मोदी आणि योगींसह केवळ 5 जण मंचावर, अयोध्येतील भूमिपूजनाचा नेमका 'प्लॅन' कसा?

राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केवळ 5 जणांना स्थान देण्यात आलं आहे (Ram Mandir Bhoomi Pujan Exact plan).

मोदी आणि योगींसह केवळ 5 जण मंचावर, अयोध्येतील भूमिपूजनाचा नेमका 'प्लॅन' कसा?

अयोध्या : अयोध्यामध्ये राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची वेळ अगदी जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत अनेक पूजा आणि विधी सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच अयोध्येत पोहचणार आहेत. आजच्या या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह केवळ 5 जणांना स्थान देण्यात आलं आहे (Ram Mandir Bhoomi Pujan Exact plan).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अगदी मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यातही मुख्य मंचावर केवळ 5 व्यक्तींना स्थान मिळणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

भूमिपूजनाला देशातील 36 परंपरांच्या 135 संताचा समावेश

एकूणच कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय म्हणाले होते, “आम्ही 135 संतांना आमंत्रित केलं आहे. यात देशातील 36 परंपरांच्या 135 संताचा समावेश आहे. याआधी काही प्रश्न उपस्थित झाले होते. संतानाही दलित म्हणण्यात आलं होतं. मात्र, संत हे संत असतात. देशाच्या भुगोलवरील प्रत्येकजण येथे असेल. आम्ही इक्बाल अंसारी यांना आमंत्रण दिलंय. फैजाबादच्या पद्मश्री महम्मद शरीफ यांनाही आमंत्रण दिलंय. आम्ही आमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. त्यावर सिक्युरिटी कोड छापण्यात आला आहे. याचा वापर एकदाच करता येईल. ज्याच्या नावाने पत्रिका आहे त्यांनाच याठिकाणी उपस्थित राहता येईल.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

1500 ठिकाणांहून माती आणि 2000 ठिकाणांहून पवित्र जल

“उपस्थितांना कार्यक्रमादरम्यान पोलीस तपासात ओळखपत्रही दाखवावे लागेल. मोदींच्या आगमनाच्या 2 तासापूर्वीपर्यंत आमंत्रितांना पोहचायचे आहे. आम्ही डिसेंबरमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की मंदिर निर्माणासाठी पवित्र नद्यांचे जल आणि पवित्र ठिकाणची माती घेवून या. 1500 ठिकाणांहून माती आणि 2000 ठिकाणांहून पवित्र जल आले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 3 कोटींची घोषणा केली होती. त्याची 1 कोटीचा पहिली भाग आला आहे. पैसे नक्की कुणी टाकले हे माहित नाही. मात्र, जी पोहच आली आहे त्यावर शिवसेना असे लिहिले आहे,” असं चंपतराय यांनी सांगितलं होतं.

“राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी इतर समाजाला चिडवण्याचा प्रयत्न होऊ नये”

चंपतराय म्हणाले होते, “आम्ही अयोध्येत वास्तव्यास असलेल्या मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या परिवारातील एकाला आमंत्रण दिलंय. त्याव्यतिरिक्त काही कारसेवकांच्या परिवाराला देखील आमंत्रण दिलं. देशभरात सर्व ठिकाणी 5 ऑगस्टचा भूमिपूजनाचा कार्यक्रम हा पुजा, प्रसाद आणि दिपप्रज्वलनाने पार पाडावा. मात्र, इतर समाजाला चिडवण्याचा प्रयत्न होवू नये. वय, प्रवासाचे साधन आणि कोरोनाची परिस्थिती यावर चर्चा करुनच निमंत्रितांना बोलवण्यात आलंय. यात हिंदू संतांसह, शिख, बौद्ध, जैन, वारकरी, बंजारा संत यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे.”

हेही वाचा :

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा प्रसाद दुतावासांमार्फत जगभर वाटणार, अयोध्येत 1 लाख 11 हजार लाडूंची तयारी

अमित शाहांना कोरोना, आता जनतेला क्वारंटाईन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः क्वारंटाईन होणार का? काँग्रेसचा सवाल

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा सल्ला, उद्धव ठाकरेंवर जितेंद्रानंदांची जहरी टीका

Ram Mandir Bhoomi Pujan Exact plan

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *