हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू

हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू

रेल्वे लाईनच्या डबल ट्रकच्या ट्रायलदरम्यान ट्रेनखाली येऊन चार जणांचा मृत्यू झाला.

Nupur Chilkulwar

|

Jan 08, 2021 | 8:41 AM

देहरादून : उत्तराखंड येथील हरिद्वार जिल्ह्यात एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली (Four People Died In Railway Accident). येथे रेल्वे लाईनच्या डबल ट्रकच्या ट्रायलदरम्यान ट्रेनखाली चिरडून चार जणांचा मृत्यू झाला. ही अपघात जमालपूर कला गावाच्या जवळ झाला. जेव्हा ट्रायलसाठी चालवण्यात आलेली गाडी 100 ते120 किलोमीटर प्रतीतासाच्या वेगाने धावत होती तेव्हा रेल्वेरुळावरुन जात असलेले हे चार जण गाडीखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला (Four People Died In Railway Accident).

हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सेंथिल अवूदई कृष्ण राज एस यांनी याबाबतची माहिती दिली. सध्या मृतकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं. तर, मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

हरिद्वार-लक्सर दरम्यान डबल रेल्वे लाईन

हरिद्वार-लक्सर दरम्यान डबल रेल्वे लाईन टाकण्यात आली आहे. यावर जलद वेगात रेल्वे चालवून लाईनचं परिक्षण केलं जात होतं. त्यासाठी दिल्लीहून रेल्वे गाडी आणण्यात आली होती.

या दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. सध्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे (Four People Died In Railway Accident).

दोन वर्षांपासून रेल्वे रुळाचं काम

हरिद्वार-लक्सर रेल्वे मार्गावर दुपद्रीकरणाचं काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत या मार्गावर 50 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने रेल्वे गाड्या जायच्या. दुपद्रीकरणानंतर 10 जानेवारीपासून गाड्यांचा वेग दुप्पट म्हणजे 100 किलोमीटर प्रतितास होणं अपेक्षित आहे. त्यासाठी ही चाचणी केली जात होती.

Four People Died In Railway Accident

संबंधित बातम्या :

साताऱ्यात कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, तब्बल 600 कोबड्यांचा मृत्यू

कडाक्याची थंडी, दाट धुकं; रस्ता न दिसल्यामुळे 18 गाड्या एकमेकांवर आदळल्या, तिघांचा मृत्यू

Bullet Accident | सुपरफास्ट बुलेटवरील नियंत्रण सुटलं, थरारक अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें