AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA Bloc Protest: इंडिया आघाडीचे दिल्लीत रणकंदन, पण महाराष्ट्रातील खासदारांची ऐनवेळी दांडी, हायकमांड रागाने लाल, फोन करून…

INDIA Bloc Protest: इंडिया आघाडीने दिल्लीत रणसंग्राम सुरू केलेला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी उग्र आंदोलन सुरू असतानचा महाराष्ट्रातील काही खासदारांनी त्याला दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे.

INDIA Bloc Protest: इंडिया आघाडीचे दिल्लीत रणकंदन, पण महाराष्ट्रातील खासदारांची ऐनवेळी दांडी, हायकमांड रागाने लाल, फोन करून...
महाराष्ट्रातील खासदारांच्या अनुपस्थितीने काँग्रेस हायकमांड नाराज
| Updated on: Oct 09, 2026 | 9:33 AM
Share

Maharashtra MPs Absent: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि SIR प्रक्रिया रद्द करण्यासाठी इंडिया आघाडीने दिल्ली दणाणून सोडली आहे. गेल्या चार दिवसांपासून दिल्लीचा आखाडा झालेला असताना महाराष्ट्रातील काही खासदारांनी मात्र या आंदोलनाला दांडी मारल्याचे समोर आले. आंदोलनातील अनुपस्थितीमुळे काँग्रेस हायकमांड भडकले आहे. पक्षामधील अंतर्गत बाबी चव्हाट्यावर आल्याने फोन करून या खासदारांना तंबी दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

काँग्रेस हायकमांडची उघड नाराजी

आंदोलनात सहभागी न झालेल्या खासदारांवर काँग्रेस हायकमांड नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे काँग्रेसचे प्रभारी श्रीवेल्ला प्रसाद यांनी संबंधित खासदारांना फोन करून खडेबोल सुनावले. तातडीने दिल्लीत पोहचून पुढील आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीच्या आंदोलनातील ही गैरहजर नाराजीचा विषय ठरली आहे.

दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पहिल्याच दिवशी सर्व खासदारांना सूचना दिल्या होत्या. जोपर्यंत पक्षाचा पुढचा आदेश येत नाही.तोपर्यंत राजधानी दिल्ली कोणी सोडायची नाही. प्रत्येकानं या आंदोलनात सहभागी व्हायचं अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण राज्यातील काही खासदारांनी या आंदोलनाला दांडी मारल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील 14 पैकी पाच ते सहा खासदार हे या आंदोलनात सक्रीय दिसले. हे तीनही दिवस संपूर्ण दिवसभर या आंदोलनात हजर होते. तर काही खासदारांनी पहिल्याच दिवशी गैरहजर होते. तर काही खासदार गेल्या तीन दिवसांपासून या आंदोलनाकडे फिरकलेच नसल्याने हायकमांड संतापले आहे.

कान पिळल्यानंतर अनेकांची धावाधाव

तुमचे नेते दिल्लीत रस्त्यावर आंदोलन करत आहेत. त्यांची पोलिसांशी झटापट होत आहे. दिल्लीत मोठे आंदोलन सुरू असतानाच तुम्ही काय करता आहात असा जाब महाराष्ट्र प्रभारी श्रीवेल्ला प्रसाद यांनी विचारला. त्यांनी फोनवरून या खासदारांना कानपिचक्या दिल्या. तर तातडीने या आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर तातडीने काही खासदारांनी रात्रीच दिल्लीसाठी उड्डाण केल्याचे समजते. यामुळे काँग्रेस आता मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच