Abhijeet Dipke: या महिलेने घेतले अभिजीत दिपके यांच्या कपाळावर चुंबन अन्…गहिवरले वातावरण
Abhijeet Dipke: बंगळुरूमध्ये SIR विरोधात सीजेपीने मोठे आंदोलन केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके याची क्रेझ दिसून आली. त्याच्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली. त्यावेळी कविता लंकेश आणि ईशा लंकेश हे कुटुंब असल्याचे दिपके म्हणाले.

बंगळुरू येथील फ्रीडम पार्कमध्ये मतदार यादीतील विशेष सखोल पुरर्निरीक्षणाविरोधात (SIR) सीजेपी आक्रमक दिसली. या ठिकाणी निवडणूक आयोगाविरोधात प्रदर्शन करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून बंगळुरू शहरातून प्रेम मिळाल्याचे अभिजीत दिपके म्हणाले. हे जिव्हाळा आपल्यासाठी खास असल्याचे दिपके म्हणाले. दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांची बहीण कविता लंके यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला. आज गौरी लंकेश जर जिवंत असत्या तर त्यांनी दीपके यांना आपला दत्तक पुत्र मानले असते आणि त्यांना समर्थन दिले असते असे कविता लंके म्हणाल्या.
बंगळुरूमध्ये जणू कुटुंबच मिळाले
अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी बंगळुरूमध्ये प्रेम आणि आदर मिळाल्याचे सांगत स्थानिकांचे आभार मानले. मी जी आशा व्यक्त केली होती, त्यापेक्षा अधिक प्रेम, जिव्हाळा आणि सद्भावना मिळाल्याचे दिपके यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. कविता लंकेश आणि ईशा लंकेश यांच्या रुपाने आपल्याला एक नवीन कुटुंब मिळाले आहे. या ठिकाणी मी पुन्हा माझ्या कुटुंबाला भेटायला येईल असे ते म्हणाले.
अभिजीत दिपके आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज, मोठी बहीण आफरीन नवाज यांचे आभार मानले. या दोघांनी बंगळुरू शहरात येण्याचे आमंत्रण दिले आणि येथील लोकांनी मला भरभरून प्रेम, आदर आणि सद्भावना दिल्याचे दिपके म्हणाले.
तर दिपके यांना मुलगा मानलं असतं
यावेळी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांची बहीण कविता लंके यांनी म्हटले की, गौरी लंकेश आज जिवंत असत्या तर त्यांना दिपके यांना आपला दत्तक पुत्र मानलं असतं. आमच्या सर्वांच्या पाठीशी अजून खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या असत्या. यावेळी त्यांनी कॉकरोच शब्दाचा अनेकदा वापर केला. प्रश्न विचारणे, आव्हानांचा सामना करणे आणि संघर्ष सुरू ठेवण्यासाठी त्यांनी आंदोलकांचे आभार मानले. यावेळी अभिजीत दिपके, यांना उद्देशून एकजुटपणे मी तुझ्यासोबत आहे मुला, असे भावनिक साद घातली.
Leaving Bengaluru with so much love in my heart. The warmth, affection and kindness I’ve received over the last two days have been truly overwhelming.
Sending a big hug to my new family, Kavitha Lankesh and Esha Lankesh. I came here as a stranger and am leaving with a family I know I’ll keep coming back to. ❤️
And a heartfelt thank you to @prakashraaj sir and my elder sister Aafreen Nawaz for inviting me and introducing me to the incredible warmth and generosity of Bengaluru.
You’ve all given me more than just beautiful memories. You’ve given me a home to return to. 🙂
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 9, 2026
SIR विरोधात फ्रीडम पार्कवर प्रदर्शन
यापूर्वी गुरूवारी बेंगळुरू येथील फ्रीडम पार्कवर SIR रद्द करण्यासाठी आणि बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी करण्यात आली. या आंदोलनात दोन हजारांहून अधिक आंदोलक सहभागी झाले होते. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात नारेबाजी करण्यात आली. विविध संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
