पाकिस्तानसाठी रात्र वैऱ्याची, भारताचा आणखी एक स्ट्राईक, घेतला मोठा निर्णय
भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला, मंगळवारी मध्यरात्री करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला, मंगळवारी मध्यरात्री करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारतानं केलेल्या या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे, पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत असून, या घटनेत काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर भारताकडून देण्यात आलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये 50 ड्रोनचे हल्ले केले आहेत. भारतानं पाकिस्तानची रडार सिस्टिम पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. त्यानंतर आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा चिनाब नदीची मदत घेतली आहे. भारतानं चिनाब नदीवर असलेले बगलियार आणि सलाल धरणाचे दरवाजे आज पुन्हा उघडले आहेत. यामुळे पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारतानं रविवारी चिनाब नदीमधून सोडण्यात आलेलं पाणी बंद केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चिनाब नदीवर असलेल्या धरणाचे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा जलसंकट निर्माण झालं आहे, पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये पूर आला आहे. यामुळे आता पाकिस्तान सरकारसमोर नवं संकट निर्माण झालं आहे.
भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे, पाकिस्तानी सैन्यांकडून सीमावर्ती भागात करण्यात आलेल्या गोळीबारामुळे चौदा भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता भारतानं धरणाचे दरवारे ओपन करण्यात आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या काही भागांमध्ये यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, लोकांच्या घरात पाणी घूसलं आहे. मात्र याबाबत पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये,
दरम्यान दुसरीकडे पुन्हा एकदा काही वेळापूर्वीच पाकिस्तानकडून जम्मू -काश्मीरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र हा हल्ला देखील फसला आहे, पाकिस्तानचे आठ मिसाईल भारतानं पाडले आहेत.
