनीय होता, असंही विकास सिंह म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2019 मध्ये अयोध्या खटल्याप्रकरणी कायमस्वरुपाच्या उपाययोजनांसाठी मध्यस्थीची नेमणूक केली होती.

हेही वाचा :

Supreme Court stays Farm laws | जय किसान! मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का, कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती

सरकार शेतकऱ्यांशी चर्चेच नाटक करुन टाईमपास करतंय, हे ओळखून सुप्रीम कोर्टानं केंद्राला झापलं: राजू शेट्टी

Farmer Protest | शेतकरी आंदोलन थांबवण्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ‘या’ मुद्द्यावर सर्वाधिक जोर

व्हिडीओ पाहा :

Explosive claim by SCBA president Vikas Singh in Ayodhya dispute mediation