कमालच झाली, नकली बटाटे सापडले, गेरुची माती आणि केमिकल्सपासून बनवत होते,दोन ट्रक जप्त
अन्नपदार्थांची भेसळ करण्याचा प्रघात आता वाढतच चालला असून शेतात पिकणारे बटाटे देखील आता केमिकल्स वापर करुन तयार केले जात असल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे.

कलियुगात कशाची भेसळ होईल हे सांगता येत नाही. बिहारच्या पाटणा येथील अन्न सुरक्षा पथकाने मीठापुर आणि मीनाबाजारातून छापेमारी करुन केमिकलयुक्त नकली बटाटांच्या साठा जप्त केला आहे. या छापेमारीत आढळले की हे बटाटे गेरुची माती आणि केमिकल्सचा वापर करुन तयार केले होते. ते खऱ्या बटाटांप्रमाणे दिसत होते. अशा प्रकारे बटाटे तयार केल्याने लोकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.
खाद्य सुरक्षा अधिकारी अजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत दोन ट्रक बटाटे जप्त करण्यात आले. या बटाट्यांना तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले की छत्तीसगड येथून रोज सकाळी सहा वाजता हे बटाटे मागवले जात होते. त्यांना व्यापारी मंडईत विकून नंतर विविध ठिकाणी विकले जात होते.
वासाने आणि रंगाने ओळखता येतात नकली बटाटे
हे बटाटे नेहमीपेक्षा वेगळे दिसतात. तीव्र रासायनिक वास आणि चमकदार आच्छादन आणि दोन दिवसात खराब होत असल्याने त्यांना ओळतखता येते असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या बटाट्याचा सुंगध नैसर्गिक बटाट्यांसारखा येत नाही. त्याऐवजी रासायनिक वास येतो. कापल्यानंतर आतील आणि बाहेरील रंगांचा मेळ बसत आहे. पाण्यात तरंगतात ( खरे बटाटे पाण्यात बुडतात )
छापा टाकल्याचे कळताच अर्धा डझन व्यापारी फरार
या छापेमारीचा सुगावा लागतात सुमारे अर्धा डझन व्यापारी घटना स्थळावरुन पसार झाले आहेत. या व्यापाऱ्याची ओळख आणि त्यांचा ठावठिकाणा शोधून कारवाई केली जात आहे.हे बटाटे 20-25 रुपये किलोने मागवून 70-75 रुपये किलोत विकले जात होते.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार या नकली बटाट्यात वापरलेले केमिकल्स लिव्हर आणि किडनी दोन्हीसाठी नुकसान दायक आहेत. लागोपाठ सेवनाने बद्धकोष्ठता, सूज आणि भूक न लागण्याची समस्या होते.
रेस्टोरंटवरही छापा, नकली पनीरची तपासणी
छापेमारी दरम्यान प्रशासनाने बोरिंग रोड स्थित सान्वी कलेक्शन कॅफे आणि राजाबाजार येथील स्काईलाईल बिर्याणी हाऊस येथील खाद्यपदार्थांची तपासणी केली. नकली पनीरच्या संशयाने येथील नमूने घेण्यात आले असून पनीर आणि बिर्याणीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पनीरचे नमून्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
