AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : SIR च्या मुद्यावरुन रान पेटवणाऱ्या काँग्रेस विरोधात पुरावा देत मुख्यमंत्र्यांकडून पोल-खोल, थेट VIDEO चं..

Devendra Fandvis on Congress SIR : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि SIR प्रक्रिया रद्द करण्यासाठी दिल्लीचा आखाडा झाला आहे. काँग्रेस गेल्या तीन दिवसांपासून रस्त्यावर आहे. त्याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिआ आघाडीला 'खिंडीत' गाठलं आहे.

Devendra Fadnavis : SIR च्या मुद्यावरुन रान पेटवणाऱ्या काँग्रेस विरोधात पुरावा देत मुख्यमंत्र्यांकडून पोल-खोल, थेट VIDEO चं..
देवेंद्र फडणवीस राहुल गांधी
| Updated on: Oct 09, 2026 | 10:10 AM
Share

Devendra Fadnavis on Kapil Sibal: SIR प्रक्रियेवरून, कथित मतदार याद्यांच्या घोळावरून दिल्लीत रणसंग्राम सुरू आहे. संसद परिसर जणू काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा आखाडा झाला आहे. एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा यामागणीसाठी काँग्रेस गेल्या तीन दिवसांपासून रस्त्यावर आहे. काँग्रेसचे हे उग्र रुप अनेक दिवसानंतर पाहायला मिळत आहे. पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनातील हवाच काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी-वाड्रा यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या एका पोस्टमुळे सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे.

काँग्रेस भाजपच्या ‘खिंडीत’?

गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेसने एसआयआर आणि ज्ञानेश कुमार यांच्यावरून हल्लाबोल केला आहे. दिल्लीचा आखाडा झालेला आहे. निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा असो की इतर दोन दिवसात विविध ठिकाणी आंदोलनं असो काँग्रेसची आक्रमकता वारंवार दिसून येत आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात तत्कालीन कायदामंत्री आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

काँग्रेसची डबल ढोलकी! असे या पोस्टचे शीर्षक आहे. या पोस्टमधून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. “काँग्रेस प्रत्येक व्यासपीठावरून SIR विरोधात जनमत भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्या आधी त्यांनी त्यांच्या सत्ताकाळातील तत्कालीन कायदेमंत्री कपिल सिब्बल यांचे संसदेतील अधिकृत रेकॉर्डवरील हे वक्तव्य ऐकायला हवे. त्यावेळी सिब्बल SIR च्या समर्थनार्थ बोलले होते.काँग्रेसच्या राजकारणाचे रंग बदलले, पण संसदेतील रेकॉर्ड बदलत नाहीत. आपणही ऐका आणि ठरवा कोण खरं आणि कोण खोटं?” असा टोला त्यांनी पोस्टमधून काँग्रेसला लगावला आहे.

कपिल सिब्बल यांच्या Video मध्ये काय?

कपिल सिब्बल संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना, “ही प्रक्रिया तीन श्रेणीत असल्याचे सांगत आहेत. त्यात पहिली मतदार एका मतदार संघातून दुसऱ्या मतदार संघात गेला. त्याचं नाव हटवण्यात येईल. त्याचे नाव दुसऱ्या मतदारसंघात नोंदवलं जाईल. मतदारसंघ पुनर्निमाणमध्ये जुन्या मतदारसंघातून नवीन मतदारसंघात मतदाराचे नाव जाईल, त्यावेळी नाव हटवले जाईल आणि अखेरीस जर मतदाराचा मृत्यू झाला तर त्याचे नाव वगळण्यात येईल. याच परिस्थितीत नाव मतदार यादीतून हटवण्यात येईल. ज्यांना असं वाटतं की त्यांचं नाव नाहक हटवण्यात आले. त्यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्याकडे जावे आणि त्यांच्या नावाची नोंदणी करण्याची विनंती करावी. अधिकारी त्याला नोंदणी करण्यापासून रोखू शकत नाही. 36 लाख 44 हजार 105 मतदारांनी त्यांचं नाव मतदार यादीत जोडण्याची मागणी केली आहे.”

Follow Us
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार