AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Air India Plane Crash : गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचं काय झालं? तासाभरापासून शोध सुरु, प्रवासाचे तिकीट समोर

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या विमानात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ahmedabad Air India Plane Crash : गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचं काय झालं? तासाभरापासून शोध सुरु, प्रवासाचे तिकीट समोर
Ahmedabad Air India Plane Crash vijay rupani
| Updated on: Jun 12, 2025 | 4:28 PM
Share

अहमदाबादच्या मेघानीनगर या ठिकाणी एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते कोसळलं आणि त्याला आग लागली. यानंतर धुराचे मोठ्या प्रमाणात लोट पाहायला मिळाले. सध्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या विमानात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नेमकं काय घडलं?

अहमदाबादच्या मेघानीनगरमध्ये एअर इंडियाचे एक विमान कोसळले आहे. AI171 असे या एअर इंडियाच्या फ्लाईटचा नंबर होता. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. दुपारच्या सुमारास विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी असलेल्या घोडे छावणीजवळच्या आयजीबी कंपाऊंडमध्ये कोसळले. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. यानंतर धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले.

अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी घटनेची पुष्टी करत सविस्तर माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, या बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमानात 130 प्रवासी होते. तर एएनआय वृत्तसंस्थेनुसार क्रू मेंबर्ससह एकूण 242 लोक विमानात होते. हे विमान 11 वर्ष जुने असून ते दिल्लीहून अहमदाबादला पोहोचले होते. त्यानंतर ते लंडनला रवाना होणार होते. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या एनडीआरएफ, सीमा सुरक्षा दल (BSF) यासोबतच अनेक टीम्स या बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

विजय रूपाणी विमानात असण्याची शक्यता

गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. तसेच अहमदाबाद आणि आसपासच्या सर्व रुग्णालयांना अलर्ट करण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन सेवा सक्रिय करण्यात आल्या आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी 5 मोठ्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विजय रूपाणी हे या विमानातून प्रवास करत होते. ते त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांच्या विमानाचे तिकीटही समोर आले आहे. या तिकीटावर त्यांचा सीट क्रमांकही पाहायला मिळत आहे. गेल्या तासाभरापासून विजय रुपाणी यांचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप त्यांची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.