नजर लागू नये म्हणून चक्क सनी लियोनीचा फोटो शेतात लावला; शेतकऱ्याच्या करामतीने गावकरी खो खो हसले
Sunny Leone Photo in Farm : बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून सनी लिओनीची ओळख आहे. अशातच आता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात तिचा फोटो लावला आहे. यामुळे या शेतकऱ्यांची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री सनी लियोनी आपल्या बोल्ड लूक साठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिची अनेक आयटम साँग्स खूप लोकप्रिय झालेले आहेत. बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. अशातच आता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सनी लियोनीचा फोटो लावला आहे. यामुळे या शेतकऱ्यांची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या शेतकऱ्याने असं का केलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शेतात लावला सनी लियोनीचा फोटो
कर्नाटकातील यादगिर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुदानूर गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात बॉलिवडची स्टार अभिनेत्री सनी लियोनीचा फोटो लावला आहे. या शेतकऱ्याने आपल्या कापसाच्या पिकाला नजर लागू नये म्हणून हा फोटो लावला आहे. या शेतकऱ्याला असे वाटते की, रस्त्याने जाणारे लोक त्याच्या पिकाकडे पाहतात त्यामुळे पिकाला नजर लागते, मात्र या सनीच्या फोटोमुळे लोक फोटोकडे पाहतील आणि पिकाकडे दुर्लक्ष करतील ज्यामुळे पिकाला नजर लागणार नाही.
आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतकरी अनेकदा विविध उपाययोजना करत असतात. काही लोक शेतात मानवे पुतळे उभे करत असतात. यात्र या शेतकऱ्याने केलेली ही उपाययोजना काहीशी हास्यास्पद आहे. या शेतकऱ्याचे हे कृत्य आसपासच्या शेतकऱ्यांसाठी चर्चेचा आणि मनोरंजनाचा विषय बनला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या या निर्णयाचे सगळीकडे हसू होताना दिसत आहे.
कोण आहे सनी लियोनी?
सनी लियोनी ही एक बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि माजी पोर्नोग्राफिक अभिनेत्री आहे. तिचे खरे नाव ‘करनजीत कौर वोहरा’ आहे. तिचे संपूर्ण जगात चाहते आहेत. तिने ‘बिग बॉस’ या भारतीय रिअॅलिटी शोद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये आणि आयटम साँग्समध्ये काम केलेले आहे. त्यामुळे आता तिला नवी ओळख मिळाली आहे. ती पती डॅनियल वेबरसह कर्करोग संस्थेसाठी निधी उभारण्याचेही काम करते.
सनी लियोनीने 2012 मध्ये जिस्म-2 या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने मुलांना दत्तक देखील घेतलेले असून ती त्यांच्यासोबत राहते. कॅनडाच्या सार्निया, ओंटारियो येथे भारतीय पंजाबी माता पितांच्या पोटी जन्मलेल्या सनीने कॅनडाचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले आहे.
